८म 4नव्या युगाचे गाणे
कवितेची मध्यवर्ती कल्पना
अतिशय वेगाने घडणाऱ्या वैज्ञानिक प्रगतीमुळे मानवी जीवनात मोठी क्रांती घडून येत आहे. विज्ञानाच्या पाठिंब्यामुळे शून्यातून नवे विश्व उभारण्याची जिद्द मानवामध्ये निर्माण होत आहे, मानवी जीवनातील दैन्य दूर होत आहे, नव्या प्रगतीच्या आशा पल्लवीत होत आहेत, हे या कवितेतून कवीने स्पष्ट केले आहे.
विज्ञानाच्या प्रगतीमुळे नवे युग निर्माण झाले आहे निराशा झटकून आपण उत्कर्षाच्या मार्गावर पुढे चाल जाऊ असा विश्वास कवींनी या कवितेत व्यक्त केला आहे.
शब्दार्थ
अणूरेणू- पदार्थाचा अतिशय सूक्ष्म कण
प्रगटति - निर्माण होतात,
पुढती - पुढे
घडे - घडते आहे.
दिव्य- तेजस्वी
क्रांती - संपूर्ण बदल,
प्रभा- प्रकाश, आभा, तेज.
उभारू -उभी करू.
जिद्द - हिंमत
भव्य - प्रचंड
हृदयांतरिच्या- मनातल्या
अशांतता- अस्वस्थता, बेचैनी
वणवा - मोठी आग, भडका.
झणि -पटकन , लवकर
उत्कर्ष- भरभराट ,उन्नती.
मार्ग- रस्ता
चेतना - चैतन्य, उत्साह,
अंतरि - मनात.
स्फुरली- स्फुरण पावली, निर्माण झाली.
दुबळेपण - दुर्बल , हतबलता,
नैराश्य- निराशा,
तेज -प्रखर, प्रकाश.
मानवता -माणुसकी.
ज्वाला - आगीचे लोळ.
अमरत्व- मरण नाही असे, चिरंजीवित्व.
गुंफूया - ओळीने जोडूया , माळू या .
माला - हार, माळ
खिन्नता- उदासपणा, नाराजी.
दीनता - गरिबी, दैन्य,
झळकतो -झगमगाट
संघर्ष - लढा, लढाई, झुंज, संग्राम,
बहरतो -फुलतो
नसानसातून- रक्तवाहिन्यांतून
जोश- जोम, शक्ती, उत्साह,
उसळतो -उसळी घेतो.
चित्ती- मनात
युग- सुमारे शंभर वर्षांचा कालखंड.
होळी : एक मराठी सण (सर्व बुरसटलेले विचार व प्रथा होळी करून जाळून टाकल्या जातात)
वाक्प्रचार व त्याचा अर्थ
शून्यातून विश्व उभारणे - प्रतिकूल परिस्थितीतून नवनिर्मिती करणे.
कवितेचा भावार्थ
अणुरेणूच्या अतिसूक्ष्म कणाकणातून शब्द प्रकटत आहेत. 'जन हो, चला, चला पुढे चला.' विज्ञानाचे तेज आल्यामुळे दिव्य क्रांती घडत आहे. विज्ञानाचे नवीन युग अवतरले आहे. त्याची तेजस्वी आभा , प्रकाश सर्वत्र दिसते आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून शून्यातून नवीन जग निर्माण करण्याची प्रचंड हिंमत आम्हांला आली आहे.
मनामनात खोलवर असलेली अस्वस्थतेची अशांतीची मोठी आग पटकन विझली आहे कारण उन्नतीचा आणि प्रगतीचा नवा मार्ग सापडला आहे.
नवचैतन्य मनामनात स्फुरण पावल्यामुळे सगळी दुर्बलता नाहीशी झाली आहे. निराशेची होळी करून नवीन विचारांचे तेज अवतरले आहे. माणुसकीच्या मार्गावर दुद्वेषाच्या, नश्वरतेच्या थोड्याशा ज्वाला जरी शिल्लक राहिल्या असल्या तरी चिरंजिवीतेची, अमरत्वाची फुले वेचून तो एकत्र गुंफून आपण एकात्मतेची माळ तयार करुया.
आता उदासपणा नको, दैन्यदारिद्र्य नको. या खिन्नतेच्या अंधाराला भेदणारा नवीन सूर्य उगवतो आहे. उत्कर्षाचा, प्रगतीचा प्रकाश दाहीदिशांत झळकतो आहे. दैन्याच्या अंधाराला चिरणारा लढा मनामनात फुलतो आहे..
प्रत्येक रक्तवाहिनीत नवीन जोश, नवीन उत्साह उसळत आहे. नवीन आशा मनामनात रुजल्या आहेत. या उज्ज्वल विज्ञानयुगातील अणुरेणूतून शब्द प्रकटत आहे. लोकहो, पुढे चला, प्रगती करा.
स्कॉलरशिप प्रश्न ----
प्रश्न (1) ते प्रश्न (3) खालील पैकी कृती केव्हा घडेल ते पर्यायामधून निवडा.
प्रश्न (1) दिव्य क्रांती -----
(1) भव्य जिद्द येईल, तेव्हा
(2)अशांततेचा वणवा विझल्यानंतर
(3)विज्ञानाचा प्रकाश आला, तेव्हा घडली.
(4)मनात नवीन चेतना स्फुरली तेव्हा.
प्रश्न (2)शून्यातून विश्व उभारेल-------
(1) विज्ञानाचा प्रकाश आला, तेव्हा घडली.
(2) मनात नवीन चेतना स्फुरली तेव्हा.
(3) भव्य जिद्द येईल, तेव्हा
(4) अशांततेचा वणवा विझल्यानंतर
प्रश्न (3)दुबळेपणाचा शेवट -----
(1) अशांततेचा वणवा विझल्यानंतर
(2) मनात नवीन चेतना स्फुरली तेव्हा.
(3) भव्य जिद्द येईल, तेव्हा
(4) विज्ञानाचा प्रकाश आला, तेव्हा घडली.
प्रश्न (4) खालील वाक्ये वाचा , कवितेच्या आधारे योग्य क्रम लावण्यासाठी अचूक पर्याय क्रमांक निवडा.
वाक्ये:-
(अ ) हृदयातील अशांततेचा वणवा विझला.
(ब) विज्ञानाचा प्रकाश आला.
(क) उत्कर्षाचा अन् प्रगतीचा मार्ग दिसला.
(ड) क्रांती घडली.
पर्याय-
(1) अ, ब, क,ड
(2) ब, ड, क, अ
(3) ड, ब, क, अ
(4) ब, ड, अ, क
प्रश्न (5) कवितेच्या आधारे चुकीची जोडी ओळखा...
(1) उगवलेला - नवसूर्य
(2)झळकलेला- उत्कर्ष
(3) बहरलेला - संघर्ष
(4) उसळतो - शब्द
प्रश्न (6) ते प्रश्न (7)
पुढील अर्थाच्या ओळी कवितेत शोधा आणि योग्य पर्याय निवडा.
प्रश्न (6)
अर्थ:- माणसाच्या अंगी चिकाटी असली, तर तो काहीही साध्य करू शकतो.
(1) शून्यामधुनी विश्व उभारु जिद्द असे भव्य
(2) नसानसातून जोश उसळतो नव आशा चित्ती.
(3) नवयुग आले प्रभा तयाची पहा दिसत दिव्य
(4)शून्यामधुनी विश्व उभारू जिद्द असे भव्य
प्रश्न (7)
अर्थ:- माणसाच्या अंगात जोश आणि नवीन आशा निर्माण होतात.
(1) शून्यामधुनी विश्व उभारु जिद्द असे भव्य
(2) नसानसातून जोश उसळतो नव आशा चित्ती.
(3)नवयुग आले प्रभा तयाची पहा दिसत दिव्य
(4) शून्यामधुनी विश्व उभारू जिद्द असे भव्य
प्रश्न (8) कवीला नको असणाऱ्या गोष्टीपैकी चुकीचा पर्याय निवडा.
(1) खिन्नता / दीनता
(2) दुबळेपणा
(3) नैराश्य
(4) शांतता
प्रश्न (9) कवितेच्या आधारे चुकीची जोडी ओळखा...
(1) अशांततेचा- वणवा
(2) प्रगतीचा- मार्ग नवा
(3) नवयुगाची- क्रांती
(4) अमरत्वाची - फुले
प्रश्न (10)
विज्ञानामुळे प्राप्त होणाऱ्या गोष्टी पैकी चुकीचा पर्याय ओळखा.
(1) दिव्य क्रांती
(2) दुबळेपणा
(3) नवीन आशा
(4) नवी चेतना
प्रश्न (11) ते प्रश्न (14)
कवितेतील यमक जुळणाऱ्या जोड्या शोधा व चुकीची जोडी निवडा.
प्रश्न (11)
(1) पुढती- दिसती
(2) विझला- दिसला
(3) दिव्य भव्य
(4) माला- ज्वाला
प्रश्न (12)
(1) पुढती- क्रांती
(2) विझला- दिसला
(3) दिव्य - अवाढव्य
(4) माला- ज्वाला
प्रश्न (13)
(1) पुढती- क्रांती
(2) विझला- दिसला
(3) दिव्य भव्य
(4) माला- चला
प्रश्न (14)
(1) गेले -आले
(2)उगवतो-झळकतो-बहरतो
(3) चित्ती -पुढती
(4) दिनता- भव्यता
प्रश्न (15) पुढे शब्दांचे समानार्थी शब्द दिलेले आहेत , चुकीची जोडी ओळखा.
(1) उजेड प्रकाश
(2) रस्ता - मार्ग
(3) तेज - प्रभा
(4) उत्साह - खिन्नता
प्रश्न (15) ते प्रश्न (16) साठी सूचना
खाली शब्दांचे विरुद्ध अर्थाचे शब्द दिलेले आहेत , त्यामधली चुकीची जोडी ओळखा.
प्रश्न (15)
(i) प्रकाश x अंधार
(iii) नवी x जुनी
(v) नैराश्य x उत्साह
(vii) आशा x अपेक्षा
प्रश्न (16)
(ii) अशांतता x शांतता
(iv) प्रगती x अधोगती
(vi) अमर x सुमर
(viii) दुर्बळ x सबळ.
प्रश्न (17)
"मानवता " या शब्दातील अक्षरांपासून खालीलपैकी कोणता अर्थपूर्ण शब्द तयार होणार नाही
(1) मान
(2) माता
(3) नवा
(4) वन
प्रश्न (18 ) ते प्रश्न (22)
पुढील अर्थाच्या ओळी कवितेत शोधा आणि योग्य पर्याय निवडा.
प्रश्न (18)
अर्थ:- माणसाच्या अंगी चिकाटी असली, तर तो काहीही साध्य करू शकतो.
(1) शून्यामधुनी विश्व उभारु जिद्द असे भव्य
(2) नसानसातून जोश उसळतो नव आशा चित्ती.
(3) नवयुग आले प्रभा तयाची पहा दिसत दिव्य
(4)शून्यामधुनी विश्व उभारू जिद्द असे भव्य
प्रश्न (19)
अर्थ:- माणसाच्या अंगात जोश आणि नवीन आशा निर्माण होतात.
(1) शून्यामधुनी विश्व उभारु जिद्द असे भव्य
(2) नसानसातून जोश उसळतो नव आशा चित्ती.
(3)नवयुग आले प्रभा तयाची पहा दिसत दिव्य
(4) शून्यामधुनी विश्व उभारू जिद्द असे भव्य
प्रश्न (20)
अर्थ:-माणसाने वैज्ञानिक विचार केला तर , म्हणजे विज्ञानाच्या विचाराने चालला तर त्याच्या आयुष्यात क्रांती घडते.
(1) अणूरेणूतुनि शब्द प्रगटति... 'चला चला पुढती'
(2) विज्ञानाचा प्रकाश आला घडे दिव्य क्रांती
(3) नवयुग आले प्रभा तयाची पहा दिसत दिव्य
(4) शून्यामधुनी विश्व उभारू जिद्द असे भव्य
प्रश्न (21)
अर्थ:- प्रत्येक माणसाच्या मनात नवीन चेतना किंवा चैतन्य स्फुरल्याविना दारिद्र्य संपत नाही .
(1) हृदयांतरिच्या अशांततेचा वणवा झणि विझला
(2) उत्कर्षाचा अन् प्रगतीचा मार्ग नवा दिसला
(3) नवी चेतना अंतरि स्फुरली दुबळेपण गेले
(4) नैराश्याच्या होळीमधुनी तेज नवे आले
प्रश्न (22)
अर्थ:- माणुसकीचे जीवन जगताना प्रत्येक माणसाच्या आयुष्यात अनेक संकटे येतात .
(1) मानवतेच्या मार्गावरती उठती जरि ज्वाला
(2) अमरत्वाची फुले वेचुनी गुंफूया माला
(3) नसानसातुन जोश उसळतो नव आशा चित्ती
(4) अणूरेणूतुनि शब्द प्रगटति... 'चला चला पुढती
प्रश्न (23) ते प्रश्न (25)
पुढील शब्दांचे सामान्यरूप ओळखून योग्य पर्याय निवडा.
प्रश्न (23) विज्ञानाचा
(1) विज्ञाना
(2) विज्ञान
(3) चा
(4) विज्ञानचा
प्रश्न (24) उकर्षाचा
(1) उत्कर्षा
(2) उत्कर्षाचा
(3) चा
(4) उत्कर्षेचा
प्रश्न (25) नसानसातून
(1) नसानसा
(2) तून
(3) नसानसातून
Comments
Post a Comment