६मराठी २३ परिवर्तन विचारांचे
२३ परिवर्तन विचारांचे
प्रश्न (1) कोणाचा पाय मुरगळला होता ?
(1) अजयचा (2) अजयच्या सरांचा (3) अजयच्या मित्राचा (4) अजयच्या आईचा.
प्रश्न (2) ' मांजर इकडून तिकडे फिरणार.' यावरून सजीवाचे कोणते लक्षण दिसते?
(1)धावपळ करणे (2) हालचाल (3) वाढ (4)प्रजनन
प्रश्न (3) 'अणकुचीदार' या शब्दाचा अर्थ खालीलपैकी कोणता ?
(1) सपाट (2) धारदार (3) टोकदार (4)बोथट
प्रश्न (4) मुलांच्या मध्ये आनंद ओसंडून का वाहत होता ?
(1) सहल जाणार होती . (2) सहलीला पालक येणार होते. (3) शाळा सुटली होती . (4)शाळा भरणार होती.
प्रश्न (5) बसचे टायर किती किलोमीटर अंतरावर पंक्चर झाले?
(1) तीन- चार (2) चार -पाच (3) पाच - सहा (4)सात- आठ
प्रश्न (6) कोणाचे मतपरिवर्तन झाले?
(1) अजय (2) आई (3) सर (4) त्याचा मित्र
प्रश्न (7) सरांनी अजयला हाक मारुन का थांबवले असावे ?
(1) विचारपूस करण्यासाठी. (2) पैसे देण्यासाठी. (3) अजयने खोड काढली होती म्हणून. (4) अजय वाट चुकून घरी जात होता म्हणून.
प्रश्न (8) "अजयच्या खांद्यावर सरांनी हात ठेवला. " या वाक्यातील शब्दयोगी अव्यय कोणते ?
(1) च्या (2) वर (3) नी (4)ला
प्रश्न (9) "अणकुचीदार " या शब्दात किती व्यंजने आहेत ?
(1) चार (2) पाच (3) सहा (4) सात
प्रश्न (10) कोणता वार वाईट असतो ?
(1)ज्या दिवशी वाईट काम करू तो दिवस.
(2)दुसऱ्यांना त्रास देऊ तो दिवस.
(3) दुसऱ्याची मने दुखवू तो दिवस.
(4) शनिवार हा वार वाईट असतो.
प्रश्न (11) अजय शिक्षकांचा आवडता विद्यार्थी होता ; कारण.............
(1) तो हुशार होता. (2) तो मैदान गाजवायचा. (3) तो अभ्यासातल्या अडचणी सोडवायचा (4)एक ते तीन बरोबर
प्रश्न (12) मुलांची सहल केव्हा परत आली ?
(1) सकाळी (2) दुपारी (3) संध्याकाळी (4)रात्री
प्रश्न (13) अजय कितवीत शिकणारा मुलगा होता?
(1) सहावी (2) सातवी (3) आठवी (4)नववी
प्रश्न (14) "शाळेत सहलीचे वारे वाहू लागले." वारे वाहू लागले या शब्दांचा अर्थ काय ?
(1)वादळ येणे. (2) झुळूक येणे.
(3) वारा सुटणे . (4) बोलबाला होणे
प्रश्न (15) अजय ची सहल कोणत्या वारी जाणार होती?
(1) शुक्रवारी (2) शनिवारी (3) रविवारी (4) सोमवारी
प्रश्न (16) शाळेतील विज्ञानाचा चांगला अभ्यास करणारा विद्यार्थी कोण?
(1) अजय (2) राजू (3) सुजय (4) विजय
प्रश्न (17) "अजय च्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला." अधोरेखित / ठळक वाक्यप्रचाराचा अर्थ काय ?
(1) उजेड पडला (2) दिसू लागले
(3) लक्षात आले (4) चमकले
प्रश्न (18) उताऱ्यात आलेली म्हण कोणती?
(1) ना कर्त्याचा वार शनिवार. (2)चलबिचल होणे.
(3) मांजर आडवे जाणे. (4)पाल चुकचुकणे.
प्रश्न (19) "कोणताही वार वाईट नसतो! " असे कोण कोणास म्हणाले?
(1) अजय सरांना म्हणाला. (2) सर अजयला म्हणाले .
(3) आई अजयला म्हणाली. (4)अजय आईला म्हणाला.
प्रश्न (20) अजयचा सहलीतला दिवस कसा गेला ?
(1) आनंदात (2) रागात (3) कामात (4) चर्चेत
प्रश्न (21) दुसऱ्यांची मने दुखवतो तो दिवस कसला मानला पाहिजे?
(1) आनंदाचा (2) दुःखाचा (3) वाईट (4)मजेशीर
प्रश्न (22) अजयने आईला काय बजावून सांगितले?
(1) सकाळी मला लवकर उठव. (2) मी सहलीला जाणार नाही. (3) सहलीचे पैसे आजच्या आज दे. (4) मला उशीर होईल.
प्रश्न (23) अजयच्या घरात पाल चुकचुकली तेव्हा कोणती वेळ होती ?
(1) सकाळ (2) दुपार (3) रात्र (4) संध्याकाळ
प्रश्न (24) मुलांनी सहलीत कशाचे निरीक्षण केले?
(1) सरांचे (2) डोंगराचे (3) निसर्गाचे (4)बसचे
प्रश्न (25) "अजय, कशी झाली सहल ?"असे सर म्हणाले. तेव्हा कोणती वेळ होती?
(1) सकाळ (2) दुपार (3) संध्याकाळ (4)रात्र
Comments
Post a Comment