6म३. डॉ. कलाम यांचे बालपण
३. डॉ. कलाम यांचे बालपण
-डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम
मराठी अनुवाद - माधुरी शानबाग
• पाठ परिचय •
• भारतरत्न डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या 'अग्निपंख' या आत्मचरित्रातून हा पाठ घेतला आहे. डॉ. कलाम यांच्या बालपणीच्या जडणघडणी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून शिकण्याची त्यांची जिद्द व चिकाटी या गुणांचे दर्शन यातून घडते.
• शब्दार्थ •
दुर्मिळ - न मिळणारी, अप्राप्य
सदैव - नेहमी
वितरक- वाटप करणारा.
सुशिक्षित - चांगला शिकलेला
ग्रामस्थ- गावकरी
वाटचाल - प्रवास
जिज्ञासूवृत्ती - जाणून घेण्याचा स्वभाव, कुतूहल
गांभीर्याने – गंभीरपणे
नौका - होडी
कंत्राटदार- ठेकेदार
दूरस्थ- दूरच्या
मदतनीस - मदत करणारा,
ओसंडून- भरभरून
स्वयंशिस्त- स्वतःला लावलेली शिस्त.
आंतरिक शक्ती- मनोबल
ठेवा- संग्रह
निकट - जवळचा
सर्जनशीलता- निर्मिती करणे, सृजन,
स्रोत - धारा
उगम- मूळ स्थान,
निःसंशय - संशयाविना खात्रीने
स्मृती - आठवण
मोह - आसक्ती भूल,
आकांक्षा - इच्छा
गजबज - वर्दळ, गडबड हालचाल
एकजिनसीपणा - एकसारखे असणे,
ओढ - प्रेम
उदंड- पुष्कळ,
मोलाची - मूल्यवान ,किमती
अपेक्षा- पूर्तता व्हावी अशी इच्छा
कर्तव्य- जबाबदारी
टिपा
(१) एस. टी. आर. मणिकम - थोर क्रांतिकारक, राष्ट्रभक्त
(२) शमसुद्दीन - डॉ. कलाम यांचा दूरचा भाऊ
(३) चेन्नई (मद्रास)- तमिळनाडूची राजधानी.
(४) रामेश्वरम -तमिळनाडूमधील एक गाव.
(५) हिटलर- जर्मनीचा हुकूमशहा
(६) बॅरिस्टर जीना - स्वातंत्र्यसेनानी, पाकिस्तानचे पहिले राष्ट्राध्यक्ष.
(७) पेरियार ई. व्ही. रामस्वामी - थोर देशभक्त
(८) दिनमणी - तत्कालीन तमिळ वर्तमानपत्र,
(९) चिंचोके - चिंचेच्या बिया,
(१०) मशीद- मुस्लिमांचे प्रार्थनास्थळ
(११) अहंमद जलालुद्दीन- ठेकेदार व डॉ. कलामांचा मेहुणा.
(१२) जोहरा - डॉ. कलामांची बहीण.
(१३) आणीबाणी- देशातील निर्वाणीची परिस्थिती.
(१४) धनुष्कोडी- तमिळनाडूमधील एक गाव.
(१५) रामनाथपुरम - तमिळनाडूमधील जिल्ह्याचे ठिकाण.
(१६) सीगल- स्थलांतर करणारे समुद्रपक्षी.
(१७) पंबन- तमिळनाडूतील एक गाव.
(१८) दुसरे महायुद्ध - १९३९ ते १९४२ मधील जागतिक युद्ध,
(११) श्वार्झ हायस्कूल - रामनाथपुरम येथील डॉ. कलाम यांची शाळा.
(२०) कलेक्टर- जिल्हाधिकारी
•वाक्प्रचार व त्यांचे अर्थ•
(१) उत्तेजन देणे - प्रोत्साहन देणे.
(२) प्रभाव असणे - ठसा असणे.
(३) सामील होणे - सहभागी होणे.
(४) ओढावेढे घेणे - अनिच्छा व्यक्त करणे.
(५) जीव रमणे - आवडीने करणे.
(६) त्याग करणे - सोडून देणे.
संकलित मूल्यमापन
१. चार-पाच वाक्यात उत्तरे लिहा.
(१) लेखकाच्या लहानपणी लोक वर्तमानपत्र कशासाठी वाचत असत ?
उत्तर: लेखकाच्या लहानपणी लोक वर्तमानपत्र वेगवेगळ्या कारणासाठी वाचत असत. काही जणांना स्वातंत्र्य चळवळीची वाटचाल समजण्यात महत्व वाटे. काहीजणांना भविष्य जाणून घेण्यात रस होता . जिज्ञासूना हिटलर, महात्मा गांधी, बॅरिस्टर जीना यांच्या जीवनाबद्दल माहिती हवी असायची. काहींना बाजार भाव समजण्यात उत्सुकता होती. तर काहीजणांना पेरियार ई. व्ही. रामस्वामी यांच्या चळवळी बद्दल जाणून घेण्यात रस होता.....
(२) लेखकाला आयुष्यातील पहिली कमाईची संधी कशी मिळाली ?
उत्तर: शमसुद्दीन हा रामेश्वरममधला वृत्तपत्रांचा वितरक होता. पूर्वी 'पंबन' गावाहून वृत्तपत्रांचे गठ्ठे रामेश्वरममध्ये येत नंतर युद्धामुळे येणारी पंबन हुन येणारी रेल्वेगाडी रामेश्वरमला थांबत नसे. तेव्हा चालत्या रेल्वेगाडीतून वर्तमानपत्रांचे गठ्ठे रामेश्वरम ते धनुष्कोडी दरम्यान खाली फेकले जात. ते गठ्ठे गोळा करण्यासाठी शमसुद्दीनला कुणितरी मदतनीस हवा होता. त्याने लेखकाला या कामात मदतनीस म्हणून घेतले. अशा प्रकारे लेखकाला आयुष्यातील पहिल्या कमाईची संधी मिळाली .
(३) डॉ. अब्दुल कलाम शिक्षणासाठी बाहेरगावी जाताना वडील त्यांना काय म्हणाले?
उत्तर : पुढील शिक्षण घेण्यासाठी जेव्हा डॉ. कलाम यांनी वडिलांकडे रामनाथपुरमला जाण्याची परवानगी विचारली , तेव्हा वडील त्यांना म्हणाले की, तुला मोठे व्हायचे असेल, तर गाव सोडून शिक्षणासाठी बाहेर जायलाच हवे. सिगल पक्षी घरटे सोडून एकटे दूरवर उडत जातात व नवे प्रदेश शोधतात. तसे या मातीचा व इथल्या आठवणीचा मोह तुला सोडावा लागेल. तुझ्या इच्छा जेथे पूर्ण होतील, तिथे तुला जायला हवे. आम्ही आमच्या प्रेमाने तुला बांधून ठेवणार नाही. आमच्या गरजा तुझा रस्ता अडवणार नाहीत.
(४) रामनाथपुरमला लेखकाचा जीव का रमत नव्हता?
उत्तर : रामनाथपुरमन्ना नेहमी गजबज असायची. रामेश्वरमला जसा एकजिनसीपणा होता, तसा इथे नव्हता. त्यातूनच लेखकाला घराची ओढ अस्वस्थ करायची. रामनाथपुरमला असलेल्या शिक्षणाच्या खूप संधीपेक्षा आईच्या हाताच्या गोड पोळ्यांची ओढ लेखकाला मोलाची वाटत असे. या सर्व कारणांमुळे रामनाथपुरमला लेखकाचा जीव रमत नव्हता.
२. नावे लिहा :
(१) डॉ. कलाम यांना लहानपणी पुस्तके वाचण्यासाठी उत्तेजन देणारे - एस. टी. आर. मणिकम
(२) रामेश्वरपुरममधील वृत्तपत्रांचा वितरक - शमसुद्दीन
(३) 'तमिळ' वर्तमानपत्र - दिनमणी
(४) गावातला ठेकेदार - जलालुद्दीन
(५) रामनाथपुरमचे हायस्कूल - श्वार्झ हायस्कूल
मुक्तउत्तरी प्रश्न
तुम्हाला आई, वडील, बहीण, भाऊ ,, शेजारी, शिक्षक यांच्या सहवासामुळे काय काय शिकायला मिळते ?
उत्तर
आई - माया ,ममता ,संस्कार
बहीण - प्रेम, माया
भाऊ- प्रेम ,सहकार्य
शिक्षक- ज्ञानदान, प्रेमळपण शिस्त.
• (२) आई परगावी गेल्यावर कोणकोणत्या प्रसंगी तुम्हांला तिची आठवण येते?
• उत्तर: (१) दैनंदिन घरगुती कामे.
• (२) स्वयंपाक जेवण
• (३) आजारपण
• (4) अभ्यास
(३) तुम्ही कोणकोणती वर्तमानपत्रे वाचता? वर्तमानपत्रांतील कोणता भाग तुम्हाला वाचायला अधिक आवडतो? तो भाग का आवडतो ?
( सूचना या प्रश्नाचे उत्तर विद्यार्थ्यांनी स्वतः लिहावे )
(४) तुमच्या आई-वडिलांना तुम्ही मोठेपणी कोण व्हावे असे वाटते? ते होण्यासाठी तुम्ही कोणकोणते प्रयत्न कराल ?
( सूचना: या प्रश्नाचे उत्तर विद्यार्थ्यांनी स्वतः लिहावे )
भाष्याभ्यास व व्याकरण
• प्रश्न पुढील शब्दांत लपलेले शब्द शोधा.
(१) परवानगी- पर, रवा , रवानगी, वार, वानगी, नर, नवा
(२) हजारभर- हर ,हजार ,रजा, भजा, भर
(३) एकजिनसी : एक जिनसी, जिन..
(४) जडणघडण - जड ,जडण ,जण ,घडण, घड, घण.
प्रश्न २. पुढील शब्द वापरून तुमच्या मनाने वाक्य तयार करा :
(१) वितरक - महादेव हा पुस्तकांचा वितरक आहे.
(२) गिऱ्हाईक - महादूच्या दुकानात खूप गिऱ्हाईक येतात.
(३)वर्तमानपत्र - दररोज वर्तमानपत्र वाचून माहिती मिळवावी.
(४) एकखांबी तंबू- सदाशिवचा धंदा म्हणजे एकखांबी तंबू आहे.
• प्रश्न : 'एकखांबी तंबू म्हणजे सर्व जबाबदारी एकाच व्यक्तीवर असणे. तसे पुढील शब्दांचे अर्थ घरातील मोठ्या व्यक्तीकडून माहीत करून घ्या. त्यांचा वाक्यांत उपयोग करा.
(१) कर्ताधर्ता - म्हणजे घरातील एकमेव कमावता माणूस, वाक्य – दहा माणसांच्या कुटुंबात महिपतराव हा एकच कर्ताधर्ता आधार आहे.
(२) खुशालचेंडू - चैनी माणूस.
वाक्य- रमेश काही काम करीत नाही. नुसता खुशालचेंडू आहे.
(३) लिंबूटिंबू - अगदी किरकोळ, सामान्य माणूस.
वाक्य – हॉलीबॉलच्या संघामध्ये संदेश अगदीच लिंबूटिंबू आहे.
(४) व्यवस्थापक - व्यवस्था पाहणारा , नियोजन करणारा वाक्य - सदाशिव हा सिनेमागृहाचा व्यवस्थापक आहे.
प्रश्न ४. विरुद्धार्थी शब्द लिहा
(1) सुशिक्षित x अशिक्षित
(2) योग्य x अयोग्य
(3) बाहेर X आत
(4) शक्य x अशक्य
(5) सुरक्षित x असुरक्षित
(6) विश्वास x अविश्वास
(7) दयाळू x क्रूर
(8) दृश्य x अदृश्य
• प्रश्न ५. पुढे काही सामान्यनामे, विशेषनामे व भाववाचकनामे दिली आहेत. पुढील तक्त्यात त्याचे
वर्गीकरण करा.
देशमुख, चांगुलपणा, कडधान्य, कळसूबाई, पर्वत, वात्सल्य, शिखर, फूल, नवलाई, आडनाव, माणुसकी,
हिमालय, मुलगी, नम्रता, जास्वंद, मटकी, सविता
उत्तर :
सामान्यनामे :- कडधान्य, पर्वत, शिखर, फूल, नवलाई, आडनाव, हिमालय,
विशेषनामे- सविता, देशमुख, कळसूबाई, हिमालय, जास्वंद, मटकी.
भाववाचक नामे :- माणुसकी, चांगुलपणा, वात्सल्य, नवलाई ,नम्रता
• प्रश्न ६. पुढील चित्रांच्या/ शब्दाच्या समोर सामान्यनाम विशेषनाम, भाववाचकनाम लिहा :
उदा. • सामान्यनाम :- फूल
विशेषनाम :-गुलाब भाववाचक नाम :- सौंदर्य
(१) सामान्यनाम
विशेषनाम
भाववाचकनाम
(२) सामान्यनाम :- कुत्रा
विशेषनाम :- मोती
भाववाचक नाम:- इमानीपणा
• प्रश्न ७ पुढे दिलेल्या वाक्यांतील अधोरेखित / ठळक नामांचे प्रकार ओळखा ::
(१) मनाली मुंबईहून तिच्या गावी गेली.
(२) मुलांच्या हलगर्जीपणामुळे इस्त्रीची वायर जळाली.
(३) सुधीरला पुरणपोळी आवडते.
(४) ताजमहालचे सौंदर्य काही निराळेच आहे.
उत्तरे (१) मनाली- विशेषनाम,
मुंबई -विशेषनाम,
गाव- सामान्यनाम
(२) मुलांच्या- सामान्यनाम ,
हलगर्जीपणा -भाववाचकनाम, इस्त्री- सामान्यनाम,
(३) सुधीर- विशेषनाम, पुरणपोळी - विशेषनाम
(४) ताजमहाल -विशेषनाम, सौंदर्य -भाववाचक नाम
२. लेखन विभाग
• आंतरजालाच्या साहाय्याने डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्याबद्दल पुढील मुद्दयांच्या आधारे माहिती मिळवून लिहा.
(अ) पूर्ण नाव
(आ) आई-वडिलांचे नाव
(इ) जन्मतारीख
(ई) जन्मगाव
(उ) शिक्षण
(ऊ) भूषवलेली पदे
(ए) लिहिलेली पुस्तके.
३. तोंडी परीक्षा
प्रश्न. पुढील प्रश्नांची तोंडी उत्तरे सांगा :
(१) तुम्हांला वाचन करायला आवडते का?
(२) तुम्ही कोणकोणती पुस्तके वाचली आहेत ?
(३) त्यांतील कोणते पुस्तक तुम्हाला सर्वात जास्त आवडले? का?
आकारिक मूल्यमापन
१. वाचन
पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक १२ वरील
(१) सारे हसूया (२) वाचा (३) सुविचार हे मजकूर वाचा.
२. लेखन :
●तुम्हाला आवडलेल्या पुस्तकातील चार वाक्ये लिहा.
३. श्रुतलेखन :
• पुढील शब्द असेच लिहा
दुर्मीळ, क्रांतिकारक, राष्ट्रभक्त, वृत्तपत्रे, ग्रामसभा, महत्त्व, भविष्य, उत्सुक, जिज्ञासू, बॅरिस्टर, गिऱ्हाईक, दूरस्थ, दृश्य, युद्ध, कष्ट, स्वयंशिस्त, सर्जनशीलता, स्रोत, इच्छा, कर्तव्य, निःसंशय.
४. उपक्रम
(१) सीगल पक्षी नवे प्रदेश शोधतात व तेथे काही काळ वास्तव्य करतात. हे सीगल पक्ष्यांचे वैशिष्ट्य आहे. तशी पुढील पक्ष्यांची वैशिष्ट्ये शिक्षकांच्या मदतीने माहीत करून घ्या व लिहा :
(अ) फिनिक्स (आ) हंस (३) बगळा (ई) गरुड.
पक्षी आमचे मित्र माहितीसाठी क्लिक करा
(२) भारतीय शास्त्रज्ञांची माहिती मिळवा, त्यांची चित्रे व माहिती यांचे तक्ते तयार करून शिक्षकांना दाखवा आणि वर्गात लावा.
५. प्रकल्प
• तुम्हांला माहीत असणाऱ्या वेगवेगळ्या भाषांतील वर्तमानपत्रांच्या नावांची यादी करा.
वर्तमानपत्र यादी वाचा व वर्तमानपत्र देखील वाचा
Comments
Post a Comment