6 मराठी बलसागर भारत होवो गीत
१. बलसागर भारत होवो.........!
(पाठयपुस्तक पान क्र. १)
विद्यार्थ्यांनी समूहगीत तालासुरांत म्हणावे. इतर समूहगीतांच्या ध्वनिफिती ऐकव्यात.
विद्यार्थ्यांनी समूहगीत तालासुरांत म्हणावे. इतर समूहगीतांच्या ध्वनिफिती ऐकव्यात.
बलसागर भारत होवो............!
बलसागर भारत होवो विश्वात शोभुनी राहो ।।धृ।।
हे कंकण करि बांधियले,
जनसेवे जीवन दिधले,
राष्ट्रार्थ प्राण हे उरले,
मी सिद्ध मरायाला हो। बलसागर...।। १।।
वैभवी देश चढवीन,
सर्वस्व त्यास अर्पीन,
हा तिमिर घोर संहारिन,
या बंधु सहाय्याला हो । बलसागर ..।।२।।
हातात हात घेऊन,
हृदयास हृदय जोडून,
ऐक्याचा मंत्र जपून,
या कार्य करायाला हो । बलसागर....।।३।।
करि दिव्य पताका घेऊ,
प्रिय भारत गीत गाऊ,
विश्वास पराक्रम दावू,
ही माय निजपदा लाहो । बलसागर .... ॥४॥
या उठा करू हो शर्थ,
संपादु दिव्य पुरुषार्थ,
हे जीवन ना तरि व्यर्थ,
भाग्यसूर्य तळपत राहो । बलसागर ...॥५॥
ही माय थोर होईल,
वैभवे दिव्य शोभेल,
जगतास शांती देईल,
तो सोन्याचा दिन येवो । बलसागर...।।६।।
• कवितेचा आशय :
साने गुरुजी यांनी लिहिलेले हे एक समूहगीत आहे. विविध प्रकारे आपला भारत देश शक्तिशाली व समृद्ध व्हावा, अशी इच्छा या समूहगीतात व्यक्त केली आहे.
• पराक्रम, ऐक्य, सेवा, त्याग आणि देशभक्ती यांच्यामधून आपला भारत देश अधिक शक्तिशाली व्हावा अशी अपेक्षा साने गुरुजींनी या समूहगीतात व्यक्त केली आहे.
शब्दार्थ :
• पराक्रम, ऐक्य, सेवा, त्याग आणि देशभक्ती यांच्यामधून आपला भारत देश अधिक शक्तिशाली व्हावा अशी अपेक्षा साने गुरुजींनी या समूहगीतात व्यक्त केली आहे.
शब्दार्थ :
गीतातील शब्दांचा अर्थ
बलसागर- शक्तीचा समुद्र ,अफाट सामर्थ्यवान , प्रचंड शक्ती असलेला .
बलसागर- शक्तीचा समुद्र ,अफाट सामर्थ्यवान , प्रचंड शक्ती असलेला .
विश्वात -साऱ्या जगात.
कंकण-हातात घालायचे आभूषण (इथे अर्थ प्रतिज्ञा करण्याचे कडे.
करि - हातात.
जनसेवे -लोकांची सेवा करण्यासाठी.
दिधले -दिले.
राष्ट्रार्थ- देशासाठी,
सिद्ध-तयार,
वैभव -यश .
सर्वस्व-अवघे जीवन,
अर्पीन- समर्पित करीन,
तिमिर-काळोख, अंधार.
घोर-दाट, खूप.
संहारिन-नाश करीन.
बंधु-देशबांधव,
सहाय्याला-मदतीला.
ऐक्याचा- एकतेचा.
ऐक्याचा- एकतेचा.
दिव्य-तेजस्वी.
पताका- झेंडा, ध्वज, निशाण,
दावू-दाखवू,
निजपदा- (स्वतः तयार केलेले नियम, स्वतःचा मार्ग ) स्वातंत्र्य, पूर्वीची स्वतःची शान.
लाहो -मिळो,लाभो.
उठा- तयार व्हा, कामाला लागा .
शर्थ- पराकाष्ठा.
संपादू -मिळवू, प्राप्त करू.
पुरुषार्थ- पराक्रम, स्वत्व.
ना तरि- नाहीतरी.
व्यर्थ -फुकट, वाया.
भाग्य सूर्य- भाग्याचे तेज, नशिबाचे तेज.
माय- आई, मातृभूमी,
थोर-महान.
कवितेचा भावार्थ
कवितेचा भावार्थ
माझा भारत देश शक्तिशाली होवो. साऱ्या जगात दिमाखाने शोभून राहो . माझ्या भारताची कीर्ती सर्व जगात पसरावी.।।धृ।।
हे प्रतिज्ञेचे कडे आम्ही आमच्या मनगटात बांधले आहे. लोकांच्या सेवेसाठी आयुष्य दिले आहे. देशाच्या कल्याणासाठीच आता आमचे प्राण शिल्लक राहिले आहेत. देशासाठी बलिदान दयायला आम्ही तत्पर आहोत. ।। १ ॥
माझा देश मी ऐश्वर्यसंपन्न करीन. माझे अवघे जीवन त्यासाठी समर्पित करीन, या (पारतंत्र्याच्या) दाट काळोखाचा मी नाश करीन. देशबांधवहो, तुम्ही मदतीला या. हे सत्कार्य आपण मिळून करूया।।२।।
हातात हात गुंफून, मनाशी मन जोडून, एकजुटीचा मंत्र ओठात जपून, हे शुभकार्य करायला बांधव हो,
तुम्ही या.॥३॥
हातात तेजस्वी निशाण घेऊया, प्रियतम भारताची गौरवगाणी गाऊया, साऱ्या जगात पराक्रम गाजवूया आणि आपल्या मायभूमीला पूर्वीचे स्वतःचे मानाचे स्थान मिळवून देऊया.।। ४।।
उठा, उठा, आपण प्रयत्नांची पराकाष्ठा करूया, मायभूमीसाठी दिव्य पुरुषार्थ संपादन करूया. असे केले नाही तर आपले आयुष्य व्यर्थ ठरेल. आपल्या नशिबाचा सूर्य सदैव तळपत राहो.।। ५ ।।
माझी मातृभूमी महान ठरेल. वैभवाने दिव्य, दिमाखदार शोभेल. साऱ्या जगाला शांतीचा संदेश देईल. तो सोन्याचा
दिवस प्राप्त होवो.।।६।।
Comments
Post a Comment