७ मराठी 2स्वप्न विकणारा माणूस

 २. स्वप्न विकणारा माणूस

- अशोक कोतवाल


(पाठ्यपुस्तक पान क्र. २)

अशोक कोतवाल (१९६१): मौनातील पडझड', कुणीच कसे बोलत नाही हे कवितासंग्रह; प्रार्थनेची घंटा', सावलीचं घड्याळ' हे लतितलेख संग्रह: घेऊया गिरकी' हा बालकवितासंग्रह प्रसिद्ध.
पाठाचा परिचय : लेखकाच्या लहानपणी त्याच्या गावात एक स्वप्न विकणारा माणूस यायचा. तो पिंपळाच्या वर थांबायचा. जमलेल्या लोकांना तो मनोरंजक गोष्टी सांगायचा. त्याचे मजेदार किस्से ऐकताना लोक रंगन वे. तो आपल्या गाठोड्यातला खाऊ मुलांना दयायचा.
अचानक त्याचे येणे बंद झाले. गावकरी त्याची वाट पाहून थकले. काही वर्षांनंतर एक तरुण गावात आला.
स्वप्नविक्याचा मुलगा होता. लोकांची सेवा करण्याचे आपल्या वडिलांचे कार्य त्याने सुरू केले, बाबांसारखे गाव जाऊन आजारी लोकांची सेवा करण्याचे त्याने ठरवले होते. वडिलांचे अर्थवट राहिलेले स्वप्न त्याला करावयाचे होते.

संदेश/शिकवण/मूल्य : प्रत्येक माणसाची काही स्वप्ने असतात, ती आटोकाट प्रयत्न करून पूर्ण करावीत,
जाच्या उपयोगी पडतील अशी स्वप्ने असावीत, स्वतःच्या आनंदाबरोबरच जनहिताचा उदात्त हेतू मनात गावा, असा संदेश या पाठातून मिळती.
शब्दार्थ
श्रेष्ठ - उच्च प्रतीचे (इथे अर्थ) ज्येष्ठ माणसे, उत्पन्न निर्माण.
समृद्ध - वैभवशाली. दनशील - उत्कट (मन). स्वप्नपूर्ती - स्वप्न पूर्ण करणे, आदर्श- सर्व गुणांनी युक्त (माणूस). अधांतरी- म मा मध्ये. ध्यास - आस, ओढ. कास - कर्तव्य, कार्य. घातक - इजा करणारे, दगा देणारे, धिप्पाड - उंचापुरा, इदांड. ऐटीत - रुबाबात, डौलाने. भिन्न - वेगळे, विश्व - जग. किस्से मजेदार गोष्टी. दिलखेच - मनोहर. रितीरिवाज - चालीरीती, परंपरा, टिंगू मुले - लहान मुले. रिझवून - खूश करून, आतुरतेने - उत्सुक ने. अंगकाठी - देहयष्टी. निमित्त - तात्कालिक कारण, हेतु. ढब लकब, पद्धत, तीव्र - खूप. उमगलं- समजलं.
टिपा
(१)तलम रेशमी धोतर - अतिशय मुलायम रेशमाच्या धाग्यांनी विणलेले कमरेभोवती नेसायचे वस्त्र.
(२)जरीचा सैलसर कुडता - चकचकीत जर असलेला ढगळ सदरा.
(३) फेटा- डोक्यावर गुंडाळायचे पगडी सारखे मुंडासे.
(४) गव्हाळ रंग - गव्हासारखा फिकट तांबूस रंग.
(५) मखमल - तलम कापडाचा एक प्रकार.
(६) पिंपळाचा पार - पिंपळाच्या खोडाभोवती जमिनीलगत बांधलेला गोल दगडी ओटा.
(७) संस्कृती - काही विशिष्ट परंपरा व चालीरिती आचरणात आणणारा मानवी समाज..
(८) छटाक-पावशेर - पूर्ण वजन मापे.
(९) सुकामेवा - काजू, बदाम, बेदाणे, खारीक, खोबरे इत्यादी पौष्टिक पदार्थांचे मिश्रण.
वाक्प्रचार व त्यांचे अर्थ
(१) तुच्छ लेखणे - एखाद्याला कमी दर्जाचे समजणे.
(२) सल्ला देणे - योग्य मार्गदर्शन करणे.
(३) अभाव असणे -कमतरता असणे.
(४) गराडा पडणे - भोवतीने (माणसांचा) घेराव पडणे,
(५) फुलवून सांगणे - एखादी गोष्ट रंगवून सांगणे.
(६) मती कुंठित होणे- बुद्धी न चालणे, डोके सुन्न होणे.
(७) संभ्रमात पडणे - कोणतीही एक गोष्ट निश्चित न करता येणे; भ्रम निर्माण होणे.
(८) तल्लीन होणे - गुंग होणे, मग्न होणे, रंगून जाणे.
(९) घासाघीस करणे-वस्तूचा दर कमी करण्यासाठी बोलणे.
(१०) तरतरी पेरणे - उत्साह आणणे, उल्हसित करणे.
(११) टकामका पाहणे - लक्षपूर्वक एकटक पाहणे.
(१२) मनोमन ठरवणे -एखादा निश्चय मनात पक्का करणे.
(१३) गहिवरून येणे-  भावनेने मनात गलबलून येणे.

स्वाध्याय व प्रश्न-उत्तरे 

प्रश्न १ ला : तुमचे मत स्पष्ट करा, 
(अ) गावात येणाऱ्या माणसाला गावकरी 'सपनविक्या' म्हणत.
➤उत्तर➤
कारण गावात आलेला माणूस स्वतःच्या बोलण्याने गावक-यांना गुंगवून टाकायचा आणि गावकरी त्याने वर्णन केलेल्या प्रांतात । मनातच भटकून यायचे. जणू काही आपण स्वप्नातच आहोत,असे त्यांना वाटायचे. स्वतःचं स्वप्न तो गावक-यांच्या डोळ्यात उतरवायचा. म्हणून गावात येणाऱ्या माणसाला गावकरी 'सपनविक्या' म्हणत.

(आ) स्वप्न विकणाऱ्या माणसाचा गावात येण्यामागचा उद्देश.
➤उत्तर➤
गावात जाणं, तिथल्या लोकांना एकत्र जमवणं, त्यांच्याशी | बोलणं, आपले अनुभव, आपल्याजवळचं ज्ञान इतरांना सांगणं व दुस-यांना आनंद देणं. हाच स्वप्न विकणाऱ्या माणसाचा गावात येण्यामागचा उद्देश होता.

प्रश्न २ रा :स्वप्न विकणाऱ्या माणसाचे खालील मुद्द्यांच्या आधारे दोन-दोन वाक्यांत वर्णन करा.
➤उत्तर➤
1) त्याचा पेहराव
तलम रेशमी धोतर, त्यावर तसाच जरीचा सैलसर कुडता, - डोक्याला लाल-पांढरा फेटा, डोळ्यांवर चष्मा, पायांत । चामडी बूट. असा स्वप्न विकणाऱ्या माणसाचा पेहराव होता.

2) त्याचे बोलणे 
स्वप्न विकणाऱ्या माणसाच्या बोलण्यामध्ये गंमत असायची, कुतुहल असायचे. तो आपल्या बोलण्याने लोकांना तल्लीन करायचा. लोकं त्याने वर्णन केलेल्या प्रांतात मनातच भटकून यायचे. इतके हुबेहुब वर्णन स्वप्न विकणारा माणूस स्वतःच्या बोलण्यातून करायचा.
 3) त्याचे स्वप्न :
आपले अनुभव, आपल्याजवळचं ज्ञान इतरांना सांगावं, दुस-यांना आनंद द्यावा. हेच स्वप्न विकणाऱ्या माणसाचं स्वप्न होतं.

प्रश्न ३ रा : खालील आकृत्या पूर्ण करा.

(अ) स्वप्नांविषयी लेखकाचे मत 

(आ) स्वप्नाविषयी इतरांचे मत 


(इ) स्वप्न विकणाऱ्या माणसाच्या गाठोड्यातील वस्तू.



प्रश्न ४ था : स्वप्न विकणारा माणूस गावात आल्यापासून गाठोडे सोडेपर्यंतच्या घटनांचा ओघतक्ता तयार करा.
➤उत्तर➤
1) पिंपळाच्या पारावर थांबणे.
2) लोकांचा गराडा जमणे.
3) गप्पांमध्ये गावकऱ्यांना मंत्रमुग्ध करून स्वप्नात नेणे.
4) सोबतचे मखमली गाठोडे हळूच सोडणे.

-:खेळूया शब्दाशी :-

पार-झाडाच्या बुंध्याजवळ बसण्यासाठी सभोवताली बांधलेला ओटा.
पार - पलीकडे. असे 'पार' या शब्दाचे दोन अर्थ होतात. लक्षात ठेवा-संदर्भानुसार शब्दांचे अर्थ बदलू शकतात. खालील शब्दांचे त्यापैकी दोन अर्थ सांगा.
➤उत्तर➤
हार :  1) पराभव    2) फुलांची माळ 
कर:  1) करणे   2) हात 
वात :1) शरीराचा एक आजार 2) वायू
 
खाली दिलेले वाक्प्रचार व त्यांचे अर्थ यांच्या जोड्या जुळवा.

'अ' गट                           ➤उत्तर➤
1) मती कुंठित होणे.         ब) विचारप्रक्रिया थांबणे.
2) तरतरी पेरणे.               क) उत्साह निर्माण करणे.
3) गहिवरून येणे.            अ) कंठ दाटून येणे.  

▶️▶️▶️⚫⚫धन्यवाद⚫⚫◀️◀️◀️



Comments

Popular posts from this blog

HOME