6म२- सायकल म्हणते मी आहे ना !
पाठ २- सायकल म्हणते मी आहे ना !
पाठाचा आशय :
लहानांपासून मोठ्यांपर्यंत सहज वापरता येणारे वाहन म्हणजे सायकल. पर्यावरण व आरोग्याच्या दृष्टीने हितकारक, कमी खर्चिक, वापरण्यात सहजता असलेली सायकल स्वतः आपली माहिती या पाठातून सांगत आहे. हा एक आत्मकथनात्मक पाठ आहे.म्हणजे सायकलचे हे आत्मकथन आहे. सायकलमध्ये कसकसे बदल होत गेले हे सायकलने आपल्याला सांगितले आहे असे वाटते . तसेच पर्यावरण व आरोग्याच्या दृष्टीने सायकल हितकारक आहे. सायकल चालवण्याचे वैयक्तिक, सामाजिक व राष्ट्रीय फायदे खूप आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर सायकलचा उपयोग केला जातो.
पाठाचे मोठ्याने वाचन करा.
शब्दार्थ
शब्दार्थ जन्मदाते-जन्म देणारे.
पाठाचे मोठ्याने वाचन करा.
शब्दार्थ
शब्दार्थ जन्मदाते-जन्म देणारे.
प्रचार-सर्वत्र माहिती करून देणे.
प्रसार-सर्वत्र माहीत होणे.
हमखास-निश्चितपणे.
खरचटणे-अंगावर ओरखडे येणे.
दुखापत-इजा.
परवाना- परवानगी .
सडपातळ- अंगाने शेलाटी, बारीक चणीची.
आडरस्ता-गल्ली.
सुखद- सुखकारी, आनंदाचा .
कार्यक्षम- काम करण्यास लायक.
तंदुरुस्त-चुस्त, ठाकठीक.
प्रतिकार शक्ती-विरोध करण्याची ताकद.
लाभदायक- फायदेशीर.
माफक -किफायतशीर, परवडेल अशी.
समस्या-अडचणी.
क्षेत्र-विभाग.
टिपा
(१) फ्रान्स-युरोपातील एक देश.
(२) पॅरिस-फ्रान्सच्या राजधानीचे शहर,
(३) पेडल-सायकलला गती देण्यासाठी पाय ठेवण्याचे साधन.
(४) दंततबकडी -सायकलच्या मागचे चाक चालवण्यासाठी जी साखळी अडकवली जाते, ते दातेरी चक्र.
(५) फुप्फुसे - हवा शुद्ध करण्याचे छातीतील अवयव.
(६) मांसपेशी-स्नायू.
(७) मेद-कातडीची जाडी, चरबी.
(८) चलन - रुपयांच्या नोटा किंवा नाणी.
(९) वायू प्रदूषण - हवेची अशुद्धता, हवेत हानिकारक घटक मिसळणे.
वाक्प्रचार व त्यांचे अर्थ
(१) रखडत चालणे -अडखळत चालणे.
(२) दुखापत होणे- इजा होणे.
(३) धडा शिकणे- अद्दल घडणे, समज येणे.
(४) स्वार होणे--वर मांड ठोकणे.
(५) परवाना काढणे - दाखला काढणे, लेखी परवानगी मिळवणे
(६) हातभार लावणे - मदत करणे.
(७) कोंडी होणे -गर्दीत अडकणे, गर्दीमुळे अडकून पडणे.
टिपा
(१) फ्रान्स-युरोपातील एक देश.
(२) पॅरिस-फ्रान्सच्या राजधानीचे शहर,
(३) पेडल-सायकलला गती देण्यासाठी पाय ठेवण्याचे साधन.
(४) दंततबकडी -सायकलच्या मागचे चाक चालवण्यासाठी जी साखळी अडकवली जाते, ते दातेरी चक्र.
(५) फुप्फुसे - हवा शुद्ध करण्याचे छातीतील अवयव.
(६) मांसपेशी-स्नायू.
(७) मेद-कातडीची जाडी, चरबी.
(८) चलन - रुपयांच्या नोटा किंवा नाणी.
(९) वायू प्रदूषण - हवेची अशुद्धता, हवेत हानिकारक घटक मिसळणे.
वाक्प्रचार व त्यांचे अर्थ
(१) रखडत चालणे -अडखळत चालणे.
(२) दुखापत होणे- इजा होणे.
(३) धडा शिकणे- अद्दल घडणे, समज येणे.
(४) स्वार होणे--वर मांड ठोकणे.
(५) परवाना काढणे - दाखला काढणे, लेखी परवानगी मिळवणे
(६) हातभार लावणे - मदत करणे.
(७) कोंडी होणे -गर्दीत अडकणे, गर्दीमुळे अडकून पडणे.
(८) धूम ठोकणे- पळून जाणे.
सायकल विषयी अधिक माहिती
सायकल विषयी अधिक माहिती
सायकल चालवण्याचे वैयक्तिक फायदे :
सायकलिंगमुळे व्यायाम होऊन शारीरिक व मानसिक आरोग्य सुधारते. हार्ट अटॅक, मधुमेह, लठ्ठपणा, पक्षघात यासारखे आजार कमी होण्यास मदत होते. पर्यायाने निरोगी राष्ट्र निर्माण होण्यास मदत होते. सायकल चालवणे सोपे असते, सायकलिंगमुळे पार्किंग समस्या होत नाहीत, वाहतुकीची कोंडी (ट्रॅफिक) होत नाही, जीवघेणे अपघातही होत नाहीत.
सायकल चालवण्याचे सामाजिक फायदे :
सायकल चालवण्यामुळे शरीराचा व्यायाम होऊन आरोग्य सदृढ राहते त्याचप्रमाणे सायकल चालवण्याचे सामाजिक फायदेही अनेक आहेत. सायकलमुळे पर्यावरणाची हानी कमी होते, इंधन लागत नाही, प्रदूषण होत नाही, अपघातांचे प्रमाण कमी होते, वाहतूक कोंडी होत नाही असे सायकलचे सामाजिक फायदे होतात.
सायकलचे सामाजिक फायदे :
सामाजिक आरोग्याचा दर्जा सुधारतो.. सायकलिंगमुळे व्यायाम होऊन शारीरिक व मानसिक आरोग्य सुधारते. हार्ट अटॅक, मधुमेह, लठ्ठपणा, पक्षघात यासारखे आजार कमी होण्यास मदत होते. पर्यायाने सामाजिक आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते.
वाहतुकीचे प्रश्न कमी होतात...........
सायकल चालवणे सोपे असते, सायकलमुळे वाहतुकीची कोंडी (ट्रॅफिक जाम) होत नाहीत तसेच पार्किंगच्या समस्याही होत नाहीत. याशिवाय जीवघेणे अपघातही होत नाहीत. सायकलमुळे रस्ते खराब होण्याचे प्रमाणही इतर वाहनांच्या तुलनेत कमी असते. त्यामुळे रस्ते व वाहतुकीचे प्रश्न कमी होण्यास सायकलमुळे मदत होते.
इंधन लागत नाही............
सायकल चालवण्यासाठी पेट्रोल-डिझेल यासारख्या इंधनाची गरज नसते त्यामुळे इंधनाची मागणी कमी होऊन आखाती देशात जाणारा इंधनासाठी जाणारा पर्यायाने समाजाचा पैसा वाचण्यास मदत होते ....
पर्यावरणाचे रक्षण होते..............
सायकलच्या वापरामुळे पर्यावरणाचे रक्षण होते. कारण सायकलिंगसाठी इंधन लागत नसल्याने हवेचे प्रदूषण होत नाही. तसेच सायकलिंगमुळे ध्वनिप्रदूषणही इतर वाहनांच्या तुलनेत फारचं कमी होते. तसेच सायकल खरेदी करण्याचा आणि देखभालीचाही खर्च हा इतर वाहनांच्या तुलनेत अत्यंत कमी आहे.
अशाप्रकारे सायकल वापरण्याचे अनेक सामाजिक फायदे असतात.
Comments
Post a Comment