७मराठी १८. वदनी कवळ घेता...

१८. वदनी कवळ घेता...




















अन्नाची नासाडी थांबवा- निबंध, 

Essay On Wastage of Food .

या लेखातील महत्वाचे मुद्दे

1.1. भारत आणि जगभरातील अन्नाची नासाडी

1.2. विवाहसोहळ्यांमध्ये अन्नाची नासाडी

1.3 अन्न वाया जाण्याचा परिणाम

1.4. अन्न आणि त्याचा योग्य वापर होण्यासाठी योग्य दृष्टीकोन

1.5. अन्नाचा अपव्यय टाळण्याचे मार्ग

1.6. निष्कर्ष

अन्नाची नासाडी  Wastage of Food .

1.1. भारत आणि जगभरातील अन्नाची नासाडी

वर्ल्ड फूड ऑर्गनायझेशनच्या अहवालानुसार प्रत्येक सातवा व्यक्ती हा पूर्ण अन्नाविना उपाशी आहे. त्यावेळी बऱ्याच व्यक्तींनी  अन्न वापरासंबंधी काळजी घेतली पाहिजे . 

स्वित्झर्लंडच्या जीडीपीशी तुलना करता जागतिक अर्थव्यवस्थेचे ७५० अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त नुकसान झाले आहे. जगाच्या असंख्य लोकांच्या खालावत्या आरोग्यासाठी अन्नाची नासाडी जबाबदार आहे.

जागतिक भूक निर्देशांकात भारत ६७ व्या स्थानावर आहे. देशात दरवर्षी २११ दशलक्ष टन धान्य तयार होते, परंतु दर चौथा भारतीय हा पूर्ण अन्नाविना उपाशी आहे.

भारतीय संस्कृतीत अन्नाला सन्मानाचे स्थान आहे, म्हणूनच अन्न वाया घालवणे किंवा फेकून देणे हे पाप मानले जाते. तथापि, अनेक ठिकाणी जसे कि काही कार्यक्रम, सोहळे यात अन्नाच्या नासाडीकडे दुर्लक्ष केले आहे.



1.2. विवाहसोहळ्यांमध्ये अन्नाची नासाडी


आपण मुख्यतः आपल्या विवाहसोहळ्यांमध्ये किंवा उत्सवांमध्ये होणाऱ्या अन्नाची नासाडी लक्षात ठेवतो. अशा कार्यक्रमात खूप अन्न कचऱ्यामध्ये जाते.अशावेळी अशा पडलेल्या अन्नातून येणाऱ्या दुर्गंधीमुळे तेथील रहिवाशांसाठी अडचणी निर्माण करतात. त्यांना आरोग्याच्या समस्या निर्माण होतात.



1.3 अन्न वाया जाण्याचा परिणाम

 जेव्हा आपल्या ताटात अन्न शिल्लक राहते तेव्हा  केवळ अन्न वाया जाते असे नाही, तर तयार करणाऱ्या व्यक्तीचे कष्ट , त्यासाठी लागलेले इंधन (लाकूड , गॅस इ.) वाया जाते. तयार केलेल्या अन्नाला वाहतूक करावी लागते . तसेच विक्री , धान्य निवड , साठवण, उत्पादन करताना केलेला खर्च या सर्व बाबी अन्नाच्या नासाडी बरोबर वाया जातात. 

 आमच्या ग्रामीण भागात एक म्हण आहे , 'खाऊन माजा, टाकून माजू नका.' म्हणजे कोणत्याही परिस्थितीत अन्न वाया घालवू नका. 

सध्याच्या काळात, अन्न वाया घालवणे अनेक अडचणींना निमंत्रण देते. घरामध्ये आणि परिसरात नकारात्मक परिणाम होतो. अन्न वाया घालवून पोकळ प्रतिष्ठा  दाखवू नका . अन्नाच्या नासाडीमुळे दान करणाऱ्या व्यक्तीची प्रतिष्ठा कमी होते . घर आणि परिसर प्रमाणेच जैवविविधतेवर अन्न, पाण्याचा नाश, भूमीवर आणि वातावरणावर  देखील नकारात्मक परिणाम होतो.



1.4. अन्न आणि त्याचा योग्य वापर होण्यासाठी योग्य दृष्टीकोन



अन्न आणि त्याचा योग्य वापर होण्यासाठी प्रत्येक व्यक्तीचा योग्य दृष्टीकोन निर्माण झाला पाहिजे ...

भाज्या आणि सेंद्रिय उत्पादने घरी ठेवण्यासाठी नीट ठेवा. उर्वरित अन्न ठेवण्यासाठी योग्य भांडी वापरा. नियमितपणे ओलसरपणामुळे खराब झालेल्या धान्यांची तपासणी करणे सुरू ठेवा. योग्य वेळी त्यांना उन्हात वाळवा.



1.5. अन्नाचा अपव्यय टाळण्याचे मार्ग


अन्न नीट पॅक करून ठेवा. पॅकिंग केलेले अन्न शेवटची तारीख संपून जायच्या आधी अन्नाचे सेवन करा .ताटातील सर्व अन्न संपवा. आपल्या ताटात असेलेले सर्व अन्न आपण संपवले पाहिजे. बरेच लोक ताटात तसेच अन्न शिल्लक ठेवतात. अशामुळे अन्नाची खूप नासाडी होते. आपल्याला आवश्यक तेवढेच अन्न घ्या.

   आपण जेवढे खाणार आहे तेवढेच जेवण घ्या. आणि जेवण शिल्लक असेल तर कोणा गरजूला ते देऊन टाका. असे राहिलेले अन्न कचऱ्यात टाकण्यापेक्षा कोणाला दिलेले कधीही चांगलेच आहे. स्त्रिया अन्न वाया न घालविण्याकरिता खूप काही करू शकतात. विशेषत: मुलांना प्लेटमध्ये जेवण देताना थोडे थोडे दिल्यास मोठ्या प्रमाणात अन्नाची बचत करता येऊ शकते. ही सवय प्रत्येक आईवडिलांनी आपल्या मुलाला लावली पाहिजे . 

आपल्याला आवश्यक तेवढे अन्न शिजवा : आपल्या कुटुंबाला लागते तेवढेच अन्न शिजवा. यामुळे रोज शिळे अन्न टाकावे लागणार नाही.

पॅकिंग केलेले अन्न कधीपर्यंत खाऊ शकतो ते बघा : 

काही पॅकिंग केलेल्या वस्तूच्या तारखा लक्षात ठेवा. शेवटची तारीख संपून जायच्या आधी अन्नाचे सेवन करा.




1.6. निष्कर्ष

आपल्या देशात मोठ्या  प्रमाणात अन्न वाया जात आहे हे अत्यंत धक्कादायक आहे. हे खूप निष्काळजीपणा आणि अन्नाचे महत्व असल्याची भावना नसणे  हे आहे. आज मोठ्या शहरात अन्न नासाडीचे प्रमाण अधिक आहे , तथापि डोंगराळ, आदिवासी आणि झोपडपट्टीमध्ये कुपोषण होत आहे . अन्नाची नासाडी आणि कुपोषण याचा ताळमेळ बसला पाहिजे . आपण सर्व नागरिकांनी अन्न वाया घालवू नका अशी प्रतिज्ञा घेतली पाहिजे. समाजातील प्रत्येक व्यक्तीचा निर्धार आणि योग्यवेळी सहकार्य या द्वारे अन्नाची नासाडी थांबवणे  शक्य होईल. 

भारतीय संस्कृतीत अन्नाला सन्मानाचे स्थान आहे, म्हणूनच अन्न वाया घालवणे किंवा फेकून देणे हे पाप मानले जाते. तथापि, अनेक ठिकाणी  आपल्यालाअन्नाची किती गरज आहे , आणि आपण किती अन्न घेतले पाहिजे यांचा अंदाज नसणे ; हेच कारण आहे की नियमितपणे मोठ्या प्रमाणात अन्नाची नासाडी होते. बारशे, मुंज, पार्टी , लग्न   यांसारख्या प्रसंगी हे अधिक प्रमाणात आढळते.

अन्न शिल्लक राहण्याचे टाळण्यासाठी किराणामालाची यादी करा आणि घरी करायच्या स्वयंपाकाचा योग्य अंदाज घ्या. आणि अर्थातच आपले ताट स्वच्छ करायचे विसरू नका!

घरी राहिलेले जास्तीचे अन्न कोणाला देता येत नसेल तर ते आपण विविध प्रकारे वापरू शकतो. राहिलेल्या अन्नात काही घटकपदार्थ, मसाले मिसळून त्यांचा एखादा वेगळा पदार्थ बनवता येऊ शकतो.

शिल्लक राहिलेला पदार्थ योग्य पद्धतीने, योग्य तापमानात फ्रीजमध्ये ठेवल्यास तो चांगला व अधिक काळ टिकू शकतो. खराब व्हायला लागलेल्या अन्नाचे कंपोस्ट खत करता येऊ शकते.

लग्न समारंभांसारख्या सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये, हॉस्टेल्स आणि हॉटेल्समध्ये अन्नाची सर्वाधिक नासाडी होते. हे टाळण्यासाठी काही सेवाभावी संस्था सार्वजनिक कार्यक्रमांनंतर उरलेले अन्न गोळा करून ते गरजूंपर्यंत पोहोचवतात.

यासाठी शासनानेही पुढाकार घ्यायला हवा, गरजूंना असे अन्न माफक दरात अथवा मोफत मिळेल अशी व्यवस्था करायला हवी. सर्वच पातळ्यांवर लोकसहभाग वाढवायला हवा.

अन्नाची नासाडी टाळण्यासाठी आपण लहान-सहान गोष्टींची अगदी घरापासूनही सुरुवात करू शकतो. सर्वात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे अन्न वाया न घालवणे. यासाठी एकदाच भरपूर वाढून घेण्यापेक्षा लागेल तसे थोडे थोडे वाढून घेण्याची सवय सर्वांनीच लावून घ्यायला हवी. या सवयीमुळे अन्न वाया जाण्याचे टळते.

अन्नाची नासाडी वेगवेगळ्या पातळ्यांवर होते - अगदी उत्पादनापासून अन्नावरील प्रक्रिया, अन्नाचे पॅकेजिंग, अन्नाची वाहतूक आणि अन्नाचे सेवन इथपर्यंत. भारतामध्ये एकूण उत्पादन झालेल्या अन्नापैकी जवळपास 22% अन्न वाया जाते.




Comments

Popular posts from this blog

HOME