8वी मराठी भारत देश महान गीत
-- माधव विचारे
गीत/ कवितेची मध्यवर्ती कल्पना
सुजलाम-सुफलाम असलेल्या आपल्या भारत देशाची थोरवी या गीतामध्ये सांगितली आहे. भारतभूमीची शौर्य गाथा आणि समता व विश्वशांती ही मूल्ये ओजस्वी शब्दांत मांडली आहेत. भारताची मानवतावादी अभिमानास्पद परंपरा जपावी, हा संदेश या कवितेतून दिला आहे.
शब्दार्थ
महान – थोर.
पवित्र- पावन, शुुद्ध
वीर – शूर , लढवय्ये.
कवितेचा भावार्थ
देशवासीयांच्या मनात देशाभिमान जागृत करताना कवी म्हणतात भारतवासी जनहो, चला आपण आता 'भारत देश महान आहे, हे गीत एकमुखाने गाऊया. आपल्या भारताची थोरवी एकजुटीने गाऊ या.।। धृ.॥
भारतभूमीचा हा नवीन इतिहास अपूर्व बलिदानाचा, शौर्याचा व पराक्रमाचा आहे. राष्ट्राभिमान जागृत करणारा समता व विश्वशांतीचा हा नवा इतिहास आहे. ।।२।।
या भारतभूमीच्या स्वातंत्र्यासाठी जे वीर शौर्याने लढले; स्वातंत्र्यसंग्रामाच्या रणभूमीवर प्राणार्पण करून जे पवित्रमय झाले; त्यांच्या बलिदानाने भारतभूमीचे स्वप्न रंगले आहे.
त्याची ग्वाही उंच फडकत असलेला आमचा राष्ट्रीय ध्वज देत आहे. आपले निशाण असेच अभिमानाने उंच उंच फडकत राहो. ।।३।।
प्रश्न क्र. (1) भारत देश महान या गीताचे गीतकार कोण?
(1) माधव विचारे (2) ऐश्वर्य पाटेकर
(3) सुनील चिंचोलकर (4) डॉ.कैलास दौंड
प्रश्न क्र. (2 )भारत देश महान हे गीत कोणत्या कवितासंग्रहातील आहे ?
(1) देशभक्तीपर गीते (2) फुलोरा गीतपुष्पांचा (3) गीतपुष्पांचा फुलोरा (4 ) श्रावणातील कविता
प्रश्न क्र. (3 )भारत देश महान या गीतातून कोणता संदेश दिला आहे ?
(1) समता आणि विश्वशांती ही मुल्ये जपण्याचा
(2) भारत मातेवर प्रेम करण्याचा
(3) पराक्रम करण्याचा
(4)बलिदान करण्याचा
प्रश्न क्र. (4 ) ते प्रश्न क्र. (6 ) साठी सूचना.
शब्दांच्या चुकीच्या अर्थाची जोडी निवडा.
प्रश्न क्र. (4 )
(1) गाणं- गीत (2) शिखर - वरचे टोक
(3) शिरी - खांद्यावर (4) स्नान- अंघोळ
प्रश्न क्र. (5 )
(1) बलिदान- प्राण अर्पण करणे
(2) रणांगण - धावपट्टी
(3) पावन - पवित्र
(4) निशाण - ध्वज
प्रश्न क्र. (6 )
(1) बलिदान- प्राण अर्पण करणे
(2) रणांगण -युद्धभूमी
(3) शिरी -डोक्यावर
(4) स्नान- शान
प्रश्न क्र. 7 कवी एकमुखाने कोणते गीत गाण्यास सांगत आहेत ?
(१) चला चला हो एक मुखाने
(२)भारत देश महान
(३) बलिदानाचे
(४) समतेचे
प्रश्न क्र. 8 "भारत देश महान " हे गीत कोणाला उद्देशून गायिले आहे ?
(१) हिमलयाच्या हिमशिखरांना
(२) भारतातील लोकांना
(३) नद्यांना
(४) भारत देशास
प्रश्न क्र. 9
भारतभू च्या शिरी कोण डोलत आहे ?
(१)हिमलय
(२) गंगा नदी
(३) शिरावर
(४) हिमालयाची हिमशिखरे
प्रश्न क्र. 10
गंगा, यमुना आणि गोमती या नद्या कोणास स्नान घालत आहेत ?
(१) हिमालयास
(२) भारतभूमीस
(३) वीरांना
(४) झाडांना
प्रश्न क्र. 11
रणांगण कशाने पावन झाले आहे ? असे कवी " भारत देश महान" या गीतात म्हणतात.
(१) लढाई झाल्यामुळे
(२) पराक्रमामुळे
(३) शौर्याने वीर लढल्यामुळे
(४) भरतभूचे स्वप्न रंगल्यामुळे
प्रश्न क्र. 12
भारतभुचे स्वप्न केव्हा रंगले असे कवी म्हणतात?
(१) गंगा, यमुना आणि गोमती मुले
(२)गगनी उंच निशाण चढवल्याने
(३) राष्ट्राभिमान जागृत झाल्यामुळे
(४) हिमालयामुळे
Comments
Post a Comment