Kinds of Adverbs
UNIT 1.4
Kinds of Adverbs - क्रियाविशेषणाचे प्रकार
1) Adverb of time कालवाचक क्रियाविशेषण :
We ask question to the verb 'When' we get an answer, that is called adverb of time क्रियापदाला When हा प्रश्न विचारला असता आपणास जे उत्तर मिळते. त्यास कालवाचक क्रियाविशेषण असे म्हणतात. सामान्यपणे क्रिया केंव्हा झाली याचे उत्तर ही adverbs देतात. (How many times याची ही उत्तरे adverbs देतात.)
Example:- Mother will come tomorrow. वरील वाक्याला when ने प्रश्न विचारून when will mother come? (आई केव्हा येईल ?) या प्रश्नाचे उत्तर म्हणजे कालवाचक क्रियाविशेषण येते. Ans. - Mother will come tomorrow.
The boy saw the picture twice.
How many times did the boy see the picture?
Answer येते twice.
Adverb of time today (आज) , always (नेहमी), early (लवकर), then (नंतर) , tomorrow (उद्या), daily (दररोज), never , before, etc.
2) Adverb of place:- स्थळवाचक क्रियाविशेषण :
Adverb of place is the answer of question 'where'? क्रियापदाला where हा प्रश्न विचारून येणारे उत्तर म्हणजे adverb of place क्रिया कोठे घडली म्हणजे क्रियेचे स्थळ दर्शविणाऱ्या शब्दांना स्थलवाचक क्रिया विशेषण म्हणतात.
Example:- Silvana is there. या वाक्याला where हा प्रश्न विचारला असता where is Silvana ? याचे उत्तर Silvana is there म्हणजे there हे स्थलदर्शक क्रिया विशेषण आहे. स्थलदर्शक क्रियाविशेषणे here, there, near, away, where, up, down, ahead, below, above etc.
3) Adverb of reason - कारणवाचक क्रियाविशेषण :
क्रियापदाला why हा प्रश्न विचारून येणारे उत्तर म्हणजे कारणवाचक क्रिया विशेषण होय.
Example:- He therefore left the school. He is hence unable to refuse the charge. (Therefore, Hence, etc. adverb of reason होय.)
4) Adverb of manner रीतीवाचक क्रियाविशेषण : क्रियापदाला 'How' हा प्रश्न विचारून येणारे उत्तर हे रीतीवाचक क्रियाविशेषण होय. क्रिया कशी घडली म्हणजेच क्रियेची रीत सांगणाऱ्या शब्दाला रीतीवाचक क्रियाविशेषण म्हणतात.
Example:- She runs fast. (ती जोरात पळते) याला How ने प्रश्न विचारला, ती कशी पळते तर उत्तर येते ती जोरात पळते.
रीतीवाचक क्रियाविशेषणे Slowly, fast, sweetly, bravely, so, well, quickly etc.
5) Adverb of degree परिणामवाचक क्रियाविशेषण : क्रियापदाला How much हा प्रश्न विचारून येणारे उत्तर म्हणजे परिणामवाचक क्रियाविशेषण म्हणतात.
Example:- I am so sad. (मी फार दुःखी आहे)
How much? परंतु किती ? तर या प्रश्नांचे उत्तर येते So (फार) . म्हणून so परिणामवाचक क्रियाविशेषण आहे.. Example:- much, little, almost enough, light, quite, as tall as ही परिणामवाचक क्रियाविशेषणे आहेत.
6) Interrogative adverb प्रश्नार्थक क्रियाविशेषण :
प्रश्न विचारण्यासाठी When, how, Where, why इ. क्रियाविशेषणाचा उपयोग करतात त्यांना प्रश्नार्थक क्रियाविशेषणे असे म्हणतात.
प्रश्नार्थक विशेषण व प्रश्नार्थक क्रियाविशेषणे यांचा उपयोग करताना पूरक महत्त्वाचे आहे. प्रश्नार्थक विशेषणे नामापूर्वी वापरून प्रश्न विचारतात मात्र प्रश्नार्थक क्रिया विशेषणाच्या बाबतीत तसे केले जात नाही. सर्व प्रकारच्या वाक्यात त्याचा उपयोग आहे.
Example:- When did you come? तू केव्हा आलास? प्रश्न विचारण्यासाठी When, how, where, why, how long, etc. क्रिया विशेषणाचा उपयोग होतो.
7 ) Adverb of affirmation - निश्चयात्मक क्रियाविशेषण :
yes, indeed, surely, certainly etc. निश्चियात्मक क्रियाविशेषणे होत.
8 ) Adverb of negation नकारार्थी क्रियाविशेषण : no, not, never, non etc. नकारार्थी क्रियाविशेषणे होत. Example:- (1) He never passed the examination.
तो कधीही परीक्षा पास झाला नाही.
(2) I do not know it. मला ते माहित नाही. / ते मला माहित नाही.
9) Position of adverbs - क्रियाविशेषणाचे स्थान
The girl spoke well.
Sit there.
She is arriving today. वरील Adverb of Manner, place आणि Time ही सामान्यपणे वाक्याच्या शेवटी येतात.
She often comes to us.
He never has been to pune.
We usually have our dinner at night.
He always comes late.
वरील Adverb of frequency कर्ता क्रियापद यांच्या मध्ये येतात. अशा वेळी क्रियापद एक शब्दाचे असते.
मात्र क्रियापद दोन शब्दाचे असेल तर ते क्रियापदाच्या दोन शब्दामध्ये येते.
Example:-
1) She is always late.
2) They are always happy when their parents are with them.
3) He is often absent.
Formation of adverbs
Slow - Slowly
angry- angrily
quick - quickly
Fail - failingly
Fear - fearfully
easy - easily
Dry - dryly
Ease - easily
Cycle - cyclically
Watch - watchfully
Perfect -perfectly
Play - playfully
Suggest - suggestively
Comments
Post a Comment