६मराठी, १९.मले बाजाराला जायाचं बाई !

 १९.मले बाजाराला जायाचं बाई !

                          -प्रभा र. बैकर

              (पाठ्यपुस्तक पान क्र. ७३)

● पाठाचा परिचय ●  हे एक पथनाट्य आहे. प्लॅस्टिकच्या वापरामुळे पर्यावरणाची हानी होते. त्यावर कोणते उपाय करावेत, हा संदेश या पाठात भारुडाच्या अंगाने मार्मिकपणे दिला आहे.




शब्दार्थ :- 

मले- मला. न्हाई- नाही. नगं - नको, आवं- अहो. काय बाय - काही बाही. सौंसाराला - संसाराला, त्ये - ते .सम्द - सगळे. घिऊन - घेऊन. समद्या -सगळ्घा. त्योच - तोच, हाय -आहे. घोटाळा- गोंधळ, वतून - ओतून. म्हंजी -म्हणजे. तुडुंब -  काठोकाठ.  मंग- मग. ध्यानात - लक्षात. म्हते-  म्हणते. माजी - माझी. तिले – तिला. कशापायी – कशामुळे. म्या - मी. चाऱ्यागत - चाऱ्या प्रमाणे, चारा म्हणून. चगळल्या -  चघळल्या, चावल्या. अंगठाबहाद्दर-अडाणी, अशिक्षित . समिंदर-समुद्र, दर्या. त्येच्यासाठी - त्याच्यासाठी. डोल्यातून - डोळ्यांतून. आसवं- अश्रू. आरं- अरे. विळख्यातून -  पाशातून . सुदीक - सुद्धा. यवढंच - एवढेच. आनखी - आणखी . वायदा - आश्वासन, वचन. ओसाड - भकास, वैराण. वसुंधरा- पृथ्वी, भूमी .व्हय  - होय. पर , पण. 

धरनार - धरणार. हाई - आहे. निचरा - निघून जाणे, साफ होणे. आर्ततेने - व्याकुळतेने, आळवणी करून.

टिपा

(१) पथनाट्य - रस्त्यावर सादर करावयाची नाटिका,

(२) कॅरीबॅग - प्लॅस्टिकची  छोटी पिशवी.

(३) सांडपाणी- मलमूत्र आणि  धुणी भांडी केल्याने होणारे विसर्जनाचे पाणी.

(४) रडगाणी - दुःखात पुन्हा पुन्हा गायलेली गाणी.

(५) खंडी - धान्य मोजावयाचे पूर्वीचे वजनमाप.

(६) काळी माय  - ग्रामीण भागात शेतजमिनीला 'काळी आई' म्हणतात.

(७) भारूड - संत एकनाथांनी रुजवलेला लोकछंदाचा एक प्रकार, बहुरूड,

(८) रेडकू -  म्हशीचे पिल्लू.

(९) हरणी  - (इथे अर्थ) बाईच्या म्हशीचे नाव,


वाक्प्रचार व त्यांचे अर्थ

(१) डोक्याला हात लावून बसणे - हताश होणे.

(२) ध्यानात येणे  - लक्षात येणे.

(३) मरण ओढवणे - मृत्यू येणे.

(४) आक्रीत घडणे - वाईट होणे.

(५) उपदेश करणे  - शिकवण देणे.

संकलित मूल्यमापन

• प्रश्न १. तीन-चार वाक्यांत उत्तरे लिहा :

१. प्रश्नोत्तरे

(१) बाजाराला जायचे नाही, असे बाई का म्हणतात ?

उत्तर: बाजारातून वस्तू प्लॅस्टिकच्या पिशव्यांमधून आणाव्या लागतात. वस्तू डब्यांत भरून प्लॅस्टिकच्या पिशव्या फेकून दिल्या जातात. त्या गटारात अडकून नाल्या तुंबतात. म्हणून बाजाराला जायचे नाही, असे बाई म्हणतात. 

(३)फेकून दिल्याने काय ?


उरफेकून दिल्याने गटारे बतात. जनावरे त्या चाग म्हणून खाऊत मरतात. खो जलवोही मरतात. शेतात पीक येत नाही. करपासून जीवांना धोका आहे.


(३) बाईच्या हरणीचे मरण का ओढवले?

उत्तर :- बाईची हरणी नावाची म्हैस होती. तिने चारा समजून प्लॅस्टिकच्या कॅरिबॅगा चघळल्या. त्यामूळे तिच्या हरणीचे मरण ओढवले.

प्रश्न २. असे का घडले?

(१) काळी माय ओसाड झाली.

उत्तर : नांगरलेल्या जमिनीतून प्लॅस्टिकची जाळी अडकते. शेतात पीक येईनासे होते. म्हणून काळी माय ओसाड झाली. जिवाला धोका उत्पन्न होतो.

(२) सरकारने आदेश काढून संदेश दिला.

उत्तर : प्लॅस्टिकच्या कॅरिबॅगमुळे जनावरांचे मरण ओढवते. शिवाय सजीवांच्या म्हणून सरकारने आदेश काढून संदेश दिला.

(३) समुद्रकिनाऱ्यावर जलचर मरून पडले.

उत्तर: समुद्रातील पाण्यात प्लॅस्टिकच्या कॅरिबॅगांचा विळखा बसला. म्हणून समुद्रकिनाऱ्यावर जलचर मरून पडले.



(४) बाई बाजाराला जायला तयार झाल्या.

 उत्तर :- प्लॅस्टिकची पिशवी वापरायची नाही. त्याऐवजी कापडाची आणि कागदाची पिशवी वापरून पृथ्वीची

प्रतिज्ञापूर्वक ठरले. म्हणून बाई बाजाराला जायला तयार झाल्या.


प्रश्न ३. कोण कोणास व का म्हणाले?

(१) 'सांग रे बाबा सांग मले आठवत नाय. पेपरात आलंय तरी काय?'

(२) प्लॅस्टिकची जाळी वरती आली.'

उत्तर :- 

(१) 'सांग रे बाबा सांग मले आठवत नाय. पेपरात आलंय तरी काय?' असे तिसरा पहिल्याला म्हणाला. सरकारने 'प्लॅस्टिक नका वापस' असा संदेश बातमोतून दिला, हे पहिल्याने सांगितले, म्हणून तिसऱ्याने हे वाक्य उच्चारले.

(२) प्लॅस्टिकची जाळी वरती आली.' असे बाई तिसयाला म्हणाली. तिसऱ्याने 'काळी माय' ओसाड कशी होते. हे बाईला विचारले, म्हणून बाई तिसन्याला असे म्हणाली.


मुक्तोत्तरी प्रश्न

(१) ओला कचरा व सुका कचरा यांमध्ये कोणकोणत्या वस्तूंचा समावेश होतो, याबाबत मित्रांशी चर्चा करा व त्यांची यादी तयार करा.

उत्तर : सुका कचरा

(१) कागदाचे कपट

(२) केसांचा गुंता

(३) टरफले, छिलके 

(४) टाकाळ घन वस्तू

ओला कचरा

(१) उरलेली भाजी

(२) उरलेले वरण

(३) चहाची पत्ती

(४) ओल्या साली

(२) प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर बंद केल्याने कोणकोणते फायदे होतील याची कल्पना करा :

  उत्तर : (१) गटारे तुंबणार नाहीत. (२)बाटा मोकळ्यातील (३) दानी नाही. (४) गुरेकर सरणार नाहीत. (५) समुद्रातील क्लबरगती होणार नाही (७) पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन होईल.

(१) नई - नाही

(२) सौमाराला -  संसाराला 

(३) हं -पणजे

(4) माजी - माझी

(५)  म्हंते - म्हणते

(७) त्येज्यासाठी - त्याच्यासाठी

(८)डोल्यातून-  डोळ्यांतून

(१०) हाय-  आहे

(११) व्हय - होय

एडेच -तो. 

(१२) यो

प्रश्न २

माझी आजी अंगठाबहाददर आहे. 

अंगठाबहाद्दर म्हणजे अशिक्षित तसे पुढील शब्दाचे अर्थ समजून घ्या. त्यांचा वाक्यांत उपयोग करा :


(१) अकलेचा कांदा- मूर्ख मनुष्य,

वाक्य:-  सुरेश स्वतःला फार बुद्धिमान समजतो, पण तो अकलेचा कांदा आहे.

(२) उंटावरचा शहाणा - मूर्खपणाचा सल्ला देणारा .

वाक्य - पर्यावरणाच्या प्रश्नावर गावकरी चर्चा करीत असताना उंटावरचा शहा म्हणाला असलेली झाडे आधी तोडा.

 (३) उंबराचे फूल - क्वचित भेटणारी व्यक्ती.

वाक्य -  मास्तर सहा महिन्यांनी गावात आले. अगदी उंबराचे फूल झाले आहेत.

(४) एरंडाचे गुन्हाळ-  कंटाळवाणे भाषण करणे.

वाक्य : माईक काय हातात आला. सरपंचांनी एरंडाचे गुन्हाळ लावले! 

(५) कळीचा नारद-भांडणे लावणारा.

वाक्य :- एखादा मुद्दा हळूच सोडून परेश नामानिराळा होतो. अगदी कळीचा नारद आहे तो।

(६) गळ्यातला ताईत - अतिशय प्रिय.

वाक्य:-  वर्गातला महेश आजकाल गुरुजींच्या गळ्यातला ताईत झाला आहे.

(७) जमदग्नी - अतिशय रागीट मनुष्य.

वाक्य - अगदी क्षुल्लक गोष्टींवरून पटकन चिडणारे काका जमदग्नीचा अवतार झाले आहेत.

(८) झाकले माणिक - साधा पण गुणी मनुष्य

वाक्य: सरिता जिल्हयात सर्वप्रथम येईल, याची कुणालाच कल्पना नव्हती. झाकले माणिक होती ती!

(९) दीड शहाणा - मूर्ख

वाक्य  - कुठल्याही विषयात नाक खुपसणारा अरुण दीड शहाणा आहे. 

(१०) लंकेची पार्वती -  अंगावर दागिने नसलेली स्त्री.

वाक्य : लग्नात सोन्याने मढलेली शोभना एका वर्षात अगदी लंकेची पार्वती झाली.

प्रश्न ३.लिंग ओळखा आणि पुढे तो/ती/ते लिहा. 

(१) रेडकू-  (२) पिशवी - (३) किनारा - ( ४) वसुंधरा -

उत्तर:- 

(१) रेडकू-  नपुंसकलिंग -ते

(२) पिशवी - स्त्रीलिंग -ती

(३) किनारा -पुल्लिंग -तो.

( ४) वसुंधरा -स्त्रीलिंग- ती


काळ 

काळाचे मुख्य  प्रकार

 (१)  वर्तमानकाळ (२) भूतकाळ (३) भविष्यकाळ.

  काळाचे  चार उपप्रकार पडतात.


   वर्तमानकाळाचे चार उपप्रकार

साधा वर्तमानकाळ

अपूर्ण वर्तमानकाळ

 पूर्ण वर्तमानकाळ

रीती वर्तमानकाळ

      साधा वर्तमानकाळ उदाहरणे 

(१) रमाकांत गाणे ऐकतो.

(२) दादा सायकल चालवतो.

(३) पक्षी किलबिल करतात..

या सर्व क्रिया वर्तमानकाळात घडतात; ही सर्व वाक्ये साधा वर्तमानकाळ आहेत.


पूर्ण वर्तमानकाळ उदाहरणे 

(१) माझ्या ताईने गाणे गायले आहे.

(२) सूर्य पश्चिमेला मावळला आहे.

(३) संजय घरी पोहोचला आहे.

वरील वाक्यांमधील क्रिया नुकतीच पूर्ण झालेली आहे, म्हणून हा पूर्ण वर्तमानकाळ होय.


अपूर्ण वर्तमानकाळ उदाहरणे

(१) पूनम अभ्यास करीत आहे.

(२) आई भाजी चिरत आहे.

(३) मुले क्रीडांगणावर खेळत आहेत.

या वाक्यांतील क्रिया अजून अपूर्ण असल्यामुळे हा अपूर्ण वर्तमानकाळ होय.


रीती वर्तमानकाळ उदाहरणे

(१) संध्या गीत गात असते.

(२) रोहिणी चित्र रंगवत असते.

(३) आई उत्तम पदार्थ बनवत असते.

क्रियापदांवरून गाण्याची, चित्र वरील रंगवण्याची पदार्थ बनवण्याची क्रिया सतत, नेहमी घडण्याची रीत (प्रथा) आहे असा अर्थ व्यक्त होतो, म्हणून त्याला रीती वर्तमानकाळ म्हणतात.


प्रश्न क्र.४. खाली दिलेली वाक्ये वाचा .वाक्याचा काळ ओळख आणि उरलेल्या प्रकारात  काळ बदलून  वाक्य पुन्हा लिहा:


(१) आजी भाजी विकते.

(२) सोनार दागिना घडवतो

(३)आजी भाजी विकत आहे.

(४)सोनार दागिना घडवत आहे.

(५)आज पाऊस आला.  

(६) अजय सहलीला जातो.

(७)आई बाळाला भात भरवते.

(८)आज पाऊस येत आहे.

(९)अजय सहलीला जात आहे.

(१०) आई बाळाला भात भरवत आहे.

(११) आजीने भाजी विकली आहे.

(१२) सोनाराने दागिना घडवला आहे.

(१३) आज पाऊस आला आहे.

(१४) अजय सहलीला गेला आहे.

(१५)आईने बाळाला भात भरवला आहे.


२. लेखन विभाग

(१) किराणा माल खरेदी करायला जाताना तुमचे आई-वडील कोणती तयारी करतात? त्याचे निरीक्षण

करा व लिहा. 

उत्तर :- [मुद्दे - किराणा मालाची यादी - कापडाच्या व कागदाच्या पिशव्या पैशाचे पाकीट ]

• (२) तुम्ही किराणा दुकानात गेले असताना कापडी पिशवी घेऊन न येणाऱ्या काकांनी दुकानदाराला प्लॅस्टिकची पिशवी मागितल्यानंतर तुम्ही काका व दुकानदार यांच्यातील संवाद लिहा.

उत्तर : संवाद :

काका:  (दुकानदाराला) माझा किराणा माल झाला ना काढून? आता मोठी प्लॅस्टिकची पिशवी दया.

दुकानदार :  थांबा हा. देतो.

मी  :-  दुकानदार  काका  , अजिबात प्लॅस्टिकची पिशवी देऊ नका त्यांना! 

 काका:- का रे बाळा? या वस्तू घरी कशा नेऊ? मी प्लॅस्टिकच्या पिशवीचे जादा पैसे देतो हवे तर.

मी : प्रश्न पैशांचा नाही, काका! पर्यावरणाचा आहे..

दुकानदार:-  म्हणजे काय रे? 

मी : या प्लॅस्टिकच्या पिशव्या गटारात अडकतात. गटारे तुंबतात. रोगराई वाढते.

काका :- एका पिशवीने काय आभाळ कोसळणार आहे ? मी : तसं नव्हे काका! हे पाहा, सगळ्यांनीच असा विचार केला, तर मग अनर्थ होईल.

काका : तो कसा रे बाळा? 

मी : काका, तुम्हाला माहीत आहे का? प्लॅस्टिक खाऊन गुरेढोरे मरतात. समुद्रातील जलचर मरतात. आपल्यालासुद्धा धोका निर्माण झाला आहे!

काका :- असे का? बरे! मग वस्तू कशात घेऊ?

मी : कापडी किंवा कागदी पिशव्या वापरा. मी तुम्हांला विनंती करतो.

काका : पटलं बरं मला ! आजपासून मी प्लॅस्टिक पिशव्या वापरणार नाही आणि दुसऱ्यांनाही पटवून देईन,

दुकानदार, मला एक कापडी व एक कागदी पिशवी दया.

दुकानदार :- हा घ्या.

मी : थैंक्यू काका! दोन्ही काकांना थँक्यू !!

दोघे : तू कशाला थँक्यू ! आम्हीच थँक्यू !!


३. तोंडी परीक्षा

प्रश्न. पुढील प्रश्नांची तोंडी उत्तरे सांगा :

(१) बाजारात जाताना तुम्ही आई वडिलांना काय सांगाल ?(२) प्लॅस्टिक कचरामुक्त अभियानात भाग घ्यायला तुम्हांला आवडेल का? का?

आकारिक मूल्यमापन

१. भाषण- संभाषण :

●हे पथनाटय वर्गात स्नेहसंमेलनात गावात सादर करा.

२. कृती / प्रात्यक्षिक :

(१) पुढील चित्राचे निरीक्षण करा, पाठ्यपुस्तक पान नं.  ७८ वरील चित्रातील हे दृश्य पाहून सूचनांचे फलक तयार करा :



उत्तर :     ● कुठेही कचरा  टाकू नका.●

    ● कचराकुंडीत कचरा टाका.●

●    पाणी वाया घालवू नका.●

   ●  कचरा गोळा करणाऱ्या विदयार्थ्यांना सहकार्य करा.●

●  बागेची स्वच्छता राखा.●


● (२) शाळा-शाळांमधून प्लॅस्टिक कचरामुक्त अभियान हा उपक्रम राबवला गेला. प्लॅस्टिकचा कचरा गोळा करताना तुम्ही कोणकोणत्या वस्तू उचलल्या ते लिहा. 

●  उत्तर : (१) प्लॅस्टिकच्या पाण्याच्या बाटल्या. (२) प्लॅस्टिकच्या छोटया-मोठ्या  वस्तू  (३) प्लॅस्टिकच्या कॅरिबॅगा, (४) प्लॅस्टिकच्या मोडलेल्या बाहुल्या व इतर खेळणी. (५) प्लॅस्टिकच्या दोन्य, वायर्स व इतर वस्तू.

३. गटचर्चा:

●  कोणकोणत्या प्लॅस्टिक वस्तूंचा पुन्हा वापर करता येईल? याबाबत मित्रांशी चर्चा करा व त्याची यादी तयार करा.

[मुददे : (१) रिसायकलिंग करून औषधाच्या बाटल्या. (२) दवाखान्यातल्या उपयोगी (३) अत्यावश्यक वस्तू.]


४. उपक्रम :

(१) टाकून दिलेल्या प्लॅस्टिकच्या वस्तूंमध्ये रोपटी लावा व छान बाग तयार करा. 

(२) प्लॅस्टिक पिशव्या न वापरण्याच्या संदर्भात गटनिहाय किमान दहा घोषवाक्ये तयार करा.


५. शब्दकोडे

पुढील चौकटींत काही म्हणींचे अर्थ दिले आहेत ते वाचा. त्यावरून म्हणी ओळखा व लिहा : 

(१) न आवडणाऱ्या माणसाने कितीही चांगली गोष्ट केली, तरी ती बाईट दिसते. त्या व्यक्तीचे काम आवडत नाही.

(२) एखाद्या माणसाला काम करता येत नसले, की तो कारणे देत असतो.

(३) एखादी गोष्ट तात्काळ व्हावी याकरिता काही लोक उतावळेपणाने जे उपाय करतात त्यांना हे म्हटले जाते.

(४)जे समोर दिसते त्यासाठी कोणत्याही पुराव्याची गरज भासत नसते.

उत्तर :

(१) नावडतीचे मीठ आळणी.

(२) नाचता येईना अंगण वाकडे.

(३) उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग.

(४) हातच्या कांकणाला आरसा कशाला?

Comments

Popular posts from this blog

HOME