६मराठी २५ नवा पैलू

२५. नवा पैलू   -प्रतिभा पानट 

(पाठ्यपुस्तक पान क्र. 97ते 99)



• पाठाचा परिचय:-  दिगू मूक-बधिर होता.त्याची आजी त्याला नेहमी दवाखान्यात दाखवायला यायची. एकदा तिची गाठ वत्सला या शिक्षिकेशी पडली. वत्सलाबाईंच्या मुक्यांच्या शाळेत दिगू भरती होतो. आजी शेत विकून वत्सलाबाईंच्या नवीन मुक्यांच्या शाळेला पैसे देण्याचा मनोदय व्यक्त करते. तेव्हा आजीच्या या नव्या  विचारातील नवीन पैलूचे दर्शन घडते.

शब्दार्थ

ढिम्म - बोजड. 

मुसळधार - सतत कोसळणारा धो धो पाऊस. 

आडोशाला - आश्रयाला.

हटकले - थांबवले. 

कळेनासे - समजत नाही असे. 

ओसरल्यावर - संपल्यावर.

मूक कळ्या - मुक्या कळ्या (या पाठात अर्थ मूक-बधिर बालके) . 

स्वत्व- स्वाभिमान. 

हास्य - हसू, हसणे. 

साहाय्याने - मदतीने .

उत्सुकतेने - आतुरतेने. 

टिपायला - ऐकायला. 

आनंदलहरी - आनंदाच्या लाटा. 

उल्हसित - प्रसन्न, आनंदी.

अडाणी - अज्ञानी. 

टिपा

(१) नवा पैलू - स्वभावातील वेगळे नवीन भाव, नवा दृष्टिकोन. 

(२) मूक बधिर  - बोलायला व ऐकायला न येणारा. 

(३) श्रवणऱ्हास -  हळू हळू ऐकू न येणे.

(४) श्रवणयंत्र -  ऐकू यावे म्हणून तयार केलेले साधन.

(५) हेडफोन्स - ऐकू येण्यासाठी डोक्यावरून कानाला लावण्याचे यंत्र. 

(६)हिअरिंग एड्स - ऐकू येण्यासाठी वापरायची साधने. 

(७) इंडक्शन लूप सिस्टीम  - साधारण बहिरे असणाऱ्यांसाठी आवाजाची केलेली योजना.

वाक्प्रचार व त्यांचे अर्थ

(१) आभाळ गच्च भरणे - आभाळात पावसाचे ढग भरणे.

(२) खंत करणे -  काळजी करणे, विवंचना होणे.

(३) पुटपुटणे -  स्वतःशी बोलणे.

(४) दिङ्मूढ होणे - चकित होणे. 

(५) मोहात पाडणे- भुरळ पाडणे.

(६) पक्का निर्धार करणे - ठाम निश्चय करणे.

(७) धक्का बसणे - मनाला हादरा बसणे.

(८) हळहळणे - वाईट वाटणे.

(९) स्वप्नात हरवणे - मनोमन गुंग होणे.

(१०) थक्क होणे - आश्चर्यचकित होणे, नवल वाटणे.

(११) वळण लागणे - वर्तनात अनुकूल बदल होणे. 

(१२) स्वतःच्या पायावर उभे राहणे- स्वावलंबी होणे.

(१३) अंतःकरण भरून येणे -  सद्गदित होणे.

(१४) जाणीव होणे - मनोमन कळणे.

संकलित मूल्यमापन

१. प्रश्नोत्तरे

प्रश्न १. तीन-चार वाक्यांत उत्तरे लिहा.

(१) आजी नातवाला लवकर चल, म्हणून घाई का करीत होती ?

उत्तर : आजी नातवाला दवाखान्यात घेऊन चालली होती. त्याच वेळी आभाळ गच्च ढगांनी दादून आले होते. आता  कुठल्याही क्षणी पाऊस कोसळेल असे वातावरण होते.  स्टँडपासून दवाखाना जवळ होता, पण दिगू हळू हळू चालला होता. पाऊस सुरूः व्हायच्या आत दवाखान्यात पोहोचले पाहिजे होते, म्हणून आजी नातवाला लवकर चल म्हणून घाई करीत होती.



(२) रिक्षावाल्याच्या बोलण्याने आजीच्या डोळ्यांत पाणी का आले?

उत्तर : दिगुला ऐकू येत नव्हते. दवाखान्यात जाताना एकाएकी दिगू रिक्षाच्या समोर आला. रिक्षाचा आवाज आजीला ऐकू आला, पण दिगूला ऐकू आला नाही. रिक्षावाल्याला हे माहीत नसल्यामुळे तो दिगूवर 'बहिरा आहेस की काय?' असे म्हणत ओरडला. आजीने रिक्षावाल्याचे बोलणे ऐकले. आपल्या नातवाच्या बहिरेपणाबद्दल वाईट वाटून आजीच्या डोळ्यांत पाणी आले.

(३) वत्सलाबाईनी आजीला घरी येण्याचा आग्रह का केला?

उत्तर : शहराच्या डॉक्टरांबद्दल आजी जे पुटपुटत होती ते वत्सलाबाईंनी ऐकले होते. रिक्षावाल्याने दिगूला हटकलेलेही पाहिले होते. आजीची अवस्था व दिगूचे बहिरेपण वत्सलाबाईच्या लक्षात आले होते. वत्सलाबाई मूक-बधिर मुलांच्या शाळेत शिक्षिका होती.दिगूवर इलाज करता यावा, या उद्देशाने वत्सलाबाईंनी आजीला घरी येण्याचा आग्रह केला.

(४) शाळेत गेल्यावर आजीला आनंद का झाला ? 

उत्तर : वत्सलाबाई आजीला घेऊन मूक-बधिरांच्या शाळेत आली. शाळेत हेडफोन्स लावून बसलेली मुले, माईकमधून शिकवणाऱ्या बाई हे सगळे आजीने पाहिले. एक बाई एका छोट्या मुलाला यंत्राच्या मदतीने गोष्ट शिकवत होत्या. बहिऱ्या मुलाच्या तोंडून बाहेर पडलेले उच्चार ऐकण्यास आजी आतुर झाल्या आणि ते मूल बाईसारखे हसत हसत बोलले. हे ऐकून आपला दिगूही असाच बोलेल अशी आजीने मनोमन कल्पना केल्यामुळे आजीला आनंद झाला.



(५) मूक-बधिरांची शाळा पाहून आजीच्या मनात कोणते विचार आले ?

उत्तर : वत्सलाबाईंच्या मूक-बधिर शाळेत दिगूला ठेवायचे असे आजीने ठरवले. आजीच्या मनात विचार आला की आपल्याही खेड्यात अशी मूक-बधिर शाळा काढली तर...! शेत विकून येणाऱ्या पैशांत मूक-बधिर शाळा काढायचे आजीने ठरवले. आजीने विचार केला की आपल्या गावची मुले शाळेत जातील, शिकतील, त्यांना वळण लागेल. ती स्वतःच्या पायावर उभी राहतील.

• प्रश्न २. का ते लिहा :

(१) आजी शहरात गेली.

उत्तर : दिगू बहिरा आहे हे कळल्यापासून आजी चिंतेत होती. गावातल्या लोकांच्या सांगण्यावरून दिगूचा चांगला इलाज व्हावा, म्हणून आजी शहरात डॉक्टरांकडे गेली.

(२) आजी वत्सलाबाईंच्या घरी गेली.

उत्तर : दवाखाना बंद होता. पाऊस कोसळत होता. अशा परिस्थितीत वत्सलाबाईंनी आजीला घरी येण्याचा आग्रह केला. 'उद्या मी तुम्हांला जे दाखवीन, ते पाहून तुम्ही हसत घरी जाल' या वत्सलाबाईच्या सांगण्याच्या मोहात पडल्यामुळे आजी त्यांच्या घरी गेली.

(३) आजीने गावात शाळा काढायचे ठरवले.

उत्तर : आजीला स्वतःच्या दुःखावरून सर्वच मुक्या मुलांच्या दुःखाची जाणीव झाली. आपल्या खेड्यातील  अशा मुलांचे भले व्हावे; म्हणून आजीने गावात शाळा काढायचे ठरवले.

(४) वत्सलेने आजीला शाळेत नेले.

उत्तर : मूक-बधिरांच्या शाळेतील मुलांवर होणारे उपाय आजीने प्रत्यक्ष पाहावे आणि दिगूला या शाळेत आजीने ठेवावे; या हेतूने वत्सलेने आजीला शाळेत नेले. 

• प्रश्न ३. थोडक्यात उत्तरे लिहा: 

(१) वत्सलाबद्दल पाच ते सहा ओळी लिहा.

उत्तर : वत्सलाबाई मूक-बधिरांच्या शाळेत शिक्षिका होत्या. त्यांचा स्वभाव अत्यंत हसरा व आनंदी होता. त्यांनी विचार केला की बोलकी मुले शिकतात, हसतात, खेळतात. आनंदी जीवन जगतात. अशा मुलांना कोणीही शिकवील. परंतु ज्यांच्या वाट्याला बहिरेपणाचे व मुकेपणाचे दुःख आले आहे, त्यांना कोण शिकवणार? या मुक्या कळ्यांना कोण उमलवणार? अशा मुलांच्या चेहयावर अभिमानाचे विश्वासाचे हसू फुलवायचे आणि त्यांच्यातले स्वत्व जागवायचे, असा पक्का निश्चय करून वत्सलाबाईनी व्रतस्थपणे मूक-बधिरांच्या शाळेत शिक्षिकेचे काम पत्करले. त्यांनी दिगूलाही आपल्या शाळेत इलाजासाठी आणले.

(२) या पाठाला नवा पैलू' हे शीर्षक आहे, ते योग्य कसे ते थोडक्यात लिहा. 

उत्तर: आजीने दिगूला वत्सलाबाईंच्या मूक-बधिरांच्या शाळेत घातले. त्यांना खूप आनंद झाला. पण आपल्या नातवाचेच भले व्हावे, असा त्यांनी स्वार्थी विचार केला नाही, त्यांनी आपल्या गावी अशी शाळा काढण्याचा मनोदय व्यक्त केला. त्यासाठी गावची जमीन विकून पैसा उभा करण्याचे ठरवले. आजीच्या मनातील ही उदात्त भावना त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या  'नव्या पैलू ' चे  दर्शन घडवते.  म्हातारपणातही समाजसेवेचा धडा आजीने इतरांना दिला. म्हणून 'नवा पैलू' हे शीर्षक योग्य आहे.

(३) आजीच्या थोर विचारांबाबत पाच ते सात ओळी लिहा.

उत्तर : दिगूच्या आजाराबाबत आजी  काळजीत होती. वत्सलाबाईंची शाळा पाहिल्यावर त्यांना आशेचा किरण दिसला. नातवाच्या दुःखावरून त्यांना सर्वच मूक-बधिर मुलांच्या दुःखाची जाणीव झाली. त्यांचा मनात विचार आला की आपल्याही खेड्यात अशी मूक-बधिरांसाठी शाळा काढायला हवी. त्या लगेच कृतिशील झाल्या. त्यांनी विचार केला. एक शेत विकले तर लाखाला जाईल. शाळा काढूया. माझ्या गावची मुले शाळेत जातील, शिकतील, त्यांना वळण लागून ती स्वतःच्या पायावर उभी राहतील. असे उदात्त व क्रियाशील विचार आजीच्या मनात आले.

भाषाभ्यास व व्याकरण

प्रश्न १. विरुद्धार्थी शब्द लिहा :

 (१) गच्च x विरळ (२) मूक x बोलका (३) गांव  x शहर  (४) हसरा x रडवा (५) आनंदी X दुःखी (६)पक्का X कच्चा (७) लवकर x उशिरा (८) उपकार x अपकार (९) ऱ्हास x वृद्धी

प्रश्न २. लिंग बदला  :

पुल्लिंगी शब्द :- आजोबा , शिक्षक , मित्र, मुलगा , पुरुष ,बाबा

स्त्रीलिंगी शब्द :-  आजी, शिक्षिका , मैत्रीण ,  मुलगी , बाई, आई

• प्रश्न ३. पुढील शब्दसमूहांचा वाक्यांत उपयोग करा : 

• (१) खंत करणे  - डोळ्याने अधू असणाऱ्या बेबीचे पुढे कसे होईल, याची आईला नेहमी खंत वाटते.

(२) दिङ्मूढ होणे -  वयाच्या तिसन्या वर्षी संगणक सफाईने हाताळणान्या राजूला पाहून काका दिङ्मूढ झाले. 

 (३) स्वाभिमान  - प्राचीन भारतीय संस्कृतीचा व मी भारतीय आहे याचा मला स्वाभिमान आहे.

(४) विश्वासाचे हास्य फुलणे - सरांनी सुदेशला शाबासकी देताच त्याच्या चेहयावर विश्वासाचे हास्य फुलले.

(५) पक्का निर्धार करणे - पहाटे उठून अभ्यास करण्याचा सुनंदाने पक्का निर्धार केला. 

(६) धक्का बसणे  - प्रकाशने चोरी केली हे कळल्यावर त्याच्या  मित्रांना धक्का बसला.

(७) जाणीव होणे  -  परीक्षा जवळ आली, आता तरी अभ्यासाला गंभीरपणे सुरुवात करायला हवी, याची मोहनला जाणीव झाली..

(८) थक्क होणे : उन्हात पाऊस पडताना पाहून मुले थक्क झाली.

२. तोंडी परीक्षा

प्रश्न :-  विचार करून सांगूया.

मुजावर रोजच्यासारखा शाळेला जात होता. काय झाले ते कळले नाही; पण मोटारसायकलवर जाणारा एक मनुष्य खाली पडला. त्याला उठता येत नव्हते. त्याच्या पायाला मार लागला होता, म्हणून तो कण्हत होता. डोक्याला मोठी जखम झाली होती. मुजावर एकटाच तेथे होता. त्याला काही सुचेना, आता काय करावे? तुम्ही तरी सांगा..........

आकारिक मूल्यमापन

उपक्रम

• (१) तुमच्या परिसरातील मूक-बधिरांच्या शाळेला भेट दया. त्या मुलांशी संवाद साधा. ती मुले यंत्राचा वापर करून कसे शिक्षण घेतात हे जाणून घ्या. 

• (२) वत्सलाबाई मूक-बधिरांच्या शाळेत शिक्षिका म्हणून काम करतात, म्हणजे त्या समाजसेवा करतात. तुमच्या परिसरातील अशा काम करणाऱ्या समाजसेवकांशी संवाद साधा. ते कोणते काम करतात त्याची माहिती घ्या.

स्कॉलरशिप प्रश्न

इयत्ता सहावी मराठी पाठ 25 नवा पैलू पा.नं. 97ते 99 

प्रश्न (1) : नवा पैलू या पाठाच्या लेखिका कोण ?

(1)इंदिरा संत (2) बहिणाबाई चौधरी (3)  वत्सलाबाई जोशी (4) प्रतिभा पानट 

प्रश्न (2) : प्रतिभा पानट व्यवसायाने कोण होत्या? 

(1)  दवाखान्यात नर्स (2) अशा वर्कर (3) मूकबधिर विद्यालयात शिक्षिका (4) मूकबधिर  मुलांच्या डॉक्टर  

प्रश्न (3): आजी नातवाला घेऊन दवाखाण्याकडे चालत का निघाली ? 

(1) स्टँड पासून दवाखाना  लांब नव्हता.(2)डॉक्टरनी चालत यायला सांगितले होते. (3) रिक्षावाल्याला द्यायला आजीकडे भाडे नव्हते. (4) आजीला चालण्याचा सराव होता. 

प्रश्न (4):  " चल रे बाबा लवकर लवकर !" असे आजी नातवाला का म्हणाली ? 

 (1) दवाखाना बंद होणार होता.(2)नातू चालू शकत नव्हता. (3)पाऊस सुरू होणार होता. (4) आजीला गडबड झाली होती. 

प्रश्न (5 ):  पण .......! ' त्याला सांगून काय  उपयोग?' या वाक्यात कोणकोणती  विरामचिन्हे आली आहेत ? 

(1) उद्गार चिन्ह , दुहेरी अवतरण,चिन्ह प्रश्नचिन्ह.

(2) प्रश्नचिन्ह एकेरी, अवतरण चिन्ह,स्वल्पविराम. 

(3) स्वल्पविराम,प्रश्नचिन्ह,एकेरी अवतरण. 

(4) एकेरी अवतरण चिन्ह,  प्रश्नचिन्ह,  उद्गार चिन्ह.

प्रश्न (6): "अरे पोरा,  बहिरा आहे की काय ?" या वाक्यात कोण कोणते विरामचिन्हे आलेली आहेत ? 

(1)अवतरण चिन्ह, स्वल्पविराम, प्रश्नचिन्ह.

(2)स्वल्पविराम, प्रश्नचिन्ह , उद्गारचिन्ह.

(3) दुहेरी अवतरण, चिन्ह प्रश्नचिन्ह, पूर्णविराम. 

(4)दुहेरी अवतरण चिन्ह, स्वल्पविराम,  प्रश्नचिन्ह.

प्रश्न (7):आजीच्या नातवाचे नाव काय ? 

    (1)  अजय (2) राजू (3)दिगू  (4) वत्सला

प्रश्न (8): दवाखान्याकडे लक्ष जाताच आजी विचारात पडली कारण.............

(1) दवाखान्याचा दरवाजा बंद होता. (2)डॉक्टर नव्हते . (3) वात्सल्याने आजीला थांबवले. (4) रिक्षावाला प्रश्न विचारत होता. 

प्रश्न (9): रिक्षावाल्याचे बोलणे ऐकून आजीच्या डोळ्यात चटकन पाणी आले , कारण.......

(1) रिक्षावाल्याचे बोलणे आजीला सहन झाले नाही. (2)आजी जवळ पुरेसे पैसे नव्हते.  (3)रिक्षावाला आजीला येणार नव्हता . (4) रिक्षा दिगूला धडकली होती.

प्रश्न (10): दिगू हा .............................. मुलगा होता.

(1) अपंग  (2) आंधळा (3) मुका (4) बहिरा.   

प्रश्न (11):वाक्प्रचार व त्यांच्या अर्थांच्या योग्य जोड्या लावा.

'अ' गट: (अ) आभाळ गच्च भरणे  (ब) खंत करणे  

             (क)पुटपुटणे (ड) डोळ्यात पाणी येणे

'ब'गट : (1)चिंता करणे (2)अस्पष्ट आवाजातबोलणे  

            (3) डोळे पाण्याने भरणे (4)आभाळात    

                         पावसाचे ढग जमा होणे. 

(1)  अ - 4   ,  ब - 1   ,  क -2   ,   ड-  3

(2)  अ - 4   ,  ब - 1   ,  क - 3  ,  ड-   2

(3) अ -  4  ,  ब -  3 ,  क - 2  ,   ड-   1

(4) अ -  4  ,  ब - 3   ,  क -  1 ,  ड-   2

प्रश्न (12): " कोण ग बाई तू ?" या वाक्यातील अचूक विरामचिन्हे ओळखा.

(1) दुहेरी अवतरण चिन्ह, उद्गार चिन्ह (2) स्वल्पविराम, प्रश्नचिन्ह (3) दुहेरी अवतरण, चिन्ह प्रश्नचिन्ह (4) उद्गार चिन्ह , प्रश्नचिन्ह 

प्रश्न (13) : दिगूची आई व दिगूची आजी यांचे नाते काय असावे ?

(1) आई- मुलगी (2) मुलगी- आई (3) सासू- सून (4) सून - सासू 

प्रश्न (14): आजीने दिगूला 'मूक-बधिर' शाळेत कितव्या वर्षी घातले असावे ? 

(1) चौथ्या पाचव्या वर्षी  (2)  पाचव्या सहाव्या वर्षी (3) सहाव्या सातव्या वर्षी   (4) तिसऱ्या चौथ्या वर्षी 

प्रश्न (15): वत्सला कोण आहे ?

    (1) शिक्षिका (2)डॉक्टर (3) नर्स (4) दाई 

प्रश्न (16): लोकांच्या सांगण्यावरून वयोवृद्ध आजी त्याला घेऊन वेड्या आशेने शहराच्या डॉक्टर कडे आल्या होत्या. या वाक्यात किती जोडाक्षरे आहेत ?

    (1) आठ (2) दहा (3) सात (4) नऊ

प्रश्न (17):  वत्सलाने आजीला आणि दिगुला घरी नेले. कारण ...........? 

 (1) दिगूची आई वाट पाहू नये म्हणून  (2)आजीला शहरात राहायला जागा नव्हती  (3) वत्सला  मूकबधिर शाळेत शिक्षिका होती आणि आजीला ती शाळा दाखवणार होती. (4) वत्सलाने  आजीला मोहात पाडले म्हणून.

प्रश्न (18) वत्सला अत्यंत आनंदी आणि हसऱ्या स्वभावाची होती. ठळक शब्दाच्या विरुद्ध अर्थाच्या पर्याय ओळखा. 

 (1) अत्यल्प, दुःखी (2) नाराज,  दुःखी(3) रडकी, अत्यल्प (4) दुःखी, रडक्या.

प्रश्न (19)उताऱ्यात 'मुक्या कळ्या' कोणास म्हटले 

आहे ?

 (1) झाडावरच्या कळ्यांना (2) वेलीवरच्या कळ्यांना (3) मूक - बधिर फुलांना (4) मूक - बधिर मुलांना. 

प्रश्न (20) ' गेली पाच वर्षे झालीत हसणं विसरलो आम्ही.' असे आजी वत्सलाला का म्हणाली असावी?

(1) वत्सलाने आजीला मोहात पडले (2) दिगूला ऐकायला येत नव्हते (3) आजीचे घरदार काळजीत पडले होते. (4) आजीला वात्सलकडून  हसणं मिळणार होते.


स्कॉलरशिप प्रश्न

इयत्ता सहावी मराठी पा. नं. 97 ते 99 

प्रश्न (1) : आजीला धक्का बसला होता कारण.......

(1)आजीच्या घरी कोणी मूकबधिर नसल्यामुळे.  (2) आजीचा नातू मूकबधिर असल्यामुळे. (3)आजी शहरात आली तेव्हा दवाखाना बंद होता. (4) आजीला वत्सला भेटल्यामुळे.

प्रश्न (2):वत्सला आजीला , लहान मुलांचे भाषा शिकण्याचे वय किती सांगते ?

(1) पहिलीत आल्यानंतर पाच वर्षे (2) शाळेत गेल्यानंतर पाच वर्षे (3) अंगणवाडीतील तीन वर्षे (4) जन्मापासून ची पहिली पाच वर्षे 

प्रश्न (3): वत्सला सोबत आजी दुसऱ्या दिवशी कुठे गेल्या?     

(1)वत्सलाच्या घरी (2)आजीच्या गावाला (3)मूकबधिर शाळेत (4) दवाखान्यात

प्रश्न (4): आजीला कोणत्या गोष्टीचे आश्चर्य वाटले ?

 (1) माईक मधून शिकवणाऱ्या बाई पाहून  (2) हेडफोन घालून बसलेली मुलगी पाहून  (3) मुक्या मुलांची शाळा पाहून  (4) मुक्या मुलांचा दवाखाना पाहून

प्रश्न (5):मूकबधिर मुलांच्या शाळेत गेल्यावर वत्सलाने आजीला काय दाखवले? 

 (अ)यंत्राच्या साह्याने शिकवणाऱ्या बाई  (ब)हेडफोन लावून बसलेल्या बाई (क) दवाखान्यातील मुले 

 (1)अ व क बरोबर 

 (2) ब व क बरोबर 

 (3)फक्त अ बरोबर 

 (4) अ, ब व क  बरोबर. 

प्रश्न (6)..................... मुळे मुलांना ऐकू येते ?

(1) श्रवणयंत्र (2) हेडफोन (3) चष्मा (4) दुर्बिण

प्रश्न (7): हिअरिंग सिस्टम च्या खोलीत आजीने नव्याने काय पाहिले ?

   (अ)हिअरिंग एड्स (ब) इंडक्शन लूप (क) स्पीकर व हेडफोन

   (1) अ व ब बरोबर   

   (2) ब व क बरोबर

   (3) अ व क बरोबर

    (4) अ , ब, क सर्व बरोबर

प्रश्न (8):- दिगुच्या चेहर्‍यावर हसू उमटले कारण..............? 

(अ) दिगुची आई हसत होती (ब)  दिगूची आजी हसत होती (क) वत्सलाबाई हसत होत्या

(1) अ व ब बरोबर   

   (2) ब व क बरोबर

   (3) अ व क बरोबर

    (4) अ ब क सर्व बरोबर

प्रश्न (9): वत्सलाने आजीला शाळेत नेले. या वाक्यातील कर्ता कोणता आहे ?

    (1)आजी (2) शाळा (3)वत्सला (4) नेले

प्रश्न (10): विरुद्ध अर्थी शब्दांच्या  योग्य जोड्या लावा.  

'अ' गट -  (अ) मुका (ब)  हसरा (क) पक्का (ड) गच्च

'ब' गट- (1) कच्चा (2) रडका (3) विरळ (4)बोलका 

 (1)  अ - 4   ,  ब - 1   ,  क -2   ,   ड-  3

 (2)  अ - 4   ,  ब - 1   ,  क - 3  ,  ड-   2

 (3) अ -  4  ,  ब -  3 ,  क - 2  ,   ड-   1

 (4) अ -  4  ,  ब - 2  ,  क -  1 ,  ड-   3

प्रश्न (11): ' वत्सलाने आजीला शाळेत नेले.'  या वाक्यात स्त्रीलिंगी शब्द किती आहेत ?

(1) चार  (2) तीन  (3) दोन   (4) एक 

प्रश्न (12): मुक्या बहिऱ्या मुलांच्या शाळेला पैसे देण्याचा मनोदय कोणी व्यक्त केला ? 

(1) दिगूच्या आईने (2)वत्सलाने (3)दिगूच्या आजीने (4) शाळेतील बाईने 

प्रश्न (13): मुक्या मुलांच्या शाळेला आजी पैसे कोठून देणार होत्या ?

(1)शेतात कष्ट करून (2)शेती विकून (3)दागिने विकून (4) घर किंवा खोली विकून 

प्रश्न (14) पावसाने कोणावर उपकार केले ?  

(1) माझ्यावर (2) दिगूवर (3)आजीवर (4) वत्सलावर

प्रश्न (15): पाऊस आला नसता तर काय झाले असते ?

(अ) आजी शहरातल्या डॉक्टरांकडे गेल्या असत्या. 

(ब) वत्सला व आजीची भेट झाली असती. 

(क) दिगूला मुक्यांच्या  शाळेत सोडले असते. 

(1)अ व क बरोबर (2) अ ब क बरोबर(3) फक्त अ बरोबर (4) फक्त क बरोबर

प्रश्न (16): 'वाक्यातील शब्दांच्या रूपात आपण कधी कधी बदल करतो'  अशा ज्या शब्दांमध्ये बदल होतो त्या शब्दांना  ............. शब्द म्हणतात. 

(1) विकारी शब्द (2)अविकारी शब्द (3) बदलणारे शब्द  (4) अव्यय शब्द

प्रश्न (17): वाक्यातील शब्दांच्या रूपात अजिबात बदल होत नाहीत. अशा शब्दांना .................. म्हणतात.

(1) विकारी शब्द (2)अविकारी शब्द (3) बदलणारे शब्द  (4) सव्यय शब्द

प्रश्न (18): 'माधव आणि सरिता रस्त्याने खोडकरपणा न करता तिथून घरी परतले.' या वाक्यात किती नामे आली आहेत? 

(1)पाच (2) सात  (3) सहा (4) दहा

प्रश्न (19): नामाचे एकूण प्रकार किती ?

(1)  दोन (2) तीन (3) चार (4) आठ 

प्रश्न (20):- ' सरिता नदीवर फिरायला गेली.' 

या वाक्यामध्ये विशेष नाम व सामान्य नाम अनुक्रमे कोणते ?

(1) सरिता व नदी (2) नदी व गेली (3) नदी व फिरायला (4) सरिता व गेली 

प्रश्न क्रमांक (21) ते (23) मधील भाववाचक नाम ओळखा. 

मला सशाची चपळाई आवडली.

   (1) मला (2) चपळाई (3) ससा(4) आवडली

प्रश्न (22) नीताच्या आवाजात गोडवा आहे .

 (1) आहे (2) नीता (3)आवाज (4) गोडवा

प्रश्न (23) त्याची आई माझ्याशी आपुलकीने बोलली .

  (1) त्याची (2) बोलली (3) आपूलकी (4) आई

प्रश्न (24)  'गुलाबाच्या फुलाचे सौंदर्य सर्वांनाच आवडते'. अधोरेखित/ ठळक  शब्दाची जात कोणती?

(1)  सर्वनाम (2)भाववाचक नाम (3)विशेष नाम (4) सामान्य नाम

प्रश्न (25) 'सरिता ही हुशार मुलगी आहे.'  अधोरेखित/ ठळक  शब्दाची जात कोणती ?

(1) क्रियापद  (2) नाम  (3) विशेषण  (4) सर्वनाम






Comments

Popular posts from this blog

HOME