७ मराठी ६ थोरांची ओळख
भाग - २
६. थोरांची ओळख - डॉ. खानखोजे
- वीणा गवाणकर
(पाठ्यपुस्तक पान क्र. २६)
पाठाचा परिचय : थोर क्रांतिकारक व आंतरराष्ट्रीय कीर्तीचे कृषितज्ज्ञ डॉ. खानखोजे यांच्या शेतीमधील प्रयोगांची उद्बोधक माहिती या पाठात दिली आहे. मूल्य / शिकवण / संदेश भारतामध्ये होऊन गेलेल्या थोर विभूतींची ओळख व त्यांच्या कार्याचे महत्त्व : तरुण पिढीला कळावे, हा हेतू या पाठाचा आहे. समाजसेवेचे बीज तरुणांमध्ये रुजावे व मानवसेवा हीच खरी देशसेवा आहे, हा संदेश या पाठाद्वारे दिला आहे.
शब्दार्थ:-
प्रणेते - प्रेरणास्थान , प्रमुख ,अध्वर्यू
विस्मयकारी - आश्चर्यकारक. तीव्र उत्कट, कडक.
लौकिक - कीर्ती .
असंतोष – असमाधान.
सक्रीय - क्रियाशील, स्वतः कार्य करणे.
चापल्य - चपळता
कृषक - शेतकरी,
श्रम जीवी - कामगार.
सशस्त्र - शस्त्रांसहित, हत्यारांसह.
अध्यापन - शिकवणे.
व्यतिरिक्त – शिवाय.
विपुल - पुष्कळ
क्षेत्र - विभाग
पैदास - निर्मिती,
दर्जा - श्रेणी.
अपार - अथांग ,प्रचंड .
लागवड - बी पेरणी.
टिपा
(१) गदर क्रांती - गदर म्हणजे विद्रोह, तत्कालीन युद्धजन्य परिस्थितीचा फायदा घेऊन केलेला ब्रिटिशविरोधी सशस्त्र उठाव.
(२) मेक्सिको - उत्तर अमेरिका खंडातील एक देश.
(३) स्वदेशी चळवळ - परदेशी वस्तू न वापरता, स्वदेशी वस्तू वापरण्यासाठी महात्मा गांधीजींनी केलेले आंदोलन.
(४) रणशास्त्र लष्करी शिक्षण - शस्त्रांनी लढावयाचे शिक्षण.
(५) ॲकॅडमी - अकादमी, सर्वांगपूर्ण शिक्षण देणारी प्रशाला.
(६) डिप्लोमा - प्रशिक्षण पूर्ण केल्यावर दिले जाणारे सर्टिफिकेट (पदवी).
(७) वॉशिंग्टन - अमेरिकेतील राजधानीचे प्रख्यात शहर.
(८) पदव्युत्तर शिक्षण - स्नातक पदवी घेतल्यानंतरचे उच्च शिक्षण (एम. ए./एम. एससी. वगैरे),
(९) जपान - आशिया खंडातील एक देश.
(१०) कॅनडा - उत्तर अमेरिका खंडातील एक देश..
(११) इराण - मध्य पूर्व खंडातील एक आखाती देश.
(१२) मॉस्को - पूर्वीच्या सोविएत रशियाची राजधानी.
(१३) बर्लिन - जर्मनी देशाची राजधानी.
(१४) डॉक्टरेट - मास्टर ऑफ फिलॉसॉफी, पीएच. डी.- पदव्युत्तर शिक्षणानंतर एखादया विषयावर प्रबंधात्मक लिखाण केल्यावर मिळणारी विद्यापीठीय पदवी,
(१५) जेनेटिक्स- अनुवंशशास्त्र ; जनक पिढीतील गुणधर्म पुढच्या पिढीत कसे संक्रमित होतात याचा अभ्यास
(१६) वाण - नवीन संकरित बियाण्याचे मूळ सूत्र.
(१७) तांबेरा - पिकावर येणारी एक प्रकारची कीड,
(१८) संकरण - फलन प्रक्रियेत भिन्न वनस्पती पेशींचे मिश्रण, वनस्पतींच्या पेशींची मिश्रण प्रक्रिया.
(१९) डाळिंब - एका मध्यम प्रकारची साल आणि अनेक बिया असलेले फळ.
(२०) शेवगा - एक शेंगा असलेली वनस्पती (झाड),
वाक्प्रचार व त्यांचे अर्थ
(१) खलबते चालणे - दीर्घकाळ चर्चा होणे, मसलत करणे.
(२) डावपेच आखणे - (एखादया लढाईसाठी) चढाईच्या चाली (आराखडा ) तयार करणे.
(३) लढा देणे - संघर्ष करणे, झुंज देणे, संग्राम करणे.
(४) मनोमन ठरवणे - स्वतःच्या मनाशी पक्के करणे.
(५) संधी मिळणे - मोका सापडणे.
(६) कार्यरत असणे - कामात मग्न असणे.
(७) मन वळवणे - (एखाद्या गोष्टीसाठी) मन तयार करणे. (८) पर्वणी वाटणे - भरपूर आनंददायी मनःस्थिती असणे,
(९) अनुमती दर्शवणे - परवानगी असणे.
(१०) टक्कर देणे -सामना करणे, तोंड देणे.
(११) सल्ला देणे - मार्गदर्शन करणे, उपदेश करणे.
(१२) दाखल होणे - प्रवेश घेणे.
(१३) उणीव राहणे - कमतरता असणे.
(१४) प्रयत्नांची पराकाष्ठा करणे - आटोकाट प्रयत्न करणे. खूप प्रयत्न करणे.
(१५) विश्वास असणे - खात्री असणे.
(१६) प्रचार करणे - जाहीरपणे बोलबाला करणे.
(१७) नाव नोंदवणे - नाव दाखल करणे.
(१८) संघटित करणे - एकत्र करणे.
(१९) भ्रमंती करणे - भटकंती करणे, फिरणे.
(२०) नेमणूक होणे - निवड होणे.
(२१) लौकिक वाढणे - कीर्ती पसरणे.
(२२) शब्दाला मोल येणे - शब्द महत्त्वाचा ठरणे, किंमत येणे.
(२३) दबदबा वाढणे- दरारा वाढणे.
(२४) आमंत्रण देणे - बोलावणे धाडणे, निमंत्रित करणे.
(२५) गौरव करणे - सन्मान करणे.
(२६) प्रोत्साहित करणे - उत्तेजन देणे.
(२७) महत्व विशद करणे - महत्त्व समजावून सांगणे.
(२८) कळकळ असणे - आस्था असणे, तळमळ असणे.
संकलित मूल्यमापन
• प्रश्न १. विधाने सत्य की असत्य ते लिहा :
१) आजोबांच्या मांडीवर बसून भाऊ स्वातंत्र्यलढ्या विषयीच्या कथा ऐकत असत.
(२) भाऊंचे मन वळवण्यात वडिलांना यश आले.
(३) लोकमान्य टिळकांनी त्यांना परदेशी जाऊन शिकून परतण्याचा सल्ला दिला.
(४) भाऊंनी गहू, मका, तूर आणि चवळी यांचे वाण तयार केले.
उत्तरे :- (१)सत्य (२) असत्य (३) सत्य (४) सत्य
मन २. पाठाच्या आधारे कृती करा :
★★(अ) आकृती पूर्ण करा:★★
●(१) भाऊ खेडोपाडी जाऊन या विषयांवर भाषण देत
उत्तर :- (i)स्वदेशी चळवळ
(ii) भारतीय इतिहास
(iii) भारतीय चळवळ
● (२) भाऊंच्या मते, समाजातील हे दोन घटक एकत्र आले, तरच इंग्रजांना देशाबाहेर घालवता येईल
उत्तर:- (i) कृषक (ii) श्रमजीवी
●(३) भाऊंच्या मते, शेती सुधारण्यावरच हे दोन घटक अवलंबून आहेत
उत्तर:- (i) शेतकऱ्यांची खरी उन्नती (ii) आर्थिक स्वातंत्र्य
भाऊंनी शेतकऱ्यांसाठी प्रकाशित केलेल्या पुस्तिकेत या विषयांचे महत्त्व विशद केले आहे .
उत्तर :- (i) शेवग्याचा पाला (ii) शेवग्याच्या मुळ्या
(iii) शेंगांतील बिया (iv) बियांपासून सुगंधित तेल
★★(ब) नावे लिहा :★★
●(१) यांच्या भेटीसाठी भाऊ पुण्यात गेले
उत्तर :- लोकमान्य टिळक
● (२)गदर उठावातील भाऊंचे चार सहकारी:-
उत्तर :- (i) पं. काशीराम
(ii) भूपेंद्रनाथ दत्त
(iii) लाला हरदवाळ
(iv) विष्णु गणेश पिंगळे
● (३) भाऊंनी सशस्त्र लढा संघटित करण्यासाठी या देशांत भ्रमंती केली
उत्तर :- (१) जपान (२) अमेरिका (३) कॅनडा (४) इराण (५) मॉस्को (रशिया ) (६) बर्लिन (जर्मनी)
● (४) भाऊंनी तयार केलेली मक्याची नवीन संकरित जात
उत्तर :- तेवो मका
● प्रश्न ३. कंसांतील योग्य पर्याय शोधून रिकाम्या जागा भरा :
(१) भाऊंनी मास्टर ऑफ सायन्स ही पदवी .............. येथे प्राप्त केली.
(जपान / अमेरिका / मेक्सिको)
(२) जेनेटिक्स या विषयात भाऊंचा दबदबा वाढला.
(फिजिक्स / जेनेटिक्स / मॅथमॅटिक्स)
(३) भाऊंनी कृषिशास्त्र या विषयात डॉक्टरेट मिळवली.
(वनस्पतिशास्त्र / प्राणिशास्त्र / कृषिशास्त्र)
उत्तर:- (१) अमेरिका (२) जेनेटिक्स (३) कृषिशास्त्र
मुक्तोत्तरी प्रश्न
◆◆मक्यापासून कोणकोणते पदार्थ तयार होतात, त्यांची यादी तयार करा.
उत्तर : मक्यापासून तयार होणारे पदार्थ : (१) पॉप कॉर्न (लाह्या) (२) रोटी (भाकरी) (३) तेल (४) भाजी
★★★भाषाभ्यास व व्याकरण ★★★
◆ प्रश्न १. विरुद्धार्थी शब्द ( जोड्या लावा )
(१) सक्रिय x निष्क्रीय
(२) मायदेश × परदेश
(३) आघाडी x पिछाड़ी
(४) प्रगती x अधोगती
◆◆ प्रश्न २. वाक्प्रचार चे अर्थ लिहा :-
(१) प्रोत्साहित करणे
(२) टक्कर देणे
(३) पर्वणी वाटणे
(४) कळकळ असणे
(५) दवदवा असणे
उत्तर:-
(१) प्रोत्साहित करणे - उत्तेजन देणे
(२) टक्कर देणे - सामना करणे
(३) पर्वणी वाटणे - आनंददायी मनःस्थिती होणे
( ४) कळकळ असणे - आस्था असणे
(५) दबदबा असणे - दरारा असणे
◆◆◆प्रश्न ३. पुढे दिलेल्या वाक्यातील क्रियापद, क्रियाविशेषण आणि क्रियाविशेषणाचा प्रकार लिहा:-
वाक्ये :-
(१) काल तो मुंबईला गेला.
(२) तो भरभर जेवतो.
(३) इथे शहाळी मिळतात.
(४) मी तो धडा दोनदा वाचला.
उत्तर :-
क्रियापद:- (१) गेला (२) जेवतो (३) मिळतात (४) वाचला
क्रियाविशेषण :- (१) काल (२) भरभर (३) इथे (४) दोनदा
क्रियाविशेषणाचा प्रकार :- (१) कालवाचक (२) रीतिवाचक
(३) स्थलवाचक (४) संख्यावाचक
◆◆◆◆ प्रश्न ४. पुढील वाक्यांत कंसातील योग्य रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यये लिहा :
(ढसाढसा, सावकाश, टपटप्, आपोआप)
(१) माझ्या डोळ्यांतून ................ आसवे गळू लागली.
(२) मी आईच्या गळ्यात पडून ........... रडलो.
(३) रात्र होताच सगळ्यांचे डोळे .............. मिटू लागतात.
(४) पक्ष्याने आपले पंख ................. फडफडवले.
उत्तर :- (१) टपटप् (२) ढसाढसा (३) आपोआप
(४) सावकाश
■■ २. लेखन विभाग ■■
●तुम्ही काय कराल ?
तुम्ही सहलीसाठी गडावर गेला आहात, तेथील परिसरात फिरताना तुम्हांला पाण्याच्या बाटल्या व कचरा दिसत आहे. नमुना उत्तर :
(१) सगळा कचरा गोळा करून योग्य जागी ठेवू.
(२) गड-व्यवस्थापन समितीशी याविषयी चर्चा करू.
(३) शिस्तपालनाचे फलक तयार करू.
(४) स्वयंसेवी संस्थांना कल्पना देऊ.
■■ ३. तोंडी परीक्षा ■■
प्रश्न पुढील प्रश्नाचे उत्तर सांगा : •
भारतात होऊन गेलेल्या थोर देशभक्तांची चार नावे सांगा.
■■ आकारिक मूल्यमापन ■■
१. प्रकट वाचन :
• पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक २९ वरील 'वाचा' या मजकुराचे प्रकट वाचन करा.
२. चर्चा :
● 'कृषिशास्त्रात झालेल्या विविध संशोधनांमुळे धान्याची विपुलता वाढली आहे. ' या विषयावर वर्गात चर्चा करा.
३. उपक्रम :
● दूरदर्शन, वृत्तपत्रे, पुस्तके, आंतरजाल यांसारख्या विविध माध्यमांद्वारे तुम्हांला आवडणाऱ्या थोर व्यक्ती माहिती मिळवा. त्या माहितीचे हस्तलिखित तयार करा.
Comments
Post a Comment