7म 5भांड्यांच्या दुनियेत
५. भांड्यांच्या दुनियेत
पाठाचा परिचय
घन पदार्थ आणि द्रव पदार्थ साठवण्यासाठी भांड्यांची गरज आहे. भांडी ही गृहोपयोगी वस्तू आहे. पूर्वीच्या काळापासून माणसांनी यांचा वापर केला आहे. या भांड्यांचे अनेक प्रकार व पूर्वापार काळापाससून आत्तापर्यंत भांड्यांमध्ये झालेला बदल यांची माहिती भांड्यांच्याच तोंडून या पाठात मजेदार रीतीने सांगितली आहे.
मूल्य / शिक्षा / संदेश :
आपल्या अवतीभवती असलेल्या नित्य उपयोगी वस्तूंचा पूर्ण परिचय व्हावा , हे मूल्य पाठातून समजते . तसेच विद्यार्थ्याची कल्पनाशक्ती समृद्ध व्हावी , म्हणून निर्जीव वस्तूंचे मानवीकरण केले आहे. अशा प्रकारे अन्य नित्याच्या वस्तूंचा संवाद विदयार्थ्यांनी लिहावा , ही प्रेरणा दिली आहे.
शब्दार्थ
दुनिया- जग.
स्मितहास्य - हलकेसे थोडेसे हसू
सगेसोयरे - नातेवाईक
नित्योपयोगी - दररोज उपयोगात येणारी
वाडगे - वाटी
घडा - मडके, घागर
माठ - मडके,
भिंतीलगत- भिंतीला खेटून
भांडी संस्कृती - भांड्यांची परंपरा
प्रगल्भ -जाणकार
पाया - मूळ,
रत्नजडित - रत्नांनी मढवलेल्या
कलात्मक - अतिसुंदर
पर्याय - विकल्प
संमिश्र - मिश्रण केलेले
उपलब्ध होणारी - मिळणारी, प्राप्त होणारी
श्रम - कष्ट,
गृहिणी - घरातील स्त्री
पाखडणे - निवडणे.
जाळ - अग्नी , आग
सर्रास - सहज, बहुत करून
पंगत - ओळ, रांग,
अविभाज्य - अलग न करता येणारे
सफर - यात्रा , प्रवास .
काही टिपा
(१) कोठी - तळघरातील वस्तू साठवायची खोली.
(२) जाते - पूर्वीच्या काळाचे दळण दळण्याचे दगडी साधन. एकावर एक रचलेल्या गोल दगडी चकत्या.
(३) परात- तांबे, पितळ इत्यादी धातूंचे पसरट गोल काठ असलेले मोठे ताट ( पीठ मळण्यासाठी किंवा भाकरी थापण्यासाठी वापरतात )
(४) रांजण - उभट गोल अथवा डेरेदार मोठे मडके (पाणी साठवण्यासाठी पूर्वी वापरात होते)
(५) बुधला - उभा मध्ये फुगीर असलेला गडू
(६) तुंबे - भोपळ्याचा गर काढून बनवलेले पोकळ ,पसरट, गोल भांडे.
(७) आंतरजाल- इंटरनेटला मराठी प्रतिशब्द
(८) काठवट - पीठ मळण्यासाठी आणि भाकरी थापण्यासाठी वापरण्यात येणारी मोठी गोलाकार लाकडी परात.
(९) उखळ - धान्य कांडण्याचे पोकळी असलेले लाकडी वा दगडी जाड साधन
(१०) मुसळ - धान्य कांडण्याचे लाकडी उभे व मजबूत साधन,
(११) पाटा-वरवंटा - पसरट पंचकोनी टाकी लावलेला सपाट दगड व त्यावर वाटण वाटण्यासाठीचा गोल दंडाकृती दगड.
(१२) मेटेरियल कल्चर (साहित्य संस्कृती) - अनेक उपयोगी वस्तूंचा संचय करणारी मानवी परंपरा.
(१३) सिरॅमिक्स - चिनी मातीची भांडी.
(१४) किटली - तोटी असलेले चहा साठवण्याचे भांडे. (१५) सुरई - निमुळता उंच गळा असलेले धातूचे वा मातीचे भांडे.
(१६) शिसे, कासे (कांस्य), ॲल्युमिनिअम, हिंडालिअम - वेगवेगळे धातू,
१७) स्टेनलेस स्टील - लोखंडावर प्रक्रिया करून बनवलेला गंज न पकडणारा धातू
(१८) मॉनस्टिक भांडी - पदार्थ न चिकटणारी भांडी
(१९) कोटेड मेटल - एका धातूचा दुसऱ्या धातूवर लेप लावून तयार केलेली भांडी.
(२०) फुंकणी- चुलीतल्या लाकडाचा जाळ पेटवण्यासाठी बनवलेली पोकळ अशी लाकडाची अथवा धातूची नळी
(२१) घंगाळ - गोल पसरट ,मोठ्या तोंडाचे बाजूला कडी असलेले पाणी तापावण्यासाठी वापरत असलेले भांडे (टब)
(२२) बंब - पाणी तापावण्यासाठी तयार केलेले पूर्वीचे उचट गोलाकार पिंप.
(२३) पत्रावळी - पळसाच्या झाडाची पाने काडीने एकत्र टोचून तयार केलेले पसरट ताट.
(२४) द्रोण - पळसाच्या पानांची काडीने जोडून तयार केलेली वाटी
(२५) कासंडी (चरवी), कावळा, वाडगा टोप - दूध व दुधाचे पदार्थ साठवण्याची भांडी
(२६) बुडगुली, ओगराळी, पळी, तसराणी, कुंड - धातूंचे किंवा लाकडी वेगवेगळ्या आकारांचे चमचे .
वाक्प्रचार व त्यांचे अर्थ
(१) विराजमान होणे - आसनावर ऐटीत बसणे, स्थानापन्न होणे.
(२) मान डोलावणे - संमती देणे , होकार देणे
(३) प्रसार होणे - सर्वांना माहीत होणे, प्रचार होणे.
(४) खिशाला परवडणे- खर्च करण्याची ऐपत असणे, वस्तूची किंमत आवाक्यात असणे.
(५) आभार मानणे - धन्यवाद देंगे
संकलित मूल्यमापन
● प्रश्न १. पुढील विधानांमागील कारणांचा शोध घ्या.
(१) शेती व्यवसाय व स्थिर जीवनामुळे माणसाला भांड्यांची गरज पडली.
उत्तर : शेती व्यवसाय व स्थिर जीवनामुळे माणसाला अन्न शिजवण्यासाठी व आठवण्यासाठी भांडयांची गरज पडली.
(२) पूर्वी मोठ्या प्रमाणावर केळीच्या पानांवर जेवण्याची पद्धत होती.
उत्तर : लोखंडी भांडी किंवा तांब्या-पितळेची भांडी पूर्वी सर्वांना परवडणारी नव्हती. त्या वेळी स्टेनलेस स्टील भांड्यांचा शोधही लागला नव्हता. पूर्वी परसामध्ये केळी लावलेल्या असायच्या. केळीचे पान मऊ व लवचीक असते. भांडी धुण्या-घासण्याचा त्रास व वेळ वाचत असे. म्हणून पूर्वी मोठ्या प्रमाणावर केळीच्या पानांवर जेवण्याची पद्धत होती.
(३) आज घरोघरी मिक्सर वापरतात.
उत्तर : पाटा व वरवंटा या साधनांनी वाटण वाटण्याची पद्धत होती. मिक्सरमुळे काम, वेळ वाचतो व कष्ट कमी झाले. म्हणून आज परोघरी मिक्सर वापरतात.
(४) मातीच्या भांड्यांचा जास्तीत जास्त वापर करावा.
उत्तर : मातीपासून विविध आकारांची भांडी बनवणे शक्य आहे. शिवाय मातीची भांडी स्वस्त व मुबलक प्रमाणात मिळतात. तसेच मातीच्या भांड्यांतील पदार्थ टिकतात व ताजे राहतात. म्हणून मातीच्या भांड्यांचा जास्त वापर करावा.
प्रश्न २. आकृती पूर्ण करा
(१) मानवाने ज्या घटकांपासून भांडी बनवली ते घटक :-
(१)
(२)
(३)
(४)
(५)
(६)
(२) संवाद करणाऱ्या मुलामुलींची नावे :-
(१)
(२)
(३)
(४)
(५)
(३) संवादात भाग घेणाऱ्या वस्तूंची नवे :-
(१)
(२)
(३)
(४)
(५)
(६)
● प्रश्न ३. 'भांडी हे मानवी संस्कृतीचे अविभाज्य अंग आहे. या विधानाबाबत तुमचे मत स्पष्ट करा....
उत्तर :- भूक ही मानवाची मूलभूत गरज आहे. ती भागवण्यासाठी माणूस अन्नावर प्रक्रिया करतो . अन्न
शिजवण्यासाठी व साठवण्यासाठी माणसाला पूर्वापार भाड्याची गरज निर्माण झाली. स्वयंपाकघरात गरजेनुसार भांड्यांमध्ये विविधता येत गेली. जिथे जिथे मानवी समाज आहे , तिथे तिथे भांडी असणारच ! म्हणून भांडी हे मानवी संस्कृतीचे अविभाज्य अंग आहे.'
• प्रश्न ४. दोन दोन उदाहरणे लिहा
(१) मातीची भांडी
(२) चामड्यापासून बनवलेली भांडी
(३) लाकडी भांडी
(४) तांब्याची मांडी
(५) चिनी मातीची भांडी
(६) नॉनस्टिकची भांडी
(७) काचेची भांडी
प्रश्न ५. पाठातील पुढील उतारा वाचून त्याखालील कृती पूर्ण करा ::
पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक १९
(१) शब्दजाल पूर्ण करा
सुट्टीतील मुलांच्या धमाल करण्याच्या गोष्टी
उत्तरे :
(१) आंबे ,कलिंगड , ऊस खाणे
(२) विहिरीत पोहणे
(३) दुपारी घरात खेळणे
(२) चौकटी पूर्ण करा
(१) आजी-आजोबांच्या गावी गेलेले
(२) दुपारी मुले हा खेळ खेळत होती.
(३) आदिती येथे लपली
(४)अदितीने भावंडांना दाखवलेली वस्तु
उत्तरे :
(१) अरुण व अदिती
(२) लपाछपी
(३) कोटीच्या खोलीत
(४) जाते
● प्रश्न ६. यांना काय म्हणतात :
(१) जेवणासाठी पंक्तीत वापरण्यात येणारे ताट
(२) जेवणापूर्वी व जेवणानंतर हात धुवायचे भांडे
((३) दुधासाठीचे भांडे
(४) ताकासाठीचे भांडे
(५) पूर्वी अंघोळीसाठी वापरायचे भांडे
उत्तरे :-
(१)पत्रावळ
(२) तस्त
(३)चरवी
(४)कावळा
(५)घंगाळ
मुक्तोत्तरी प्रश्न
• (१) माठाला ओले, सुती कापड उन्हाळ्यात का गुंडाळतात?
उत्तर :- उन्हाळयात माठाला गुंडाळलेले ओले, सुती कापड माठाच्या आतील पाण्याची उष्णता शोषून घेते. त्यामुळे माठातील पाणी थंड राहते. म्हणून माठाला ओले, सुती कापड उन्हाळ्यात गुंडाळतात.
• (२) मातीचा माठ, गंजण जमिनीत का पुरतात ?
उत्तर: जमिनीतील खोल थरामध्ये पृष्ठाभागावरची उष्णता खाली झिरपत नाही, त्यामुळे माठ किंवा रांजण यातील पाणी थंड राहते. म्हणून मातीचा माठ रांजण जमिनीत पुरतात.
• (३) बांधकाम क्षेत्रात लोखंड या धातूचा उपयोग मोठ्या प्रमाणात का होत असावा ?
• उत्तर : लोखंडी वस्तू टिकाऊ असतात. लोखंड हे मजबूत असल्यामुळे इमारत दीर्घकाळ टिकण्यासाठी लोखंड या धातूचा उपयोग मोठ्या प्रमाणात होतो.
• (४) लोखंडाच्या कढईत वा तव्यात भाजी का करतात ? उत्तर : लोखंडाच्या कढईत किंवा तव्यात भाजी करतात कारण कमी इंधनात लोखंड जलद तापते व भाजी लवकर शिजते..
(५) चूल पेटवताना फुंकणीने अग्नीवर फुंकर का घातली जाते ?
उत्तर : फुंकणीने अग्नीवर फुंकर घातली की त्यातील हवेमुळे विस्तावावरची राख बाजूला होऊन चुलीत जाळ पटकन लागतो. शिवाय चूल पेटवताना आपले तोड जाळापासून दूर राहून शकते आणि भाजण्याचा धोका टाळतो.
भाषाभ्यास व व्याकरण
प्रश्न १ विरुद्धार्थी शब्द पाठातून शोधून लिहा :-
(१) मृत्यू x जन्म
(२) अस्थिर xस्थिर
(३) सुलट x उलट
(४) कठीण x सोपी
(५) निरुपयोगी x उपयोगी
(६) उष्ण x थंडगार
प्रश्न २. पुढील वाक्प्रचारांचा योग्य अर्थ निवडून लिहा. (सूचना: निवडलेला अर्थ ठळक अक्षरांत दिला आहे.)
(१) प्रसार होणे - माहीत होणे.
(अ) माहीत होणे (आ) माहीत नसणे (इ) माहीत करणे
(२) मान डोलावणे - संमती देणे.
(अ) नकार देणे (आ) विचार करणे (इ) संमती देणे
(३) विराजमान होणे- ऐटीत बसणे.
(अ) बैठक उचलणे (आ) ऐटीत बसणे (इ) विश्राम येणे
तक्ता भरा:
एकवचन:- गिरणी
अनेकवचन:- भांडी , जाती ,
प्रश्न ४. पुढील शब्द व शब्दसमूह योग्य बदल करून योग्य ठिकाणी वापरा व रिकाम्या जागा भरा :
(सूचना वापरलेले शब्द अधोरेखित केले आहेत.)
(अविभाज्य अंग, नित्योपयोगी विराजमान होणे, सगेसोयरे) (१) संत तुकारामांनी वृक्षांना सगेसोयरे संबोधून त्यांचा गौरव केला.
(२) नित्योपयोगी वस्तू जपून व व्यवस्थित ठेवाव्यात.
(३) आज शाळेतील ज्येष्ठ शिक्षक मुख्याध्यापक पदावर विराजमान झाले.
(४) कुटुंब हे मानवी जीवनाचे अविभाज्य अंग आहे
क्रियाविशेषण अव्ययाचे प्रकार
पुढील वाक्ये नीट वाचा आणि अधोरेखित क्रियाविशेषण अव्ययांकडे नीट लक्ष दया:-
(१) परवा मी मावशीकडे गेलो होतो.
['परवा' या क्रियाविशेषणातून काळ दर्शवला आहे. म्हणून हे कालवाचक क्रियाविशेषण अव्यय आहे.]
(२) पलीकडे नदी वाहते..
[' पलीकडे' या क्रियाविशेषणातून स्थळ दर्शवले आहे. म्हणून हे स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय आहे.]
(३) भरपूर पाऊस पडला.
[' भरपूर' या क्रियाविशेषणातून संख्या किंवा परिमाण दर्शवले आहे. म्हणून हे संख्यावाचक किंवा परिमाणवाचक क्रियाविशेषण अव्यय आहे.]
(४) सागर पटकन शाळेत गेला.
["पटकन " या क्रियाविशेषणातून जाण्याची रीत दर्शवली आहे. म्हणून हे रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय आहे. ]
वाक्यातील क्रिया केव्हा घडली, कोठे घडली, कितीवेळा घडली व कशी घडली यावरून क्रियाविशेषण अव्ययाचे प्रमुख चार प्रकार पडतात
(१) कालवाचक क्रियाविशेषण अव्यय
(२) स्थललवाचक क्रियाविशेषण अव्यय
(३) संख्यावाचक / परिमाणवाचक क्रियाविशेषण अव्यय
(४) रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय
(१) काही कालवाचक क्रियाविशेषण अव्यये:-
आता, आज, उदया, परवा, आधी, नंतर, सदा, नेहमी वारंवार, सतत, नित्य, दररोज, क्षणोक्षणी, यंदा, सध्या, तूर्त, हल्ली इत्यादी.
(२) काही स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यये:-
इथे, तिथे, जिथे , कोठे, खाली, वर, जवळ, मागे, पुढे, जिकडे , तिकडे, अलीकडे, सर्वत्र, समोरून इत्यादी.
(३) काही संख्यावाचक क्रियाविशेषण अव्यये:-
जरा , जास्त, कमी, थोडे, पुष्कळ, किंचित, क्वचित, अत्यंत बिलकूल, मुळीच, भरपूर, अतिशय , पूर्ण इत्यादी.
(४) काही रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यये : -
असे, तसे, जसे, कसे, पटकन, पटापट, टपटप, सावकाश, जलद, झटकन, आपोआप , मंद इत्यादी.
प्रश्न ५. कंसात दिलेल्या शब्दांचे क्रियाविशेषण अव्ययांचा प्रकारानुसार वर्गीकरण करा.
[तिथे दररोज, क्षणोक्षणी, सावकाश, तिकडे, अतिशय, पूर्ण, परवा, जरा, मुळीच, कसे, वर ,थोडा, सतत , झटकन]
उत्तर:-
(१) कालवाचक क्रियाविशेषण अव्यये-
क्षणोक्षणी , परवा, दररोज ,सतत.
(२) स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यये -
तिथे, तिकडे, वर
(३) संख्यावाचक क्रियाविशेषण अव्यये -
अतिशय, पूर्ण, जरा, थोडा
(४) रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यये:-
सावकाश, मुळीच , कसे, झटकन
* प्रश्न ६. पुढील चौकोनातील अक्षरांमध्ये क्रियाविशेषण अव्यये लपलेली आहेत. उभ्या आडव्या व तिरप्या पद्धतींनी अक्षरे घेऊन क्रियाविशेषण अव्यये तयार करा व दिलेल्या जागेत लिहा.
पान34 वरील फोटो
(१) हळू (२) आज (३) जरा (४) तसा (५) अनेक (६) तिकडे (७) थोडासा (८) जिकडे (९) वर (१०) खाली (११) मोजके (१२) काही (१३) सावकाश (१४) कदाचित
(१५)जसा (१६) तर
लेखन विभाग
• चर्चा करा. सांगा:-
(१) अंघोळीचे पाणी तापवण्यासाठी बंब वापरण्याचे प्रमाण कमी झाले आहे.
उत्तर : बंब तापवण्यासाठी लाकडे जाळावी लागतात. लाकडाचे इंधन अलीकडे तुटपुंजे आहे. लाकडे जाळल्यामुळे धूर होतो. त्याऐवजी सध्या विद्युतशक्तीवर सहज चालणारे गिझर वगैरे उपकरणे उपलब्ध आहेत. या सर्व कारणांमुळे हल्ली अंघोळीचे पाणी तापवण्यासाठी बंब वापरण्याचे प्रमाण कमी झाले आहे.
(२) दैनंदिन जीवनात चांदीची भांडी वापरण्याचे प्रमाण नगण्य आहे.
उत्तर : 'चांदी' हा धातू दुर्मीळ आहे. तसेच तो महागडा धातू आहे. चांदीची भांडी अग्नीवर काळी पडतात. ती पुन्हा चकचकीत करण्यासाठी खूप पैसे लागतात. चांदीची भांडी खर्चीक व खिशाला न परवड असल्यामुळे दैनंदिन जीवनात त्यांचा वापर नगण्य झाला आहे.
३. तोंडी परीक्षा
प्रश्न. पुढील प्रश्नांची उत्तरे सांगा :
(१) तुमच्या घरातील निरुपयोगी वस्तूंचे तुम्ही काय कराल, ते सांगा.
(२) तुमच्या घरी कोणत्या धातूची भांडी वापरतात ? का ?
आकारिक मूल्यमापन
१. प्रकट वाचन:
• पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक २४ वरील 'कल्हई म्हणजे काय ?' या मजकुराचे शिक्षकांना प्रकटवाचन करून दाखवा.
२. माहिती मिळवा :
(१) पत्रावळी तयार करण्यासाठी कोणकोणत्या झाडांची पाने वापरतात ?
(२) पत्रावळीची पाने एकमेकांना कशाच्या साहाय्याने जोडली जातात ?
(३) पूर्वी वापरत असलेल्या व आता वापरत असलेल्या पत्रावळींमध्ये कोणते बदल झाले आहेत ?
(४) भांडी बनवण्यासाठी घातूंचा वापर का सुरू झाला असावा ?
(५) चहाची किटली, कपबश्या, क्रोकरी चिनी मातीची किंवा सिरॅमिक्सची का असतात ?
३. उपक्रम
• तुमच्या घरातील सर्वांत जुन्या चार भांड्यांची चित्रे काढा व रंगवा.
४. प्रकल्प
• तुमच्या घरातील विविध भांड्यांची यादी तयार करा.
Comments
Post a Comment