Articles - उपपदे

 Articles - उपपदे


A, An आणि The या विशेषणांना  (Articles) उपपदे असे म्हणतात. खर पाहता ही उपपदे एक प्रकारे दर्शक विशेषणेच आहेत.

Articles (उपपदे) ही इंग्रजी भाषेची विशेषता आहे.

भाषेमध्ये तंतोतंतपणा, परिणामकारकता आणि स्पष्टपणा येण्यासाठी या उपपदांचा वापर होतो. सामान्यतः ही  Articles (उपपदे)  एकवचनी सामान्य नामापूर्वी वापरतात.


Ex. I read story yesterday. Story was very interesting वरील वाक्यात स्पष्टपणाचा (clarity) अभाव आहे.

I read a story yesterday. The story was very interesting. आता हे वाक्य बिनचुक व परिणामकारक आहे.


● इंग्रजी भाषेत A, An आणि The हे तीन articles (उपपदे) असून ती खालील दोन प्रकारची आहेत.


1. Indefinite Articles (अनिश्चित उपपदे) - A, An

     A, An, ही अनिश्चित उपपदे आहेत कारण ही Articles  (उपपदे) निश्चित व्यक्ती किंवा वस्तू दर्शवित नाहीत; तर कोणतीही एक वस्तू दर्शवतात.

Ex. a man  - म्हणजे कोणताही एक व्यक्ती

     an ant  -  म्हणजे कोणतीही एक मुंगी


2. Definite Articles (निश्चित उपपदे) - The

The हे निश्चित Article आहे, कारण हे Article एखादी निश्चित म्हणजे तीच  व्यक्ती किंवा  तीच वस्तू दर्शविते.

Ex. The boy who helped me is Ronak. 

(अनेक मुलांपैकी रोनक हा निश्चित मुलगा)


A किंवा An चे उपयोग -

1. ज्या एकवचनी सामान्य नामाच्या उच्चाराची सुरूवात व्यंजनाने होते. त्या नामापूर्वी 'a' हे article वापरतात.

Ex. a book , a boy , a man , a dog , a table , a tiger, a pen , a girl , a cat , a ball, ...... etc.


2 . ज्या एकवचनी सामान्य नामांचा उच्चार स्वराने (a, e, i, o, u) होतो, नामापूर्वी 'an' हे article  वापरतात.

Ex. an apple , an eye , an owl , an ant , an egg

an umbrella , an ink-pot ,an animal, an orange, an eagle , an elephant, an arrow ..etc.


3. जर सामान्य नामाच्या स्पेलिंगची सुरूवात स्वराने (a, e, i, o, u) होत असे पण उच्चार व्यंजनासारखा असेल तर त्यापूर्वी 'a' हे article वापरतात.

Ex. a unit (युनिट), a universal , a union ,a uniform , a university , a European, ......etc.


4. जर सामान्य नामाचे स्पेलिंग व्यंजनाने सुरू होत असेल व उच्चारात सुरूवातीला स्वर येत असल्यास  त्या सामान्य  नामापूर्वी 'an' हे article वापरतात.

Ex. an hour (अवर) , an M.A. , an honour, an heir

an L.L.B  , an M.L.A. , an M.P. an M.B.A. .....etc.


5. जर सामान्य नामाच्या पूर्वी विशेषण आले असेल तर त्या विशेषणाच उच्चारावरून विशेषणापूर्वी article वापरावे.

Ex. a duckling  - an ugly duckling.

     a king  -  an honest king.

a book  -an important book.

an apple - a red apple

an animal- a useful animal

an eye - a big eye..... etc.


6.किंमत, वेग, प्रमाण तसेच संख्यावाचक शब्द दर्शविण्यासाठी देखोल article वापरतात.

Ex.  ninety rupees a metre.

a rupee a dozen.

twenty rupees a litre.

eighty kms an hour.

a hundred rupees.

a pound. 

a lakh. ..... etc.


7 . 'What' ने सुरू होणाऱ्या उद्‌गारवाचक वाक्यातील सामान्य नामापूर्वी article वापरतात.


Ex. What a big potato it is!

What an ugly duckling!



The चा उपयोग -

1. प्राणी, वस्तू किंवा व्यक्ती यांच्या गटाचे प्रतिनिधिक स्वरुपात असलेल्या सामान्य नामापूर्वी 'the' हे article वापरतात.

Ex. The rose smells sweet.

The cow is a useful animal.

The cat loves comfort.

The tiger lives in jungle.

Woman is man's mate.

पण Man व Woman संदर्भात हा नियम लागू नाही.

Ex. Man is mortal.


2. एकदा उल्लेख केलेल्या सामान्य नामाचा पुन्हा उल्लेख करताना 'the' हे article वापरतात. 

Ex. That is an eagle. The eagle is on the tree. There is a ball. The ball is under the table.


3. जगात एकमेव असणाऱ्या वस्तूंच्या, व्यक्तीच्या बाबतीत -

Ex. The earth

The sky

The moon

The sun ......etc. 

The south pole The Moon The Taj Mahal,


4. टेकड्या, शिखर, नदी, पर्वत, महासागर, आखात इत्यादींच्या नावापूर्वी 'the' हे article  वापरतात.

Ex. The Himalayas

The Alps

The Godavari

The Bhima

The Ganga

The Persian Gulf

The English channel


5. प्रसिद्ध धर्मग्रंथ तसेच कांही विशिष्ट ग्रंथापूर्वी 'the' हे article  वापरतात.

Ex. The Ramayana

The Mahabharata

The Bhagvat Gita

The Hindukush

The Shivalik Hills

The Manjara

The Krishna

The Arabian sea

The Indian ocean

The Suez canal, etc.

The Bible

The Quran

The Guru Granth Saheba

The Ramcharita Manasa, ..... etc.


6. वर्तमानपत्रांच्या नावापूर्वी 'the' हे article  वापरतात.

The Hindu,

The Times of India,

The Indian Express,

The Maharashtra Times, ..... etc.

The Vedas

The Shakuntala

The Lokmat Times


7. भौगोलिक दिशापूर्वी 'the' हे article  वापरतात.

The East

The West

The South

The North

The North-East, .... etc.


8. Musical instruments - संगीताच्या उपकरणापूर्वी 'the' हे article  वापरतात.

 Ex. The flute, The Gitar,

 The Piano,

The Tabla,

 The Harmonium, ..... etc.


9. Superlative Degree पूर्वी (तमभाववाचक विशेषणा 

पूर्वी) 'the' हे article  वापरतात.


Ex. the tallest,

 the greatest

 the most beautiful,

 the most useful, 

the best  player,  ......etc.


Omission of article - उपपदे केंव्हा वापरू नये?


1. विशेषनामापूर्वी कोणतेही articles (उपपदे) वापरू नये. 

 Ex. ★ Aman , 

★ Delhi ,

★ Deepa , 

★ Latur, ..... etc.

2. पदार्थवाचक नाम व भाववाचक नामापूर्वी कोणतेही articles (उपपदे) वापरू नये.

Ex. ★ Sugar ,

★gold ,

★iron, 

★silver,

★ water, 

★ truth, 

★poverty,

★childhood, 

★ milk

★ kindness, etc.


3 . खेळ, कला, शास्त्र यांच्या नावापूर्वी कोणतेही articles (उपपदे) वापरू नये.

Ex. ★ Cricket ,

★chess,

★ football, 

★ painting    

★ drawing, 

★ physics, ..... etc.


4. भाषांच्या नावापूर्वी, जेवनाच्या प्रकारापूर्वी व सामान्य रोगापूर्वी कोणतेही articles (उपपदे) वापरू नये.

Ex. ★ Marathi

★ Hindi

★ breakfast

★ dinner

★ malaria

5. वार, महिना, ऋतु, सण यांच्या नावापूर्वी कोणतेही articles (उपपदे) वापरू नये.

Ex. ★ Monday

★ April

★ aids

★ Friday

★ July

★ Summer

★ Winter

★ Diwali

★ Christmas, etc.

★ Telugu

★ lunch

★ cancer, etc.

[नोट - '★' अशी फुली म्हणजे कोणतेही article येत नाही.]


●No gains without pains.●

● Where there's a will, there's a way.●

● God helps them who help themselves.●

●Manage your time as you manage your money.●

Comments

Popular posts from this blog

HOME