6म६. पण थोडा उशीर झाला....
६. पण थोडा उशीर झाला....
- संदीप हरी नारे (पाठ्यपुस्तक पान क्र. २१)
• पाठ परिचय
हिमालयातील काश्मीरच्या सीमेवर कारगील येथे एक तरुण सैनिक जागता पहारा ठेवून देशाचे रक्षण करीत आहे. त्याला आई आजारी असल्याचे पत्राने कळते. तो आईला बघण्यासाठी गावी येतो, पण त्या आधीच त्याची आई मरण पावलेली असते. देशप्रेम आणि आईची ओढ याचा हृदयद्रावक प्रसंग या पाठात वर्णिला आहे.
शब्दार्थ
सरहद - सीमा,
खडतर - कठीण, अवघड.
दुर्गम - जाण्यास कठीण
धगधगणारी - पेटत असलेली.
तणावपूर्ण- ताण असलेली
प्रतिकूल - अनुकूल नसलेली (परिस्थिती)
जीवघेणा- अत्यंत श्रासदायक
सुखावह - आनंदाचा,
आल्हाददायी - प्रसन्न,
पहाड - पर्वत, डोंगर
हिरवाकंच - गडद हिरवा रंग,
वसुधा - पृथ्वी भूमी.
रमणीय - सुंदर
अक्षरश: - खरोखर,
पोलादी छातीचा- निधड्या छातीचा, निर्भय
पाझरून- वितळून
जोशात - जोमाने
डाग - ठिपका
पाव्हणारावळा - नातेवाईक.
उमगायचं - कळायचं.
हळवी - मनाने कोमल, हळुवार मनाची.
व्रण - सुकलेली जखम , जखम बारी झाल्यानंतर दिसणारी खूण
माउली - आई माता,
बांधव - भावंडे, भाऊ.
सांगावा – निरोप,
दुखणं – आजार,
अंतरंग - मन,
कसाबसा - कसातरी
लेकरू-बाळ, मुलगा,
आसुसलेल्या - ओढ असलेल्या
विपरीत - वाईट.
ताडणे - लक्षात घेणे.
भाऊबंद - भावकितील लोक, नातेवाईक, आप्तेष्ट, भावकी.
टिपा
(१) कारगील - काश्मीर सरहद्दीवरील भारताचे एक ठाणे. (२) बटालियन - सैन्याची तुकडीं.।
(३) चंद्रमणी- चंद्रप्रकाशाने पाझरणारे काल्पनिक रत्न,
(४) बंकर - खणलेल्या खड्डयात सैनिकांची बसण्याची
जागा.
(५) वेस - गावची सीमा, गावचे प्रवेशद्वार
(६) पार - झाडाभोवती बांधलेला ओटा
(७) ट्रंक- पूर्वीची पत्र्याची पेटी,
(८) पडवी - अंगण व माजघर यांमधला चौकोनी उंचवटा. (९) मेजर - सैन्यामधील एक हुद्दा.
वाक्प्रचार व त्यांचे अर्थ
(१) सेवा बजावणे- सेवेचे कर्तव्य पार पाडणे.
(२) पुरून उरणे - तावूनसुलाखून निघणे, परिस्थितीवर मात करणे,
(३) परिधान करणे- अंगात घालणे.
(४) मन उल्हसित करणे - मन प्रसन्न करणे.
(५) झुंबड उडणे - एकच गर्दी होणे.
(६) तुटून पडणे - धावून जाणे.
(७) पाठीवर आधाराची थाप पडणे - पाठिंबा मिळणे.
(८) कामावर खडे होणे - कामावर रुजू होणे.
(९) मन चंद्रमण्यासारखे पाझरणे - मन कोमल हळवे होणे.
(१०) आठवणींना उजाळा देणे - पुन्हा स्मरण करणे,
(११) अंथरुण धरणे - आजारात खिळून राहणे.
(१२) जीव तीळ तीळ तुटणे - हुरहूर दाटणे, काळीज कुरतडणे
(१३) आठवणी फेर धरणे आठवणींनी मन घेरणे
(१४) बलिदान देणे - प्राण समर्पित करणे,
(१५) ऊर अभिमानाने फुलून घेणे - मन गवने फुलणे
(१६) अंतरंगाचा ठाव घेणे - मनात खोलवर रुतणे.
(१७) ढसाढसा रडणे- ओक्साबोक्शी जोराने रडणे
(१८) डोळ्यांतले पाणी न हटणे - कायम अश्रू वाहत राहणे. (१९) जीव घाबराघुबरा होणे - खूप भीती वाटणे,
(२०) मन सैरभैर होणे - मनात बेचैनी दाटणे.
(२१) मन हेलावणे- मन गलबलणे
(२२) मंजूर करणे - परवानगी मिळणे.
(२३) वाटेला लागणे - प्रवासाला सुरुवात करणे.
(२४) कुशीत घेणे - पोटाशी घेणे, माया करणे
(२५) लाड करणे - कौतुक करणे.
(२६) विचारांचे काहूर माजणे - विचारांनी मन घेरणे
(२७) कावराबावरा होणे- भीतीने इकडेतिकडे पाहणे.
(२८) विपरीत पडणे वाईट होणे.
(२९) मान खाली घालून बसणे - दुःखाने व्यथित होणे.
(३०) कानोसा घेणे -अंदाज घेणे, मागोवा घेणे.
(३१) मन आतुरणे-मन उत्सुक होणे,
(३२) गळ्यात पडणे- गळामिठी मारणे.
संकलित मूल्यमापन
९. प्रश्नोत्तरे
• प्रश्न १. दोन-तीन वाक्यांत उत्तरे लिहा.
(१) लेखकाला सैनिकाच्या आयुष्यातील प्रचंड अवघड काम कोणते व का वाटते ?
उत्तर : अतिशय खडतर हवामानाच्या दुर्गम प्रदेशातील ठिकाणी सेवा बजावणे, हे सैनिकाच्या आयुष्यातील प्रचंड अवघड काम असते. अतिशय थंड हवामान व सतत धगधगणारी तणावपूर्ण सीमा या प्रतिकूल स्थितीत ही सेवा करायची असते, म्हणून ते प्रचंड अवघड काम असते.
(२) पोस्टमन आल्यावर बटालियनमध्ये झुंबड का उडत असे?
उत्तर : सरहद्दीवरचे सैनिक आपापल्या गावापासून खूप दूर एकटे असायचे. प्रत्येकाला गावची ओढ असायची. गावाकडून आलेले पत्र त्यांना दिलासा देत असे. म्हणून आठ-पंधरा दिवसांतून एकदा पोस्टमन आला की गावची खुशाली कळावी म्हणून बटालियनमध्ये सैनिकांची झुंबड उडत असे.
(३) गावाकडचा सांगागा ऐकून लेखकाची अवस्था कशी झाली?
उत्तर : गावाकडून आलेल्या सुखदेवने लेखकाला गावाकडचा सांगावा सांगितला. लेखकाची आई खूप आजारी होती.आईने त्याच्यासाठी निरोप पाठवला होता. तिचा प्रत्येक शब्द लेखकाच्या मनाचा ठाव घेत होता, त्याचे मन ढसाढसा रडत होते. डोळ्यात एकसारखे अश्रू ओघळत होते. लेखकाचा जीव घाबराघुबरा होऊ लागला व मन सैरभैर झाले.
• प्राप्त २. का ते लिहा.
(१) कारगीलमधील उन्हाळा लेखकाला सुखावह आणि आम्हाददायी वाटतो .
उत्तर : कारगील सीमेवरचा पावसाळा व हिवाळा जीवघेणाअसतो. परंतु उन्हाळ्यात पहाडावर बर्फ वितळते. पर्वत रांगा गडद हिरव्या रंगाने नटून जातात. जणू धरतीने हिरवागार शालू नसला आहे, असे वाटते. अशा रमणीय निसर्गामुळे लेखकाला कारगीलमधील उन्हाळा लेखकाला सुखावह आणि आम्हाददायी वाटतो .
(२) लेखकाने आपल्या पत्नीच्या पत्राला बोलके पत्र म्हटले आहे.
उत्तर : लेखकाला पत्नीने जे अंतर्देशीय पत्र पाठवले होते, त्यात मजकूर नव्हताच .फक्त पत्नीच्या अश्रुंचे सुकलेले डाग होते. त्या डागावरून त्याच्या आईची खालावलेली तब्येत लिखाणाशिवाय कळली. ते पत्र माजकुरविना खूप काही बोलून गेले, म्हणून लेखकाने आपल्या पत्नीच्या पत्राला बोलके पत्र म्हटले आहे.
(३) गावाकडे जाताना रस्ता कटता कटत नव्हता, असे लेखकाला वाटले.
उत्तर : - आईची आजाराची बातमी कळताच लेखक सामानाचा पसारा आवरून गावाला जायला निघाले. आठ - दहा दिवसांचा प्रवास होता. वेळ सरता सरत नव्हता. आईला कधी एकदा पाहीन असे लेखकाला झाले होते. तिच्या मायेच्या स्पर्शासाठी लेखक आतुर झाले होते. त्या त्याच्या अस्वस्थ झालेल्या मनःस्थितीमुळे गावाला जाताना
रस्ता कटता कटत नव्हता, असे लेखकाला वाटले.
(४) पण थोडा उशीर झाला.. असे लेखकाने म्हटले आहे.
उत्तर :- आजारी आईला पाहण्यासाठी जेव्हा लेखकाने गावच्या वेशीत प्रवेश केला, तेव्हा सगळे गावकरी त्याच्याकडे कावरेबावरे होऊन पाहू लागले. लेखक हातातली ट्रंक टाकून घराच्या दिशेने धावले. वाड्याच्या दरवाजात बहिणी त्याच्या गळ्यात पडून रडू लागल्या सर्व भाऊबंद माना खाली घालून बसले होते. लेखकाची नजर आईला शोधण्यासाठी घरभर फिरत होती. मन आतूर झाले होते. पण लेखकाला जाणीव झाली की आई यापुढे कधीच त्याला दिसणार नव्हती. ती लेखकाला न भेटताच जग सोडून गेली होती; म्हणून थोडा उशीर झाला... असे लेखकाने म्हटले आहे.
• प्रश्न ३. वसुंधरेचे व सैनिकाच्या मनाचे वर्णन करणारी तुम्हाला आवडलेली वाक्ये पाठातून शोधून लिहा.
उत्तर :
वसुंधरा :- उन्हाळ्यात पहाडावरील बर्फ वितळून पर्वतरांगा हिरव्याकंच रंगाने नटून जातात; जणू वसुधेने हिरवागार शालू परिधान केला आहे.
सैनिकाचे मन - रमणीय निसर्ग आमचे मन उल्हसित करायचा. आलेलं पत्र वाचताना पोलादी छातीच्या
सैनिकाचं मन चंद्रमण्यासारखं पाझरून कधी वाहू लागायचं, ते समजायचं नाही. गावाकडच्या आठवणींना उजाळा देत पुन्हा नव्या जोशात आम्ही कामावर खडे व्हायचो.
● प्रश्न ४. कारगिल या ठिकाणचे विशेष वर्णन करणारे शब्द पाठात आलेले आहेत, ते आकृतीत लिहा.
कारगील
अतिशय खडतर हवामान
दुर्गम प्रदेश
अतिशय थंड हवामान
सतत धगधगणारी तणावपूर्ण सीमा
• सैनिक जसे देशाचे रक्षण करतात, तसे तुम्हांला आपल्या देशासाठी काय करावेसे वाटते?
• उत्तर : (१) चांगल्या नागरिकांचे कर्तव्य पार पाडणे,
• (२) देशाची मान खाली जाईल, असे कोणतेही काम न करणे.
• (३) राष्ट्रीय एकात्मता टिकवणे .
• (४) राष्ट्रप्रेमाचा प्रसार करणे.
भाषाभ्यास व व्याकरण
प्रश्न १ समानार्थी शब्द लिहा
वसुधा = पृथ्वी
रमणीय = सुंदर
दिवस = दिन
गाव = खेडे
अंतरंग = मन
माऊली = माता
प्रश्न २. विरुद्धार्थी शब्द लिहा.
धाकटा x थोरला
दिवस x रात्र
प्रतिकूल x अनुकूल
शक्य X अशक्य
उगवण x मावळणे
अवघड x सोपे
• प्रश्न पाव्हणेरावळे' यासारखे तुम्हाला माहीत असलेले जोडशब्द लिहा. त्या जोडशब्दांचा वाक्यात उपयोग करा.
उत्तर : (१) घाबराघुबरा :- जंगलातून एकट्याने जाताना जीव घाबराघुबरा होतो.
(२) कावराबावरा :- नदीला अचानक पूर आला. तेव्हा गावकरी कावरेबावरे झाले.
(३) सणवार :- श्रावण महिन्यात अनेक सणवार साजरे होतात.
(४) जेवणखावण :- पाहुणे आले की आई त्यांचे जेवणखावण करतेच.
प्रश्न ४. 'मन' शब्द असलेले पाठातील लिहा.
उत्तर : (१) मन उल्हसित करणे
(२) मन चंद्रमण्यांसारखे पाझरणे
(३) जीव तीळ तीळ तुटणे
(४) ऊर अभिमानाने फुलून येणे
(५) अंतरंगाचा ठाव घेणे
(६) जीव घाबराघुबरा होणे
(७) मन सैरभैर
(८) मन हेलावणे
(९) मन आतुरणे,
प्रश्न ५. पुढील वाक्यातील सर्वनामे ओळखून लिहा.
(१) मी बजावत असलेल्या देशसेवेची तिला जाणीव होती.
(२) तू आपल्या भारतमातेला जप.
(३) सगळे माझी नीट काळजी घेतात, मला जपतात.
उत्तरे : (१) मी ,तिला (२) तू ,आपल्या (३) माझी ,मला.
२. लेखन विभाग
• तुम्हांला एका सैनिकाची मुलाखत घ्यायची आहे. त्यासाठी प्रश्न तयार करा.
• उत्तर प्रश्न: (१) सैनिक व्हावे, अशी इच्छा तुम्हांला कधी व कशी निर्माण झाली ?
(२) सैनिक होण्यासाठी तुम्ही काय केले ?
(३) घरातील माणसांच्या प्रतिक्रिया काय होत्या ?
(४) सैनिक असण्याचा तुम्हांला अभिमान वाटतो का ?
(५) तुमच्या कामगिरीचा एखादा रोमहर्षक प्रसंग सांगा.
(६) तुम्ही देशातील तरुणांना काय संदेश दयाल ?
३. तोंडी परीक्षा
प्रश्न :- पुढील प्रश्नांची तोंडी उत्तरे सांगा :
(१) तुम्हांला सैनिक व्हायला आवडेल ? का?
(२) सैनिकाचा गणवेश कसा असतो, ते सांगा.
आकारिक मूल्यमापन
१. कृती :
• पोस्टातील पत्राचा प्रवास कसा होतो, ते माहीत करून घ्या.
२. शब्दकोडे :
• ओळखा पाहू !
(१) हात आहेत; पण हालवत नाही.
(२) पाय आहेत; पण चालत नाही.
(३) दात आहेत; पण चावत नाही..
(४) नाक आहे; पण श्वास घेत नाही.
(५) केस आहेत; पण कधी विंचरत नाही.
उत्तर:- (१)खुर्ची , (२)टेबल, (३)फणी, (४) सुई, (५) ब्रश
Comments
Post a Comment