1ते 5 गाणी/कविता
खालील कविता वाचा किंवा कविता लिहून घ्या आणि ऑनलाईन टेस्ट मधील विचारलेल्या 1 ते 25 प्रश्नांसाठी उत्तराचा योग्य पर्याय निवडा .
(१) खेळणी आमची.........
खेळणी आमची मातीची
रंगीबेरंगी कागदाची
विमान बनवले दीपाने
मोटार बनवली जॉनने
चेंडू आणला अजयने
भोवरा आणला उषाने
ताईच्या हाती बाहुली बघा
हवेत उडतो लाल लाल फुगा
#################
खालील कविता वाचा , म्हणा ,लिहून काढा आणि ऑनलाईन टेस्ट मध्ये विचारलेल्या 1- ते 25 प्रश्नांसाठी योग्य पर्याय क्रमांक निवडा
(2)एक होती भिंगरी.........
एक होती भिंगरी
भिंग भिंग भिंगरी
तिचं नाव झिंगरी
झिंग झिंग झिंगरी ।।1।।
तिला आहे
एकच पाय
पायावरती
गिरकी खाय ।।2।।
सारखी सारखी
फिरते गोल
फिरता फिरता
जातो तोल ।।3।।
गिरकी खाऊन
आली चक्कर
भिंतीवरती
मारली टक्कर ।।4।।
खालील गाणे वाचा, चाळीत म्हणा ,लिहून घ्या . आणि ऑनलाईन टेस्ट मध्ये विचारलेल्या 1 ते 25 प्रश्नांसाठी उत्तराचा योग्य पर्याय क्रमांक निवडा.
(3)एक चिऊ आली ..........
एक चिऊ आली
बाळाला पाहून गेली
एक पोपट आला
पेरू देऊन गेला
एक खार आली
बोर देऊन गेली
एक परवा आला
चिकू देऊन गेला
एक साळुंकी आली
आवळा देऊन गेली
एक कावळा आला
बाळाभोवती नाचून गेला
Comments
Post a Comment