6मराठी,7 आपले परमवीर
७.आपले परमवीर
• पाठाचा परिचय:
'परमवीर चक्र' हा भारताचा सर्वोच्च लष्करी सन्मान आहे. या परमवीर चक्राची तपशीलवार माहिती व एकवीस परमवीरांची यादी या पाठात दिली आहे. भारतीय सेनेच्या शौर्याला व बलिदानाला लेखकाने इंद्रवज्राची उपमा दिली आहे. तसेच फ्लाइंग ऑफिसर निर्मलजीत सिंग सेखाँ यांनी शत्रूशी लढताना कसे शौर्य गाजवले व देशासाठी प्राण गमावले, याची रोमहर्षक कहाणी सांगितली आहे.
शब्दार्थ
परमवीर - (१) शौर्य गाजवणारे शूर वीर
पुरातन - प्राचीन
असामान्य- अलौकिक
अतुलनीय - तुलना करता येत नाही असे. एकमेव
शौर्य - शूरपणा,
सन्मानपदके - मानचिन्ह
सर्वोच्च- सर्वोत्तम
लष्करी - सेनेमधील
ठाकलेला - राहिलेला स्थिर झालेला, थांबलेला. आत्मसमर्पण - आत्मबलिदार
दुर्लभ - न मिळण्याजोगा , न लाभणारा
मरणोत्तर - मरणानंतर
(२) गडद- दाट
वैशिष्ट्य - विशेषता
दर्शनी बाजू - पुढची बाजू
कमलपुष्पे - कमळाची फुले
अस्खलित- न अडखळता ,ओघवते बोलणे.
(३) प्रहार - आघात,
अजिंक्य - न जिंकता येणारे , अपराजित,
परमोच्च - सर्वोत्कृष्ट
त्याग सोडून देणे, समर्पण,
अमोघ - धारदार ,तीव्र , उत्कृष्ट
निष्पाप - भाबडेपणा,
दिव्य - तेजस्वी,
सामर्थ्य - शक्ती , बळ
कल्याण-हित.
अस्थी - हाडे
तळपणारे - झळाळणारे
अत्युच्च - उत्तुंग, सर्वोत्तम
बलिदान - समर्पण
(४) नियुक्ती - नेमणूक
धुरळा - धूर व कचरा
माथ्यावर- डोक्यावर
गोळ्यांच्या फैरी - एकामा एक गोळ्या सुटणे
हल्लेखोर - हल्ला करणारे (शत्रू)
जोमाने - जोशात
निकराची - अंतिम , प्रखर
बचावले - वाचले
भीषण - भयंकर
कमालीचे - आत्यंतिक टोकाचे.
निर्धाराने - ठाम निश्चयाने
प्राणांतिक वेदना - प्राण घेणाऱ्या कळा.
स्फूर्तिदायक - प्रेरणा देणाऱ्या .
हकिकती - कहाण्या गोष्टी, कथा.
टिपा
(१) परमवीर चक्र - भारताचा सर्वोच्च लष्करी सन्मान.
(२) कांस्य धातू- काशाचा धातू.
(३) भारताचे राष्ट्रीय बोधचिन्ह - चार सिंह व खाली चक्र असलेले राष्ट्रीय चिन्ह.
(४) सावित्रीबाई खानोलकर - परमवीर चक्र पदकाच्या निर्मात्या.
(५) इंद्रवज्र- देवांचा राजा इंद्र याचे अत्यंत टणक, कठीण हत्यार ( पौराणिक संदर्भ)
(६) दधीची- पौराणिक ऋषी.
(७) दंतकथा- लोकपरंपरेतून ऐकीव स्वरुपातआलेली कथा.
(८) फ्लाईंग ऑफिसर- हवाई दलातील एक पद.
(९) सेबर जेट व नॅट - लढाऊ विमाने.
(१०) श्रीनगर हवाईक्षेत्र - काश्मीरमधील हवाई ठिकाण/ विमान उड्डाणाचे ठिकाण.
(११) इंटरनेटवरील संकेतस्थळ - आंतरजालामधील वेबसाइट.
वाक्प्रचार व त्यांचे अर्थ
(१) वंदन करणे- नमस्कार करणे.
(२) प्राणाची आहुती देणे- प्राणाचे बलिदान करणे, आत्मसमर्पण करणे.
(३) प्रदान करणे- सन्मानाने बहाल करणे, देणे.
(४) निर्दालन करणे - समूळ नाश करणे.
(५) हल्ला करणे - तुटून पडणे.
(६) उड्डाण करणे - झेप घेणे.
(७) घोंघावू लागणे - आवाज करत गिरक्या घेणे.
(८) प्राणाची पर्वा न करणे - मरणाची भीती न बाळगणे.
(९) प्रतिकार करणे - विरोध करणे.
(१०) अचूक वेध घेणे - न चुकता नेम साधणे.
(११) पाठ दाखवणे - पळून जाणे.
(१२) प्राणाचे मोल देणे - प्राण गमावणे,
(१३) दोन हात करणे- सामना करणे, लढाई करणे.
संकलित मूल्यमापन
१. प्रश्नोत्तरे
• प्रश्न १. दोन-तीन वाक्यांत उत्तरे लिहा.
(१) फ्लाईंग ऑफिसर निर्मलजीत सेखाँ सावध का होते ?
उत्तर : शत्रूची सहा सेबर जेट विमाने श्रीनगर हवाईक्षेत्राकडे हल्ला करण्यासाठी झेपावली; हे फ्लाईंग ऑफिसर निर्मलजीत सेखाँ यांना माहीत होते. त्यामुळे ते प्रतिहल्ला करण्यासाठी सावध होते.
(२) फ्लाईंग ऑफिसर निर्मलजीत सेखाँना उड्डाण करण्यात कोणती अडचण होती ?
उत्तर : धावपट्टीवर अचानक उडालेल्या धुरळ्यामुळे फ्लाइंग ऑफिसर निर्मलजीत सेखाँना उड्डाण करण्यात अडचण आली. तशात शत्रूची विमाने माथ्यावर घोंघावू लागली. गोळ्यांच्या फैरी झडू लागल्या.
(३) निर्मलजीत सेखाँनी निकराची लढाई चालू का ठेवली ? उत्तर : निर्मलजीत सेखाँचे नॅट विमान वर झेपावले. त्यांनी हल्लेखोर विमानांचा जोशाने प्रतिकार सुरू केला. शत्रूच्या दोन विमानांचा त्यांनी अचूक वेध घेतला. जमिनीपासून फार थोड्या उंचीवर शत्रूच्या अधिक शक्तिशाली विमानांनी त्यांना वेढले होते; म्हणून सेखाँनी निकराची लढाई चालू ठेवली.
(४) निर्मलजीत सेखाँनी श्रीनगर शहर आणि हवाईक्षेत्राचा बचाव कसा केला ?
उत्तर : निर्मलजीत सेखाँना शत्रूच्या शक्तिशाली विमानांनी वेढले होते. त्यांनी निकराची लढाई केली. शत्रूच्या दोन विमानांचा अचूक वेध घेतला. शत्रू संख्येने जास्त असूनही निर्मलजीत सेखांनी त्याच्यावर धाडसी हल्ला केल्यामुळे शत्रू पळून गेले. अशा प्रकारे त्यांनी श्रीनगर शहर आणि हवाईक्षेत्राचा बचाव केला.
(५) दधीची ऋषींनी लोककल्याणासाठी कोणता त्याग केला ?
उत्तर : एका राक्षसाने जगातले सगळे पाणी पळवून नेल्यामुळे माणसे पाण्यावाचून तडफडू लागली. त्या राक्षसावर साध्या शस्त्रांचा परिणाम होत नव्हता. दधीचींच्या हाडांमध्ये अमोघ शस्त्र बनवण्याचे दिव्य सामर्थ्य होते. लोकांच्या कल्याणासाठी दधीची ऋषींनी आपल्या प्राणांची आहुती दिली. त्यांच्या अस्थींपासून इंद्रवज्र तयार करून राक्षसाचा नाश केला गेला.
◆ प्रश्न २. फ्लाईंग ऑफिसर निर्मलजीत सेखाँ हे शत्रूशी धैर्याने लढले. त्याचे पाच-सहा वाक्यांत वर्णन करा.
उत्तर : श्रीनगर हवाई क्षेत्रामध्ये शत्रूची सहा विमाने हल्ला करण्यासाठी झेपावली. धावपट्टीवरच्या धुरळ्यामुळे फ्लाईंग ऑफिसर निर्मलजीत सेखाँना उड्डाण करता आले नाही. शत्रूची विमाने गोळ्यांच्या फैरी झाडत असतानाच प्राणांची
पर्वा न करता सेखाँनी आपले नॅट विमान वर झेपावून जोमाने प्रतिकार सुरू केला. शत्रूच्या दोन विमानांचा त्यांनी अचूक वेध घेतला. शत्रू संख्येने जास्त असूनही सेखोनी निकराची लढाई सुरू ठेवली. त्यांच्या धाडसी हल्ल्यासमोर शत्रू पळून गेले या भीषण युद्धात निर्मलजीत सेखौं यांनी आपले प्राण गमावले.
• प्रश्न ३. परमवीर चक्र पदकाचे डिझाइन तयार करणाऱ्या सावित्रीबाई खानोलकर यांची सहा-सात वाक्यांत माहिती लिहा.
उत्तर : 'परमवीर चक्र' पदकाचे डिझाइन सावित्रीबाई खानोलकर यांनी तयार केले. त्या मूळच्या युरोपच्या राहणाऱ्या होत्या. भारतीय सेनेतील एक अधिकारी विक्रम खानोलकर यांच्याशी त्यांचे लग्न झाले. त्या भारतात आल्या. भारतावर त्यांचे प्रचंड प्रेम होते. त्यांनी भारताचे नागरिकत्व घेतले. त्यांनी भारतातील कला, परंपरेचा अभ्यास केला. मराठी संस्कृत व हिंदी या भाषा त्या सफाईने बोलत असत.
मुक्तोत्तरी प्रश्न
• (१) परमवीर चक्र धारकांची माहिती वाचून आपल्याला कोणती प्रेरणा व स्फूर्ती मिळते ?
उत्तर : परमवीर चक्र धारकांची माहिती वाचून आपले बाहू स्फुरण पावतात. त्यांच्या कर्तव्याचा आपल्याला अभिमान वाटतो. त्यांनी जी निरपेक्ष देशसेवा केली व प्राणांचे बलिदान दिले, त्याप्रमाणे आपणही देशासाठी त्याग करावा व देशाची शान वाढेल अशी देशसेवा करावी, अशी प्रेरणा व स्फूर्ती मिळते.
• (२) आपले परमवीर व दधीची ऋषी यांच्यात तुम्हांला कोणते साम्य आढळते?
उत्तर : आपले परमवीर लोकांच्या कल्याणासाठी व रक्षणासाठी सीमेवर जागता पहारा देतात व प्रसंगी जान कुर्बान करतात. दधीची ऋषी यांनीही लोककल्याणासाठी स्वतःच्या हाडांचे शस्त्र व्हावे म्हणून प्राणांची आहुती दिली. लोककल्याणासाठी प्राणांचे बलिदान करणे, हे साम्य दोघांमध्ये आढळते.
•• भाषाभ्यास व व्याकरण
◆ प्रश्न १. समानार्थी शब्द लिहा :
सावध - जागृत / सजग
लढाई- युद्ध
प्रत्यक्ष - समोर / डोळ्यांसमोर
शत्रू - वैरी / दुश्मन
◆ प्रश्न २. पुढील शब्दसमूहांचा वाक्यांत उपयोग करा :
(१) घोंगावणे (२) झेपावणे (३) वेध घेणे (४) वेढणे
(५) बचावणे (६) सामोरे जाणे
(1) : उघड्या ठेवलेल्या मिठाईवर माश्या घोंघावतात.
(2) : भारतीय हवाईदलाची लढाऊ विमाने आकाशात झेपावली.
(3): नेमबाज सुकूर राणाने लक्ष्याचा अचूक वेध घेतला.
(4) : पुराच्या पाण्याने गावाला चोहोकडून वेढले.
(5): भूकंपात इनामदारांचा भक्कम वाडा बचावला.
(6) : संकटाला सामोरे जाणे हे धैर्यवान माणसाचे काम आहे.
संबंधी सर्वनामे
पुढील वाक्ये वाचा :
(१) जो लवकर उठतो तो निरोगी राहतो.
(२) जिला तालबद्ध उड्या मारता येतात. तिला लेझीम संघात सहभाग घेता येईल.
वरील वाक्यांतील 'जो , तो , जिला , तिला ही संबंधी सर्वनामे आहेत.
• प्रश्न ३. पुढील वाक्यांतील संबंधी सर्वनामे अधोरेखित करा ,ओळखा आणि लिहा .
(१) ज्यांनी बचत केली, त्यांनी आपले भविष्य सुरक्षित केले.
(२) ज्याला खुंटावरचा खो-खो खेळता येतो, त्याला गोल खो-खो खेळता येतोच.
(३) जे दुसन्याला मदत करतात, ते लोकप्रिय होतात.
दर्शक सर्वनामे व प्रश्नार्थक सर्वनामे
•• पुढील वाक्ये वाचा. अधोरेखित केलेली सर्वनामे पाहा :
(१) हा मुलांचा संघ कोणता ?
(२) ही फुलांची माळ सुहासने बनवली.
(३) हे क्रिकेटचे मैदान खूप मोठे आहे.
(४) तो यशवंतरावांचा मुलगा आहे.
(५) तो माझी मैत्रीण आहे.
(६) ते सर्व खेळाडू आहेत.
(७) तिला कोणी मदत केली ?
(८) तुला खायला काय बनवू ?
(९) हा रुमाल कोणाचा आहे ?
हा, ही, हे, तो, ती, ते ही दर्शक सर्वनामे आहेत. हा. ही, हे या शब्दांनी जवळची; तर तो, ती, ते या शब्दांनी दूरची वस्तू, पदार्थ किंवा प्राणी दाखवला जातो.
कोणी, काय, कोणाला ही प्रश्नार्थक सर्वनामे आहेत. या प्रश्नांच्या उत्तरातून नामे मिळतात. ही नामांबद्दल आलेली सर्वनामे आहेत. त्यांच्या आधारे प्रश्न विचारता येतो.
२. लेखन विभाग
■■ परमवीर चक्राची माहिती पुढील मुद्द्यांनुसार लिहा :
परमवीर चक्र :
पदकाची मागची बाजू
धातू
कापडी पट्टीचा रंग
पदकाची दर्शनी बाजू
पदकावरील कोरलेले शब्द
भाषा
पुष्प
उत्तर : परमवीर चक्र कांस्य धातूचे बनवलेले असते. छोट्या आडव्या दांडीवर फिरेल अशी गडद जांभळी कापडी पट्टी असते. पदकाच्या दर्शनी बाजूला मधोमध भारताचे राष्ट्रीय बोधचिन्ह असते. पदकाच्या मागच्या बाजूला 'परमवीर चक्र' हे शब्द इंग्रजी व हिंदीत गोलाकार कोरलेले असतात. त्यांच्यामध्ये दोन कमलपुष्पे असतात.
३. तोंडी परीक्षा
प्रश्न: पुढील प्रश्नांची तोंडी उत्तरे सांगा :
(१) कोणत्याही दोन परमवीर चक्र धारकांची नावे सांगा.
(२) परमवीर चक्र धारकांच्या यादीतील महाराष्ट्रीय परमवीराचे नाव सांगा.
आकारिक मूल्यमापन
१. प्रकटवाचन :
•• पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक २७ वरील 'वाचा' हा उतारा मोठ्याने वाचा.
२. उपक्रम :
• (१) परमवीर चक्र मिळालेल्या २१ महान परमवीरांच्या नावांचा तक्ता करा. वर्गात लावा.
• (२) परमवीर चक्राचे चित्र काढा. रंगवा.
३. प्रकल्प :
•• आंतरजालावरून आपल्या परमवीरांची चित्रे मिळवा. चित्र, नाव व पाच-सहा वाक्यांत त्यांची माहिती या पद्धतीने चिकटवही बनवा.
¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢¢
Comments
Post a Comment