इतर गीते

 माये गं माये , नको तोडू माझी साळा .....


( प्रस्तुत कवितेत श्रमजीवी समाजातील मुलगी आपली शिकण्याची दुर्दम्य इच्छा आईला अर्जव करून सांगत आहे. ध्येयाचा ध्यास लागला तो घेतला की सर्व प्रकारच्या अडचणींवर मात  करून त्याची पूर्तता करता येते.  असा आशावाद  येथे व्यक्त  केला आहे. )


माये गं माये , नको तोडू माझी साळा ।

लई लई शिकून मोठं व्हायचंय मला ।।धृ।।


परवा आमच्या बाई म्हणाल्या का नाई,

तुमची पोरगी डोक्यानं लई बेस हाई,

तवापून एकच सपान पडतंय मला ।

माये गं माये , नको तोडू माझी साळा ।।१।।


बेबीताई देणार आहेत त्यांची बुकं,

व्हयांनाच  पडतील ना बग थोडंसं पैकं ।

पण  येक नवं काम हाय मिळणार मला,

माये गं माये , नको तोडू माझी साळा .....।।२।।


फाटं उटन ,  रंग्या संग्याला बघंन ,

भाकरी मी भराभरा थापून टाकंन।

बकरीची घाण लोटून जाईन पाण्याला,

माये गं माये , नको तोडू माझी साळा .....।।३।।

 

 

थोड्याशा बी खर्चात नाही पडणार तुला,

गणवेश फाटलाय,  पण चालंल मला।

रिबनी नगं, दप्तर नगं ,  नगं पैसं खायला ,

माये गं माये , नको तोडू माझी साळा .......।।३।।


 मी जाणते गं माये तुझ्या काळजाच्या  कळा,

 पाच कच्ची बच्ची नि दारुड्या दादाला। 

 पण मी आहे ना तुझ्या संग दुःख  झेलाया,

 माये गं माये , नको तोडू माझी साळा ....।।४।।

 

अन माये जवा लय शिकून नंबर काढिन पयला ,

तवा तुझं डोळं भरून येत्याल  घळाघळा । 

तो अश्रू माझ्यासाठी हाय सोन्याचा गोळा,

माये गं माये , नको तोडू माझी साळा ....।।५।।


(काळीजकुपी)





समभाव गीत 

ऐका ऐका हो दोस्तानो


ऐका ऐका हो  दोस्तानो,माय बापाची कहाणी । 

बाप नारळी खोबरं,  माय नारळाच पाणी ।।धृ।।


बाप कष्टकरी माझा, करी रान हिरवगार ।

माय हरिण काळीज, पिका  जपतिया फार ।।

बाप शिवाराचा धनी,  माय धन्याची    ती राणी ।। १।।

              बाप नारळी खोबरं,...... 


माय लुगडी  नेस्तीया  , दोन तीन  ठीगळाचं।

तीला  पुरना  ठिगाळ , भल्या मोठ्या आभाळाचं ।।साधीसुधी माझी माय,  तिची साधीच  रहाणी  ।। २।।

                        बाप नारळी खोबरं,...... 

एकदा आई-बाबा मंधी पैज अशी हो लागली ।

सांगा कोण गावनी पोर , हाय कोणाची सावली ।।

तवा हसुन माय म्हनी , थोडा थोडा दोघावानी ।। ३।।

                           बाप नारळी खोबरं,...... 

  


Comments

Popular posts from this blog

HOME