७ मराठी१२-सलाम नमस्ते !


१२. सलाम - नमस्ते !


- सुधा मूर्ती/ लीना सोहोनी


(पाठ्यपुस्तक पान क्र. ५५)


पाठाचा परिचय :- 

गरीब परिस्थितीत असलेल्या कष्टाळू वृत्तीच्या शेख महंमद या छोट्याशा दुकानदाराचे शब्दचित्र या पाठात रेखाटले आहे. शेख महमंद आणि त्याची बहीण झुबेदा यांची माणुसकी व प्रामाणिकपणा या गुणांचा प्रत्यय आपणांस येतो. 

मूल्य/शिकवण / संदेश: कष्टाळू वृत्ती, प्रामाणिकपणा, समंजसपणा, माणुसकी या नैतिक मूल्यांची जोपासना

विद्यार्थ्यांनी करावी, असा संदेश ही कथा देते.


शब्दार्थ


सलाम - नमस्कार

किरकोळ - शुल्लक, 

संकोची स्वभाव - लाजाळू वृत्ती .

खेपेला - वेळेला. 

अनाथ - पोरका.

मुक्तता -  सुटका.

दिवस लोटले-  दिवस गेले. 

झालरी- नक्षीकाम केलेल्या कापडी पट्ट्या.

बावरली - गोंधळली. 

यातना - वेदना. 

रुग्ण-  आजारी माणूस , दुखणेकरी. 

विस्मयचकित - आश्चर्यकारक,

विरळच - कमीच. 

करुणा -  दया.


टिपा


(१) मधुमेह  - एक रोग, डायबिटीस.

(२) विधवा - जिचा पती मरण पावला आहे, अशी स्त्री.

(३) कॅन्सर-कर्करोग.

(४) कुड्या -  स्त्रियांचा कानात घालायचा दागिना

(५) फाउंडेशन  - सेवाभावी संस्था, प्रतिष्ठान,

(६) रिसेप्शन काउंटर -  स्वागत कक्ष,

(७) पोनीटेल -  केस बांधणीची पद्धत (घोड्याच्या शेपटीसारखी).

(८) लिफाफा - कागदपत्र ठेवण्याचे कागदी पाकीट.

(९) खाणी - जमिनीच्या पोटात (भूगर्भात) दडलेले धातू शोधण्यासाठी  केलेले खणन . 

(१०) माची - बहिणीची मुलगी,


वाक्प्रचार व त्यांचे अर्थ

(१) सलाम करणे - नमस्कार करणे.

(२) कमवणे - काम करून पैसे मिळवणे.

(३) हृदयाला स्पर्श करणे -  मनाला आकळणे.

(४) निरोप ठेवणे - सांगावा देणे.

(५) धावपळ असणे- कामाची  घाईगडवड असणे.

(६) निधी गोळा करणे- रक्कम (पैसे) जमा करणे.

(७) पदरात पाडून घेणे - केवळ स्वतःला  फायदा मिळेल अशी व्यवस्था करणे.

(८) आयुष्यातून उठणे - मरण पावणे. 

(९) आग्रह असणे -   विनवणी करणे . पाठपुरावा करणे. 

(१०) परवडणे - पैसे खर्च करण्याची क्षमता 

(११) मन हेलवणे - गलबलून जाणे. 

(१२) आश्चर्य वाटणे- नवल वाटणे, चकित होणे. 

(१३) मदतीला धावून जाणे - तत्परतेने मदत करणे.

(१४) नशीब खोटे असणे- दैव खराब असणे, नशीब फुटके असणे, 

(१५) नशिबात वाढून ठेवणे - वाट्याला येणे.

(१६) तोंडून शब्द न फुटणे- बोलती बंद होणे, बोलता न येणे. 

(१७) डोळे पुसणे - रडू आवरणे, सांत्वन करणे 

(१८) जीव वाचणे - जीव शाबूत राहणे.

(१९) पाणी गालावरून वाहणे  - रडणे.

(२०) थक्क होणे  - आश्चर्यचकित होणे.

(२१) झुंज देणे  - सामना करणे, टक्कर देणे. 

(२२) मेहरबानी असणे -  वरदहस्त असणे, आधार असणे,

(२३) शब्द पचनी पडणे - मनापासून समजणे, कळणे.


संकलित मूल्यमापन


१. प्रश्नोत्तरे


प्रश्न १. पुढील वाक्यांमधून पाठातील त्या त्या व्यक्तीचा दिसणारा गुण लिहा. 

(१) लेखिका झोपडपट्टीतील शाळकरी मुलांमध्ये वह्या वाटत.

(२) माझ्यापेक्षा त्यांनाच याची गोडी जास्त. 

(३) "मॅडम, माझ्यापेक्षा गरीब लोकांना तुमच्या मदतीची जास्त गरज आहे."

(४) "मॅडम, तुम्हांला सलाम करण्याची झुबेदाची इच्छा होती. "

(५) त्या अनाथ मुलीकडे बघून मला वाईट वाटलं.


उत्तर :- - (१) आस्था/परोकार  (२) मायाळू (३) सहानुभूती

(४) कृतज्ञता (५) सहसंवेदना


• प्रश्न २. स्वभाववैशिष्ट्ये लिहा :


झुवेदाचा भाऊ -

शेख महंमद याची स्वभाववैशिष्ट्ये

उत्तरे :- (१)कष्टाळू वृत्ती

(२) दुःखाविषयी तळमळ

(३) प्रामाणिकपणा

(४) माणुसकी


प्रश्न ३. पुढील उतारा वाचून कृती करा :


पाठ्यपुस्तक पृष्ठ क्र. ५५ :


(शेख महंमदचं एक छोटंसं ...................

......................चेक घेऊन जायचा. ) 


(अ) लिहून  पूर्ण करा:

(१) शेख महंमदचे दुकानात विक्री याची व्हायची .......

(२)शेख महंमदचे दुकान याच्या जवळ होते. .........

उत्तर:-(१) विक्री याची व्हायची .

(२) लेखिकेच्या ऑफिसजवळ होते. 


(ब) लिहून  पूर्ण करा:

(१) या महिन्यात लेखिका वह्या विकत घेत..

(२) लेखिका वह्या वाटप येथे करीत.....

 उत्तर:- (१) या महिन्यात दरवर्षी जून महिन्यात.

 (२)  झोपडपट्टीतील शाळकरी मुलांमध्ये  वाटप  करीत.



(क ) काय ते लिहा  :


(१) भाड्याची असणारी


(२) शेख महंमदचा स्वभाव


उत्तरे:- (१) शेख महंमदच्या दुकानाची जागा.

(२) संकोची




प्रश्न ४. लेखिकेची तबस्सुमविषयीची भावना तुमच्या शब्दांत लिहा. 

 उत्तर : लेखिकेच्या मते, तबस्सुम खूप गोड मुलगी होती, तिची आई वारल्यामुळे ती पोरकी होती. ऑफिसमध्ये ती बावरली होती. लेखिकांना तिच्याकडे पाहून वाईट वाटले. तिच्या नशिबी पुढे काय असेल ,याची  तिला कल्पना नव्हती, म्हणून लेखिका चिंतित झाल्या. तबस्सुमने इवल्या हातांनी लेखिकांना सलाम केला.. तेव्हा लेखिकांच्या तोंडातून शब्द फुटत नव्हता.


प्रश्न ५. खलील मुद्य्यांच्या आधारे लेखन करा :

      तबस्सुमची वेशभूषा

उत्तरे : अंगात साधा सुती फ्रॉक,  फ्रॉकला झालर व बटणे

केसांना भरपूर तेल लावून चापून बसवलेले ,  पोनीटेल  बांधलेली . 


मुक्तोत्तरी प्रश्न

• शेख महंमदमार्फत झुबेदाने उरलेले पैसे लेखिकेला परत केले, ही घटना तुम्हांला काय शिकवते ?   किंवा यातून तुम्ही काय शिकला ?  

 उत्तर: उसने घेतलेल्या पैशांच्या व्यवहारात अत्यंत काटेकोर असले पाहिजे. खर्च भागवल्या पैसे प्रामाणिकपणे परत दयायला हवेत. तसेच सहज व फुकट पैसे मिळाले म्हणून उधळपट्टी करता ज्या हेतूसाठी पैसे कर्जाऊ घेतले, तो हेतू सफल व्हायला हवा. उसने घेतलेल्या पैशाबद्दल असायला हवे, ही शिकवण झुबेदाच्या कृत्यातून मिळते.


भाषाभ्यास व व्याकरण


● प्रश्न १. पुढील इंग्रजी शब्दांसाठी वापरले जाणारे मराठी भाषेतील शब्द लिहा :

(१) ऑफिस - कार्यालय

(२) चेक - धनादेश

(३) हॉस्पिटल - इस्पितळ (दवाखाना)

(४) अॅडव्हान्स  - आगाऊ रक्कम

(५) ऑपरेशन - शस्त्रक्रिया

(६) कैन्सर - कर्करोग


प्रश्न २ एकवचन /अनेकवचन  लिहा . 

मिठाई -मिठाया

बटण -बटणे

कुंडी-  कुंडया

दागिना -  दागिने

रक्कम - रकमा

खाण - खाणी 


प्रश्न ३. विरुद्धार्थी शब्दांच्या जोड्या लावा :

उत्तरे :

(१) विक्री x खरेदी

(२) जास्त x कमी

(३) जमा x खर्च

(४) सधन x निर्धन

(५) श्रीमंत x गरीब

(६) डावा x उजवा



प्रश्न ४.लिंग बदला. 

 (1) मामा - मामी

(2) भाचा - भाची

(3) वडील -आई 

(4) विधुर - विधवा 

(5) मुलगा - मुलगी

(6) भाऊ - बहीण 


प्रश्न ५. पुढील वाक्यांत योग्य केवलप्रयोगी अव्यये लिहा. (थेट उत्तरे दिली आहेत.)

( १) अहाहा! काय सुंदर आहे ताजमहाल !

(२) छे! तो असे म्हणालाच नाही!

(३) आई गं ! किती जोरात ठेच लागली! 

(४) अबब!  किती उंच आहे ही इमारत ! 


२. लेखन विभाग

 (१) या पाठातील कोणत्या व्यक्तिरेखा तुम्हांला आवडल्या व त्या का आवडल्या याबद्दल तुमचे मत सांगा.

उत्तर  :- या पाठातील शेख महंमद ही व्यक्तिरेखा मला आवडली; कारण तो अत्यंत कष्टाळू व प्रामाणिक आहे. संकोची असलेला शेख लेखिकेविषयी कृतज्ञ आहे. तसेच मला लेखिकेची व्यक्तिरेखा आवडली. कारण त्या सेवाभावी संस्थेत काम करतात व त्यांचे हृदय सहानुभूतीने भरलेले आहे. लोकांच्या अडीअडचणीत त्या मदत करतात. 


• (२) या पाठातून मिळणारा संदेश तुमच्या शब्दांत सांगा.

उत्तर: नेहमी सचोटीने वागावे, लोकांचे दुःख आपल्यापरीने निवारण्याचा आटोकाट प्रयत्न करावा. गरजूंना यथाशक्ती मदत करावी. सहानुभूती व सहसंवेदना मनात जागृत असावी. जमेल तशी समाजसेवा करावी. हा संदेश या पाठातून मिळतो.


३. तोंडी परीक्षा


प्रश्न पुढील प्रश्नांची उत्तरे सांगा :


(१) तुमच्या प्रामाणिकपणाचे एखादे उदाहरण सांगा. 

(२) तुम्हांला समाजाची कोणत्या प्रकारची सेवा करायला आवडेल? का?


प्रकट वाचन / कृती :


• पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक ५९ वरील 'वाचा' या उताऱ्याचे प्रकट वाचन करा. आशयानुसार परिच्छेद व योग्य शीर्षक दया.


कृती :


• 7वी बालभारती पाठ्यपुस्तक पा.नं. 59 वरील  चित्रे पाहून आपल्या भावना व्यक्त करणारी वाक्ये लिहा :


उत्तर : (चित्र1 मोर)

मोर हा राष्ट्रीय पक्षी आहे. त्याचा पिसारा किती सुंदर असतो! मला मोराचा नाच पाहायचा आहे.


उत्तर :(चित्र 2 मुलगा )

फुटबॉल हा माझा आवडता खेळ आहे. मोकळ्या मैदानात हा खेळ खेळताना छान व्यायाम होतो.


३. उपक्रम :

(१) तुमच्या परिसरातील गरजू, अनाथ, अपंग इत्यादी व्यक्तींसाठी काम करणाऱ्या व्यक्ती व संस्थ यांविषयी माहिती मिळवा.


● (२) पुढील स्वभाववैशिष्ट्ये असलेल्या तुमच्या परिसरातील व्यक्तींची नावे लिहा. (गप्पिष्ट, लाजाळू, रागीट, शांत, हजरजबाबी.)


४. प्रकल्प :


●●गरजू रुग्णांना मदत करणाऱ्या अनेक सेवाभावी संस्था आहेत, त्याविषयी आंतरजालावरून माहिती मिळवा. 



 सलाम नमस्ते (पा नं. 55 )

प्र.1. सलाम नमस्ते या पाठाचे लेखक कोण ?

 (1) सुधा मूर्ती  (2)  साने गुरुजी 

 (3)  पु ल देशपांडे (4) अशोक मानकर       

प्र.2.  शेख महंमद चे दुकान कोठे होते?

(1)  घराजवळ (2) ऑफिस जवळ 

(3) कंपनी जवळ (4) बाजारात   

 प्र.3. शाळकरी मुलांसाठी वह्या वाटप करण्यास मॅडम वह्या कुठून घेत असत ?

(1)  ऑफिस मधून  (2)  शाळेमधून 

(3) कंपनीतून (4) दुकानातून

 प्र.4 .   शेख महंमदचा स्वभाव ...................... होता. 

 (1) लाजरा  (2)  धाडसी  

(3)  करारी  (4)  भांडखोर 

  प्र.5.  वह्यांचा चेक कोण घेऊन जात असे ?

(1)   मॅडम (2)  साहेब 

(3) शिपाई (4)  शेख महंमद 

प्र.6.  शेख महंमद आला त्यावेळी सर्वजण मिठाई कुठे खात होते ?

(1) घरात  (2)  दुकानात 

(3)  कार्यालयात   (3) हॉटेलात 

प्र.7.  शेख महंमद  च्या हातावर मिठाई कोणी ठेवली?

(1)  सुधा मूर्ती (2)  अशोक मानकर 

(3)  पु ल देशपांडे (4) कुसुमाग्रज 

 प्र.8. " तुला मधुमेहाचा  त्रास वगैरे आहे का ?" असं मॅडम शेख महंमदला का म्हणाल्या ?

(1)  शेख महंमद आजारी होता. 

 (2) शेख महंमद दवाखान्यात जाणार होता .

(3)  शेख महंमद मिठाई खात नव्हता.  (4) शेख महंमद ची औषधे चालू होती . 


प्र.9. शेख महंमद मिठाई कोणाला घेऊन जाणार होता? 

 (1) स्वतःला आणि बायकोला 

 (2) मुलीला आणि बायकोला 

(3)  बायकोला अन भाचीला  

 (4) भाचीला अन मुलीला 

प्र.10.चुकीच्या अर्थाची जोडी निवडा.

(1) विधवा -  पती वारलेली स्त्री 

 (2) भाची - बहिणीची मुलगी 

(3) आत्या - वडिलांची आई  

(4) मामा - आईचा भाऊ 

प्र.11.शिवणकाम कोण करत होते ?

(1) शेख महंमद  

(2)  शेख महंमद ची बहिण

 (3) शेख महंमद ची मुलगी  

(4)  शेख महंमद ची भाची 

प्र.12. उताऱ्यानुसार " लोटले "  या शब्दाचा अर्थ काय होतो?

(1)  ढकलले  (3)झाडून काढले 

(3) निघून गेले  (4) परत आले 

  प्र.13.   उताऱ्यानुसार   चुकीची जोडी निवडा.

(1) ऑफिस -  कार्यालय 

(2) कॅन्सर - कर्करोग 

(3)  ऑपरेशन - शस्त्रक्रिया  

(4) चेक  - तपासणे 

प्र.14.  "झुबेदा काय करते ?" 

वाक्याचा प्रकार  ओळखा.  

(1) प्रश्नार्थी वाक्य (2)  विधानार्थी वाक्य (3) उद्गारार्थी वाक्य (4) आज्ञार्थी वाक्य

प्र.15. " तुला किती मुलं आहेत"  या वाक्यात कोणते विरामचिन्ह वापराल ?

(1) प्रश्नचिन्ह (2)   पूर्णविराम  

(3) स्वल्पविराम  (4) उद्गारार्थी चिन्ह

प्र.16 " माझी बहीण झुबेदा विधवा आहे आणि  ती आमच्याकडेच राहते . या वाक्यातील नाम व सर्वनाम खालीलपैकी कोणते?

(1)   झुबेदा ,  विधवा

(2)   झुबेदा , आणि 

(3) बहीण ,  ती 

(4) झुबेदा ,  ती


प्र.17.  झुबेदा चे ऑपरेशन का करावे लागणार होते ?

 (1)  झुबेदा चा अपघात झाला होता .

 (2) झुबेदा ला कर्करोग झाला होता.

 (3) झुबेदा चा पाय मोडला होता.

 (4) झुबेदा चालू शकत नव्हती. 

प्रश्न 18. लेखिका वह्या कोठून खरेदी करत असत ?
 (1) ऑफिसमधून  (2) दुकानातून  (3) बाजारातून (4) कंपनीतून 
 प्रश्न 19. खरेदीकेलेल्या वह्या लेखिका सुधा मूर्ती काय करत असत?
 (1) शाळकरी मुलांना वाटत असत.
 (2) झोपडपट्टीतील मुलांना वाटत असत. 
 (3) झोपडपट्टीतील शाळा शिकणाऱ्या मुलांना देत असत. 
 (4) ऑफिसमध्ये ठेवत असत. 
प्रश्न 20. शेख महंमद पेक्षा खाऊची गोडी कोणाला अधिक असावी असे उताऱ्यातून दिसते?
(1) मॅडमला (2) बायकोला (3) बहिणीला (4) लहानमुलांना 
 

सलाम नमस्ते 
(Page no. 56)

प्र. 1.  चुकीचा अर्थ असलेली जोडी ओळखा .
(1) अनाथ - आईवडील नसलेला 
(2) विधवा - पत्नी मरण पावलेला 
(3) निराधार - सांभाळणारे कुणी नसलेला किंवा आधार नसलेला 
(4) पोरका - पालनपोषण करणारे कुणी नसलेला  

प्र. 2. चुकीचा अर्थ असलेली जोडी ओळखा .
(1)पदरात पाडून घेणे- स्वतःचा लाभ करून घेणे.
(2) आयुष्यातून उठणे - मरण पावणे.
(3) मन हेलावणे - एखाद्याचे दुःख ऐकून अतिशय वाईट वाटणे.
(4)मदतीला धावून येणे - मदतीच्या ऐवजी  पळून जाणे. 

प्र. 3. चुकीच्या अर्थाची जोडी ओळखा.  
(1) हॉस्पिटल - रुग्णालय 
(2) रिसेप्शन - स्वागत 
(3) पोनीटेल - केश  रचनेचा  एक प्रकार 
(4) मॅडम -ताई 

प्र. 4.शेख महंमदच्या भाचीचे नाव काय ?
(1) झुबेदा (2)  तबस्सुम
 (3)  नसीमा (4) पोनीटेल 

प्र. 5. सलाम म्हणजे काय ? 
(1) मुजरा  (2) नमस्कार (3)  दंडवत (4) कुर्निसात 

प्र. 6.तबस्सुम ने कोणाच्या वतीने सलाम  केला ? 
(1) शेख महंमदच्या (2)  मॅडमच्या 
(3)  स्वतःच्या   (4) झुबेदाच्या

प्र. 7. तबस्सुम का बावरली ?
(1)  मॅडमनी रागावल्यामुळे.
(2) अनोळखी माणसं पाहिल्यामुळे .
(3) चालून दमल्यामुळे .
(4)  मामा कावल्यामुळे 

 प्र. 8. मॅडमनी शेख महंमदला  किती रुपयांची मदत केली ?
(1) पाच हजार  रुपये 
(2) पंधरा हजार   रुपये
(3) पन्नास हजार रुपये  
(4) चाळीस हजार रुपये

प्र. 9.शेख महंमद यांनी झुबेदा च्या ऑपरेशन साठी पैसे कसे जमा केले ?
(अ) मॅडम कडून 50 हजार रुपयांचा चेक घेतला.
(ब) झुबेदाचे आणि बायकोचे दागिने विकले.
(क) बँकेला कर्ज दिले.
(ड)  जुबेदा ने काम करून पैसे गोळा केले.
(1) (अ) व (ब) बरोबर
(2) (ब) व (क) बरोबर 
(3) (क) व (ड) बरोबर 
(4) (ड) व (अ) बरोबर 


प्र.10. मॅडमनी झुबेदाच्या ऑपरेशन साठी  शेख महंमदला पन्नास हजारांचा चेक देण्याआधी हॉस्पिटलची सर्व कागदपत्रे तपासून का पाहिली असावीत ?
(1) मॅडम हॉस्पिटलच्या मालकिण होत्या.
(2) काही लोक मदत मिळवण्यासाठी काहीही खोटं सांगत होते.
(3) हॉस्पिटलचा तसा नियम होता.
(4) शेख महंमद मॅडमला फसवून पैसे काढत होता.  

प्र. 11. " बेटी , मॅडम को सलाम करो !"  या वाक्यात कोणती विरामचिन्हे आलेली आहेत ?
(1) दुहेरी अवतरण चिन्ह , स्वल्पविराम ,उद्गार चिन्ह. 
(2)स्वल्पविराम , प्रश्नचिन्ह, दुहेरी अवतरण चिन्ह.
(3) प्रश्नचिन्ह,  पूर्णविराम , संयोग चिन्ह.
(4) पूर्णविराम ,स्वल्पविराम , प्रश्नचिन्ह. 



सलाम नमस्ते 
(Page no. 57) 

प्र. 1. चुकीची जोडी ओळखा.
(1) पाकीट - खिसा 
(2)  कळकळ - तळमळ
(3)  करुणा- दया
(4)  विरळ  - क्वचित  

 प्र. 2.मॅडम नि दिलेल्या चेक पैकी  शेख महंमदने किती रक्कम खर्च केली ?
(1)  तीन हजार   
(2)  सत्तेचाळीस हजार  
(3)  पन्नास हजार 
(4)  चार हजार सातशे


प्र. 3.झुबेदा ने मॅडम साठी काय पाठवले होते ? 
(1) पाकीट (2)  गुलाब 
(3)  उरलेले पैसे  (4) चेक 


प्र. 4. झुबेदाने उरलेले पैसे मॅडम ना परत का केले असावेत ?
(1) जुबेदा चा खर्च संपला होता.
(2) आता पैशांची गरज भागली होती.
(3) इथून पुढे केला जाणारा खर्च वाया जाणार होता.
(4) झुबेदा आता बरी झाली होती.


प्र. 5.चुकीची जोडी निवडा.
(1) थक्क होणे - आश्चर्याने  स्तब्ध होणे 
(2) विस्मयचकित  होणे-  आश्चर्यचकित होणे 
(3) झुंज देणे -   दोन  हातात करणे 
(4)  वाया जाणे  - व्यर्थ जाणे 

प्र. 6. " पचनी पडणे " या वाक्यप्रचाराचा अर्थ काय होईल ?

(1) समजणे
(2) पचन होणे
(3) सहन होणे
(4) जिरणे

प्र. 7. खालीलपैकी मराठी शब्द ओळखा.
(1) हॉस्पिटल  (2)  कॅन्सर (3)  चेक  (4) पाकीट 


सातवी मराठी, पाठ 12, सलाम नमस्ते.(अ)

प्रश्न (1): लेखिका सुधा मूर्ती  वह्या  कोठून खरेदी करत असत ?

(1) बाजारातून (2) कंपनीतून (3) दुकानातून(4) परदेशातून


प्रश्न (2): लेखिका सुधा मूर्ती  वह्या खरेदी करून काय करत असत ?

(1)दुकानात देत असत. (2)शाळकरी मुलांना वाटत असत.

(3)शाळेमध्ये वाटप करत असत.(4)ऑफिससाठी वापरत  असत.


प्रश्न (3): खलील वाक्यातीलअधोरेखित / ठळक शब्दाची जात ओळखा.

त्याचं एक छोटंसं दुकान होतं.

(1)नाम  (2) सर्वनाम  (3) विशेषण (4) क्रियापद 


प्रश्न (4): शेख महंमद चा स्वभाव कसा होता ?

(1) मनमिळावू (2)संकोची (3) भांडखोर (4)चिडखोर 


प्रश्न (5): शेख महंमद पेक्षा खाऊचे गोडी कोणाला जास्त आहे?

(1)मॅडमना (2)बहिणीला (3)बायकोला (4)लहान मुलींना 


प्रश्न (6): झुबेदा आणि माझी बायको अशा या दोघी जणी मिळून घरी शिवणाचा व्यवसाय करतात.अधोरेखित/ ठळक शब्दाची जात कोणती? 

(1) उभयान्वयी अव्यय (2)शब्दयोगी अव्यय  (3) केवल प्रयोगी अव्यय (4) क्रियाविशेषण अव्यय 


प्रश्न (7): शेख महंमदच्या  घरी किती सदस्य आहेत?

(1)  चार (2) तीन (3) पाच (4)दोन


प्रश्न (8): खाऊची गोडी कोणाला जास्त आहे ? असे शेख महंमद म्हणतो.

(1)  बायकोला (2) आईला (3) बहिणीला (4)छोट्या मुलींना 


प्रश्न (9): शेख महंमदच्या घरी शिवणकाम कोण करते ?

(1)  झुबेदा व तबस्सुम (2)  तबस्सुम  व शेख मोहम्मद ची बायको (3)भाची आणि मुलगी (4) बहीण आणि बायको 


प्रश्न (10): झुबेदाने मॅडमसाठी काय पाठवले होते ?

(1) लिफाफा   (2) भेट  (3) चेक (4) साडी 


प्रश्न (11): पाकीट साठी कोणता  पर्यायी शब्द उताऱ्यात आला आहे ?

(1) खिसा (2)लखोटा  (3)लिफाफा  (4)पर्स


प्रश्न (12): शेख महंमदला कोणाची काळजी होती ? 

(1)मुलीची  (2)भावाची  (3) मॅडमची (4)बहिणीची


 प्रश्न (13)ते प्रश्न (17): साठी सूचना.

 *पुढील इंग्रजी शब्दासाठी वापरला जाणारा मराठी भाषेतील योग्य शब्द निवडा.*


प्रश्न (13) ऑफिस

(1)  रुग्णालय (2)हॉस्पिटल (3) बेडरूम (4) कार्यालय

प्रश्न (14): इस्पितळ

(1) ऑपरेशन (2) हॉस्पिटल  (3) शस्त्रक्रिया (4)विश्रांती


प्रश्न (15): चेक

(1) पासबुक (2)काउंटर  (3) धनादेश (4)ॲडव्हान्स


प्रश्न (16): ऍडव्हान्स

(1)नेता  (2)टवाळखोर  (3) म्होरक्या (4)आगाऊ रक्कम


प्रश्न (17): कॅन्सर

(1) रक्तदाब (2)हृदयरोग  (3) मधुमेह (4)कर्करोग


प्रश्न (18): उतारानुसार 'लोटले 'या शब्दाचा अर्थ काय होतो ?

(1) ढकलले (2)झाडून काढले (3)निघून गेले (4)परत आले 


प्रश्न (19): शेख महंमद पेक्षा खाऊची गोडी कोणाला जास्त आहे ?

(1) बहिणीला (2)  बायकोला (3)मुलींना  (4)मॅडमला


प्रश्न (20): शेख महंमद चे दुकान कोठे होते ?

(1) कंपनी जवळ (2) बाजारात  (3)घराजवळ (4)ऑफिस जवळ


प्रश्न (21): शाळकरी मुलांसाठी वह्या वाटप करण्यास लेखिका सुधा मूर्ती वह्या  कोठून घेत असत ?

(1)शाळेतून (2)ऑफिसमधून (3) कंपनीतून (4)दुकानातून 


प्रश्न (22): चुकीच्या अर्थाची जोडी निवडा.

(1)  विधवा- पती  वारलेली स्त्री .(2) भाची - बहिणीची मुलगी. (3) ऑफिस -कार्यालय.  (4)आत्या -वडिलांची आई



प्रश्न (23): मॅडम आणि इतर सर्वजण मीठाई कुठे खात होते ?

(1)घरात  (2) दुकानात (3) कार्यालयात (4)हॉटेलात


प्रश्न (24): तुला मधुमेहाचं दुखणं वगैरे आहे का? असं लेखिका शेख  महंमदला का म्हणाल्या?

(1) शेख  महंमद दवाखान्यात जाणार होता. (2)शेख महंमद आजारी होता.   (3)शेख महंमद मिठाई खात नव्हता.  (4)शेख महंमद औषध घेत होता 


प्रश्न (25): शेख महंमद मिठाई कोणाला घेऊन जाणार होता ?

(1) स्वतःला अन बायकोला  (2) मुलीला अन बायकोला  

(3)  बायकोला अन भाचीला (4)भाचीला अन मुलीला 






Comments

Popular posts from this blog

HOME