शिक्षकांसाठी महत्वाच्या वेबसाईट :
Staff / Transfer Portal वेबसाईट लिंक.
जवाहर नवोदय विद्यालय वेबसाईट लिंक.
शिष्यवृत्ती 5 / 8वी PUPPSS वेबसाईट लिंक.
अल्पसंख्याक शिष्यवृत्ती (NSP) वेबसाईट लिंक.
आधार पॅनकार्ड लिंक करणे वेबसाईट लिंक.
Udise नंबर नुसार शाळा शोधणे वेबसाईट लिंक.
सांगली जिल्हा शालेय क्रीडा स्पर्धा विद्यार्थी नोंदणी
मुख्याध्यापकांची कर्तव्ये त्यांना यशस्वीपणे पार पाडता यावीत यासाठी त्यांनी शालेय वर्षात माहेवार कोणकोणती कामे करणे आवश्यक असते, याचा आराखडा निश्चित करावा लागतो. त्यास ' मुख्याध्यापकांचे शालेय कामाचे वार्षिक नियोजन' असे म्हटले जाते.
अ) वार्षिक नियोजनाचे महत्त्व-
कामाचे वार्षिक नियोजन केल्यामुळे कोणत्या महिन्यात कोणती कामे करून घ्यावयाची आहेत त्याची पूर्वकल्पना येते. तसेच कोणत्या महिन्यात कामाचा व्याप जास्त असणार आहे ही माहिती उपलब्ध होत असल्याने ती कामे व्यवस्थित पार पाडण्यासाठी जागरूक राहता येते. सहकारी शिक्षकांच्या कामावर योग्य नियंत्रण ठेवता येते. अर्थात वार्षिक नियोजन याचा अर्थ केवळ अध्यापनाचे वार्षिक नियोजन असा नाही. शालेय व्यवस्थापनाच्या संदर्भात अध्यापन कार्याखेरीज मुख्याध्यापकांना जी कामे करावयाची असतात त्यांची नोंद वार्षिक कामाच्या नियोजनात करावयाची असते. वार्षिक नियोजनाचा सर्वसाधारण नमुना पुढे दिला आहे. त्यानुसार कार्यवाही करावी. आणि अधिक आपल्याला माहीत असणारी कामे यामध्ये ऍड करावीत . किंवा 9421181224 या व्हाट्सएप नंबरवर कळवावे.
ब) मुख्याध्यापकांच्या कामाचे वार्षिक नियोजन
दरमहाचे उपक्रम
१. विद्यार्थी उपस्थिती आढावा.
२. राष्ट्रीय पुरुषांची जयंती/पुण्यतिथी व दिनविशेष साजरे करणे.
३. विदयार्थ्यांच्या प्रगतीचा आढावा.
४. शालेय पोषण आहार योजनेच्या कार्यवाहीचा आढावा.
५. शाळाबाह्य विद्यार्थी आढावा व पर्यायी शिक्षण नियोजन कार्यवाही.
६. आकाशवाणी/बालचित्रवाणीच्या शालेय कार्यक्रमाबाबत चर्चा.
७. अप्रगत मुलांचा आढावा व उपचारात्मक कार्यक्रमाचे नियोजन.
८. विद्यार्थी गळती आढावा व उपाययोजनेबाबत चर्चा.
९. पालक-शिक्षक संघ.
१०.शिक्षक सभा आयोजन.
११. गृहभेटी/पालक भेटी आढावा.
१२. शाळा व्यवस्थापन समिती सभा आयोजन.
माहे जून
१. दरमहाचे उपक्रम.
२. नवागतांचे स्वागत - समारंभ
३. सर्व शिक्षकांची सभा घेऊन शैक्षणिक कार्याची दिशा ठरविणे.
४. प्रवेशपात्र मुलांना दाखल करून १००% पटनोंदणीचे उद्दिष्ट पूर्ण करणे.
५. शिक्षकांकडून अभ्यासक्रमाचे वार्षिक नियोजन व वर्गनिहाय/विषयनिहाय वेळापत्रक तयार करून घेणे.
६. सर्व शिक्षा अभियान अंतर्गत मोफत पाठ्यपुस्तकांचे लाभार्थींना वाटप करणे.
७. दीर्घकालीन व अल्पकालीन गरजांचे नियोजन.
८. शाळापूर्व तयारी वर्ग सुरू करणे.
९. शालेय पोषण आहार समितीची स्थापना करणे आणि मागणी नोंदविणे.
१०. विदयार्थ्यांना गणवेश वाटप करणे.
११. उपराचात्मक वर्गाचे नियोजन करणे.
१२. शाळा व्यवस्थापन समिती व पालक शिक्षक संघ यांच्या सभांचे आयोजन करणे.
१३. शिक्षकांच्या किरकोळ रजा/दीर्घ रजा/गैरहजेरी कालावधीमध्ये कोणी कोणाच्या वर्गाचे अध्यापन करावे याचे नियोजन करणे.

माहे जूलै
१. दरमहाचे उपक्रम.
२. १००% पटनोंदणी झाल्याची खात्री करणे.
३. पालक-शिक्षक संघाची स्थापना करणे.
४. उपस्थिती भत्ता लाभार्थी मुलींची निवड करणे.
५. माता-पालक संघाची स्थापना करणे.
६. वृक्षारोपण कार्यक्रम राबविणे.
७. शाळाबाह्य मुलांसाठी पर्यायी शिक्षण योजनेचे नियोजन करणे.
८. शिक्षकांच्या पाठांचे निरीक्षण करून त्यांना मार्गदर्शन करणे व लॉगबुकात नोंद घेणे.
९. सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजनेसाठी मुलींची निवड करणे.
१०. सर्व शिक्षा अभियान अंतर्गत प्राप्त अनुदान खर्चाचे नियोजन करणे.
११. वर्गप्रतिनिधी मंडळ स्थापन करणे.
१२. शिष्यवृत्ती परीक्षेचे नियोजन करणे.
१३. दरमहा गृहपाठ तपासणीचे नियोजन इयत्तानिहाय करून संख्या निश्चित करणे.
माहे ऑगस्ट
१.दरमहाचे उपक्रम.
२.घटक चाचण्यांचे नियोजन करणे आणि विद्यार्थी प्रगतीच्या नोंदी करणे.
३. सावित्रीबाई फुले मागासवर्गीय मुलींच्या शिष्यवृत्तीचे प्रस्ताव ३१ ऑगस्टपर्यंत पाठविणे.
४.अस्वच्छ क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांच्या पाल्यांचे शिष्यवृत्ती प्रस्ताव पाठविणे.
५. माजी सैनिक पाल्य शिष्यवृत्ती प्रस्ताव पाठविणे.
६. विविध स्पर्धा परीक्षांसाठी मुलांची तयारी करून घेण्याचे नियोजन करणे.
७. अपंग शिष्यवृत्तीबाबत प्रस्ताव पाठविणे.
८. समाजकल्याण विभागामार्फत मिळणाऱ्या शिष्यवृत्तींचे प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयास पाठविणे.
९. शाळा व्यवस्थापन समितीच्या बैठकीचे आयोजन करणे.
१०. स्वातंत्र्यदिन साजरा करणे.
११. पालक शिक्षक व माता-पालक सभा घेणे आणि प्रथम चाचणीतील विद्यार्थी प्रगतीची चर्चा करणे.
माहे सप्टेंबर
१. दरमहाचे उपक्रम
२. अप्रगत व अनियमित उपस्थित विदयार्थ्यांसाठी पालक भेटींचे आयोजन करणे.
३. विद्यार्थ्यांसाठी तज्ज्ञ व्यक्तीचे व्याख्यान आयोजित करणे.
माहे आक्टोबर
१. दरमहाचे उपक्रम.
२. घटक चाचणी क्रमांक दोनचे आयोजन करणे आणि विद्यार्थी प्रगतीच्या नोंदी घेणे.
३. शाळा व्यावस्थापन समिती बैठक आयोजन.
४. तालुका विज्ञान प्रदर्शनात शाळेचा सहभाग नोंदविणे.
५. सांख्यिकीय प्रपत्र पूर्तता करून वरिष्ठांकडे पाठविणे.
माहे नोव्हेंबर
१. दरमहाचे उपक्रम.
२. सत्र परीक्षा व दोन चाचण्यांचे निकालपत्रक तयार झाल्याची खात्री करणे.
३. पालक सभा आयोजन करणे. विद्यार्थी प्रगतीची चर्चा करणे.
४. शिक्षक विद्यार्थी यांचेसाठी छंदवर्गाचे आयोजन करणे.
५. मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांसाठी अल्पबचत संचयिका.
६. शाळा व्यवस्थापन समिती बैठक आयोजन करणे.
७. बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करणे.

माहे डिसेंबर
१. दरमहाचे उपक्रम.
२. घटक चाचणी क्रमांक तीनचे आयोजन करणे
३. वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करणे.
४. क्रीडास्पर्धांचे आयोजन करणे.
५. ध्वजनिधी संकलन करणे.
माहे जानेवारी
१. दरमहाचे उपक्रम.
२. प्रजासत्ताक दिन साजरा करणे.
३. कुटुंब सर्वेक्षण करणे.
४.शाळेत स्काऊट गाईड, कब, बुलबुल शिबिर यांचे आयोजन करणे.
५. सावित्रीबाई फुले जयंती व बालिकादिन साजरा करणे. महिला मेळाव्याचे आयोजन करणे.
६. शिष्यवृत्ती परीक्षा व नवोदय परीक्षा आढावा घेणे.
७. पाठ निरीक्षण व मार्गदर्शन करणे.
माहे फेब्रुवारी
१. दरमहाचे उपक्रम.
२. घटक चाचणी क्रमांक चारचे आयोजन करणे आणि विद्यार्थी प्रगतीच्या नोंदी घेणे.
३. शिष्यवृत्ती परीक्षांसाठी तालुका पातळीवर मुले पाठविण्याचे नियोजन करणे.
४. गावपातळी शैक्षणिक आराखडा व अंदाजपत्रक तयार करणे.
५. शाळा व्यवस्थापन समितीची बैठक आयोजित करणे.
माहे - मार्च
१. दरमहाचे उपक्रम
२. अभ्यासाची उजळणी घेणे.
३. तोंडी परीक्षा घेणे.
४. उपचारात्मक कार्यक्रम घेणे.
५. द्वितीय सत्र परीक्षेचे नियोजन करणे.
माहे - एप्रिल
१. दरमहाचे उपक्रम.
२. द्वितीय सत्र परीक्षेचे आयोजन करणे आणि विद्यार्थी प्रगतीच्या नोंदी करणे.
३. विदयार्थ्यांचे वार्षिक मूल्यमापन करून निकाल तयार करणे.
४. शाळा व्यवस्थापन समितीची बैठक आयोजित करणे.
माहे - मे
१. महाराष्ट्र दिन साजरा करणे.
२. वार्षिक निकाल जाहीर करणे.
३. शिक्षक सभा घेऊन वार्षिक तपासणीमधील अभिप्रायाची चर्चा व पुढील शैक्षणिक वर्षाचे अध्यापनविषयक नियोजन करणे.
अशा प्रकारे मुख्याध्यापक यांना वर्षभर विविध उपक्रम, सहशालेय कार्यक्रम, विविध शैक्षणिक व प्रशासकीय कार्यक्रम, सभा, शालेय अभिलेखे पूर्ण करावी लागतात. केवळ ऐवढीच नाही तर वेळोवेळी शासनामार्फत राबवले जाणारे विविध शैक्षणिक व इतर उपक्रम, शासकीय योजनी या बाबतची कार्यवाही करावी लागते.
आपणास हे ही आवडेल.
Comments
Post a Comment