७ मराठी ९.नात्याबाहेरचं नातं
९. नात्याबाहेरचं नातं - सुभाष किन्होळकर
पाठाचा परिचय :- भर थंडीत कडुनिंबाच्या झाडाखाली कुडकुडणारे कुत्र्याचे एक पिल्लू लेखकाला दिसले. त्यांनी ते गोंडस पिल्लू घरी आणले. त्याला मायेने वाढवले. त्याचे नाव 'डांग्या' ठेवले.
या पाठात डांग्याचा रुबाब, त्याची ऐट, त्याची स्वामिभक्ती व त्याने लावलेला लळा यांचे सुंदर शब्दचित्र लेखकांनी रेखाटले आहे.
मूल्य / शिकवण / संदेश :- या पाठातून भूतदयेची शिकवण दिली आहे. मुक्या प्राण्यांवर प्रेम करावे, असा संदेश दिला आहे.
■ शब्दार्थ ■
नाते - - प्रेमळ संबंध.
हळवा- कोमल.
झंकार - नाद.
लहरी - लाटा.
पुनव - पौर्णिमा.
अंतरंग - मन.
लख्ख - तेजस्वी.
झगमगाट - लखलखाट.
सामसूम- शांत.
वेल्हाळ - लडिवाळ, आनंदाने आंदोलणारे (मन).
चाहूल - अंदाज, मागोवा.
वृद्धी – वाढ.
प्रसन्न - उल्हसित.
भावस्पंदने – भावनांचे तरंग -
'चित्तवेधक - मनाला आकर्षित करणारे.
वळवळ • हालचाल.
उत्सुकता - कुतूहल.
असह्य - सहन न होणारी.
सुमार (इथे अर्थ ) - वेळ.
तीक्ष्ण - टोकदार, धारदार (नजर),
खिळणे - एकाग्र होणे.
नखशिखान्त - डोक्याच्या केसांपासून पायाच्या नखांपर्यंत. कण्हणे- वेदनेने कळवळणे.
विराम थांबलेले.
कणव - दया, करुणा.
बधिर – सुन्न.
स्नेहभावना - प्रेमाचा भाव.
गोंडस - गोजिरे, सुंदर.
बावरणे - बावचळणे, गांगरणे.
फटकारले - रागावले.
रुखरुख - हळहळ .
लळा - प्रेम, जिव्हाळा.
हळदुल्या - हळदीच्या रंगाचा .
दांडग्या - दणकट, मोठ्या, कणखर,
अनुरूप - रूपाला साजेसे, चपखल.
झेप - उडी.
तरणंबांड - तारुण्याने मुसणारे,
भारदस्त - दमदार.
शीळ - शिट्टी.
रोखाने - दिशेने.
सोज्ज्वळ - सात्त्विक.
कीर्ती - प्रसिद्धी.
अट्टल - बदमाश, सराईत, अव्वल.
कर्तबगारी - कामगिरी.
उभार डोळे - उघडे, जागणारे डोळे.
तेवत - पाजळत, उजळत, प्रकाशित.
उपवास - उपाशी राहणे.
अगडबंब - अवाढव्य प्रचंड.
वाखाणण्याजोगी - प्रशंसा, स्तुती करावी अशी,
विश्वस्त - विश्वासू .
गोत्याचा - गोत्राचा.
अनवधान - लक्ष नसणे, चुकून झालेले.
अविस्मरणीय - न विसरता - येण्यासारखे.
■ टिपा ■
(१) भेंड्या - गाणी म्हणण्याचा एक खेळ, अंताक्षरी.
(२) गवऱ्या - शेणाच्या थापलेल्या गोल चकत्या.
(३) कडूलिंब - लिंबाच्या झाडाचा एक प्रकार.
(४) बुंधा - झाडाचे जमिनीलगतचे खोड.
(५) डोह - पाण्याचा खोलवर असलेला साठा.
(६) फुलोर - फुले यायच्या आधी परागांचा गुच्छ.
(७) नामकरण सोहळा - नाव ठेवण्याचा समारंभ.बारसे.
(८) अष्टपैलू व्यक्तिमत्व - एकाच वेळी अनेक गोष्टींत पारंगत असलेला माणूस.
■ वाक्प्रचार व त्यांचे अर्थ ■
(१) आगेकूच करणे- पुढे जाणे.
(२) रंग चढणे - आनंदाचे अत्युच्च शिखर गाठणे.
(३) आश्चर्याचा धक्का बसणे - अचानक चकित होणे.
(४) सुन्न होणे - बधिर होणे.
(५) भास होणे - भ्रम होणे.
(६) नजर खिळणे - एका जागेवर लक्ष लागणे.
(७) नखशिखान्त न्याहाळणे - आपादमस्तक नीट पाहणे.
(6) भंग करणे - मध्येच खंडित करणे.
(९) कणव निर्माण होणे - दया येणे.
(१०) हायसे वाटणे- जिवाला शांती मिळणे बरे वाटणे.
(१९) चेहरा खुलणे - चेहऱ्यावर आनंद दिसणे.
(१२) चोरट्या नजरेने पाहणे - गुपचूप नजर चुकवून पाहणे.
(१३) आपुलकी निर्माण होणे - प्रेम वाटणे.
(१४) मनात घिरट्या घालणे - (एखादा विचार) मनात फिरत राहणे.
(१५) मुक्या शब्दांचा मार देणे - न बोलता समज देणे. (१६) उत्साह द्विगुणित करणे - उत्साह वाढवणे.
(१७) भुरळ घालणे - भूल पडणे, मोह होणे. -
(१८) दातखिळी बसणे- घाबरून बोलता न येणे,
(१९) मनात घर करणे - मनात रुतून बसणे.
(२०) घाबरगुंडी उडणे - घाबरून जाणे.
(२१) काळजात धस्स होणे - घाबरल्यामुळे धक्का बसणे. (२२) छाप पाडणे - ठसा उमटवणे, प्रभाव पाडणे.
(२३) शिरकाव करणे - आत घुसणे.
(२४) चाहूल घेणे - अंदाज घेणे.
(२५) बोबडी वळणे - घाबरल्यामुळे शब्द फुटणे.
■ संकलित मूल्यमापन ■
१. प्रश्नोत्तरे
प्रश्न १. पुढील विधानांमागील कारणे लिहा :
(१) लेखकांनी कुत्र्याच्या पिल्लाला थेट घरी आणले.
उत्तर : थंडीने कुडकुडणाऱ्या व कण्हत असलेल्या कुत्र्याच्या पिल्लाला कायमचा आधार मिळावा, म्हणून
लेखकांनी कुत्र्याच्या पिल्लाला थेट घरी आणले.
(२) लेखकांनी कुत्र्याच्या पिल्लाचे नाव 'डांग्या' ठेवले. उत्तर : कुत्र्याच्या पिल्लाचे शरीर दांडगे होते, म्हणून लेखकांनी त्याच्या शरीराला साजेसे त्याचे नाव 'डांग्या' ठेवले.
(३) लेखक डांग्याला 'पक्क्या हिमतीचा राखण्या' म्हणतात.
उत्तर : डांग्याची शेतामधली रखवाली अशी होती की, अट्टल चोरांचीही दातखिळी बसायची. डांग्याच्या नुसत्या कर्तबगारीने भल्याभल्यांची बोबडी वळायची. म्हणून लेखक डांग्याला 'पक्क्या हिमतीचा राखण्या' म्हणतात.
• प्रश्न २. पुढील उत्तरे पूर्ण करा:
(अ) थंडीच्या झंकाराची वैशिष्ट्ये लिहा:
(१) हळवा. (२) सर्वांगाला वेढून टाकणारा. (३) रान, पानाफुलांना आपल्या इशाऱ्यावर नाचवणारा. (४) नदीच्या झुळझुळणाऱ्या पाण्याला मंद लहरींवर खेळवणारा.
(ब)कुत्र्याच्या पिल्लाला थंडी असह्य झाली हे वर्णन करणारी पाठातील वाक्ये शोधा व लिहा.
(१) कुत्र्याचे पिल्लू अंगाचं गाठोडं करून पडलेलं.
(२) कुत्र्याचे पिल्लू समोरच्या दोन्ही पायांत मान खुपसलेली.
(३) हुडहुडी रोखण्याचा त्याचा चाललेला प्रयत्न आम्हांला सुन्न करून गेला.
(४) थंडीच्या ओलसरपणानं त्याच्या केसांवर जणू कुणी पाणी शिंपडलंय की काय असा भास झालेला.
(५) इवल्याशा जिवाला तशी थंडी असह्यच,
(क) पुढील बाबतीत डांग्याचे वर्णन करा
(१) दिसणे :- वाढत्या वयाबरोबर डांग्याचा चेहरा अधिक प्रसन्न झाला होता. डोळ्यांखालचे पिवळसर पट्टे व मागच्या पायाच्या बोटांवर असलेले लालसोनेरी पट्टे सगळ्यांचे लक्ष
आकर्षित करणारे होते.
(२) शरीरयष्टी :- डांग्याची शरीरयष्टी अधिक दणकट, त्याचे तरणेबांड शरीर सगळ्यांच्या नजरेला भुरळ घालणारे होते.
(३) चाल - डांग्याची दुडुदुडु चाल सर्वांना भावणारी होती.
(४) नजर - त्याचे तेजस्वी डोळे बोलके होते.
● प्रश्न ३. पुढील घटनांचे काय परिणाम झाले ते लिहा :
घटना (अ) लेखकांनी पिल्लाच्या अंगावर मफलर टाकला.
परिणाम:- पिल्लाला ऊब मिळाली व त्याचा चेहरा खुलला.
घटना (ब) कुत्र्याचं पिल्लू रात्रभर लेखकाच्या अंथरुणापाशी झोपलं.
परिणाम:-पिल्लाला थंडीपासून संरक्षण मिळाले.
घटना (क) झाडांवरील माकडांची घाबरगुंडी उडायची.
परिणाम:- डांग्याची भारदस्त छाती पाहून माकडांच्या काळजात धस्स व्हायचे.
घटना (ड) :- लेखकांनी दूरवरून घुमवलेली शीळ डांग्याच्या कानावर पडली.
परिणाम:-डांग्या मागच्या दोन्ही पायांवर उभे राहून लेखकाच्या येण्याची चाहूल घ्यायचा.
प्रश्न ५. योग्य जोड्या लावा :
(१) पिल्लाची धडपड पाहून - पावलं नकळत त्याच्याकडे खेचली गेली.
(२) रात्र आगेकूच करू लागली - थंडीची लाट वाढली.
(३) वाऱ्याने हलणारी डहाळी - मन आकर्षित करीत होती.
(४) इवल्याशा जिवाला - थंडी असह्य होत होती.
प्रश्न ६. पुढील उतारा वाचून कृती करा:
" पिल्लू दिसायला.....................बहरून आला. "
(अ) शब्दजाल पूर्ण करा :
पिल्लाचे वर्णन :-
(१) कापसासारखे अंग (२) तेजस्वी डोळे (३) मऊ कान (४) लांबट नाक.
(ब) उत्तर पूर्ण करा:
(१) पिल्लाच्या चेहऱ्यावर झळकले ते - मित्र मिळाल्याचे समाधान
(२) पिल्लाला मिळालेली ऊब- प्रेमाची ऊब
(३)दोघांच्याही स्वप्नात बहरून आलेला- चिंब ओल्या स्वप्नांचा फुलोर
(४) पिल्लाला यामुळे संरक्षण मिळाले- ब्लॅकेटच्या उबेमुळे.
■ मुक्तोत्तरी प्रश्न ■
[तुम्ही काय कराल?]
(१) एका कुत्र्याच्या पिल्लाच्या पायाला इजा झाली आहे, अशा प्रसंगी तुम्ही काय कराल ?
नमुना उत्तर :- त्याला उचलून घेईन. रुमालात गुंडाळून ऊब देईन. त्याच्या पाठीवरून हात फिरवीन, त्याला घरी घेऊन जाईन. जखम नीट पाहून त्यावर घरगुती औषधोपचार करीन. ठरावीक वेळाने दूध प्यायला देईन,ते बरे होईपर्यंत सर्वतोपरी पिल्लाची काळजी घेईन.
(२) तुमच्या घराच्या बाहेरील बाजूस चिमणी घरटे बांधत आहे.
नमुना उत्तर :- मी चिमणीचे घरटे तिला बांधू देईन. चिमणी घरटे कसे बांधते, याचे दररोज निरीक्षण करीन. तिला खायला दाणें व प्यायला पाणी देईन, घरट्यातील चिमणीच्या पिलांची काळजी घेईन. इतर धोक्यांपासून मी चिमणीच्या घरट्याचे रक्षण करीन.
■■■ भाषाभ्यास व व्याकरण ■■■
• प्रश्न १. पुढील शब्दांचे तुम्हांला समजलेले अर्थ लिहा
(१) हुडहुडी - थंडीने अंग थरथर कापणे, कापरे भरणे.
(२) रुखरुख - मनात हळहळ वाटत राहणे.
(३) फुलोर - फुलाआधी येणारा परागांचा गुच्छ.
(४) अष्टपैलू व्यक्तिमत्त्व - अनेक गोष्टींत कुशल असणारी व्यक्ती.
(५) विश्वस्त - विश्वास राखणदार, एखादया संस्थेच्या मूळ संस्थापकांपैकी एक व्यक्ती.
(६) सोहळा - समारंभ, उत्सव.
• प्रश्न २.पुढील शब्दांचा सहसंबंध लावा (रंगछटा आणि नामे)
'अ' गट - शुभ्र, प्रसन्न, लालसोनेरी , निळसर, हळदुली.
'ब' गट - प्रकाश, किरणे , चांदणे,सकाळ,पट्टे
उत्तर:- (१) शुभ्र - चांदणे (२) प्रसन्न - सकाळ
(३) लालसोनेरी - पट्टे (४) निळसर - प्रकाश (५) हळदुली - किरणे
प्रश्न ३. पुढील प्रत्येक शब्दासाठी कंसात ठेवलेल्या शब्दांतून दोन-दोन विरुद्धार्थी शब्द शोधा व लिहा:-
( शेवट , विदेश, बडबड्या, ,गरम, परदेश, अवमान, बोलका , उष्ण ,अपमान अखेर )
(१) थंड X उष्ण, गरम.
(२) शांत x बोलका, बडबड्या.
(३) मान X अपमान, अवमान.
(४) स्वदेश X परदेश, विदेश.
(५) आरंभ X शेवट, अखेर.
प्रश्न ४. पुढे दिलेले वाक्प्रचार व त्यांचे अर्थ यांच्या योग्य जोड्या लावा :
'अ' गट
(१) कणव निर्माण होणे.
(२) काळजात धस्स होणे.
(३) उत्साह द्विगुणित होगे.
(४) भुरळ घालणे.
'ब' गट
(अ) दया निर्माण होणे.
(आ) उत्साह वाढणे.
(इ) आकर्षित करणे.
(ई) भीतीने धक्का बसणे.
उत्तर : (1)-अ, (2)- ई, (3)- आ, (4) -इ
• प्रश्न ५. पुढील शब्द अभ्यास आणि तुमच्या लेखनात त्यांचा वापर करा
(१) नखशिखान्त - पायाच्या नखांपासून डोक्यापर्यंत.
(२) आपादमस्तक - पायापासून डोक्यापर्यंत.
उत्तरे : (१) रुपा तिच्या लग्नात नखशिखान्त सजली होती.
(२) बऱ्याच वर्षांनी मी गावी गेलो, तेव्हा आजीने मला आपादमस्तक न्याहाळले.
प्रश्न ६. अनेकवचन लिहा
लहर - लहरी
लाट - लाटा
शेकोटी - शेकोट्या
किरण - किरणे
पिल्लू - पिल्ले
डोह - डोह
दोस्त- दोस्त
बुंधा - बुंधे
घिरटी - घिरट्या
• प्रश्न पुढील शब्दांचा 'क्रियाविशेषण अव्यये व शब्दयोगी अव्यये' असा दोन्ही प्रकारे उपयोग सांगा.
प्रत्येकी दोन वाक्ये लिहा.
( पुढे, मागे, बाहेर, खाली, जवळ, नंतर)
उत्तरे : क्रियाविशेषण अव्यये
(१) ती शाळा पुढे आहे.
(२) तू थोडा मागे जा.
(३) बाहेर पाऊस पडतो आहे.
(४) रस्ता खाली उतरत जातो.
(५) माझी शाळा जवळ आहे.
(६) तू नंतर भेट.
शब्दयोगी अव्यये
(१) शाळेपुढे मैदान आहे.
(२) घरामागे झाड आहे.
(३) अंगणाबाहेर जाऊ नको.
(४) पुस्तकाखाली वही आहे.
(५) झाडाजवळ विहीर आहे.
(६) मी दिवाळीनंतर येईन.
• प्रश्न ८. पुढील वाक्यातील शब्दयोगी अव्यये ओळखा व तो कोणत्या शब्दांशी संबंध जोडतात ते लिहा.
(१) मी परीक्षेनंतर पोहण्यास शिकणार आहे.
(२) तुझ्यादेखील हे लक्षात कसे आले नाही ?
(३) रस्त्यावरील विजेचे दिवे गेले होते.
(४) तुमच्याकडे देशाला देण्यासाठी वेळ आहे का?
उत्तरे:- अव्यये-संबंध
(१) नंतर- परीक्षा
(२) देखील-तुझ्या
(३) वरील -रस्ता
(४) (१) साठी - (१) देण्या
(२) कडे- (२) तुमच्या
• पुढील आकृतीतील मुद्द्यांनुसार लेखन करा
माझा आवडता प्राणी
(1) आवडण्याचे कारण (२) त्याच्याबरोबरचा (३) विविध प्राणी व त्यांचे आकार (४)आवडता प्राणी कोणता ?
(५) स्वभाव व अविस्मरणीय प्रसंग
उत्तर : वाघ, सिंह, हत्ती, कोल्हा, माकड, मांजर असे अनेकविध प्राणी आहेत, काही प्राणी जंगली आहेत, तर काही प्राणी पाळीव आहेत. पाळीव प्राण्यांपैकी कुत्रा हा माझा आवडता प्राणी आहे. कुत्रा हा प्राणी अत्यंत इमानी असतो. म्हणूनच मला तो खूप आवडतो. आमच्या घरातील कुत्र्याचे नाव 'टॉमी' आहे. त्याचे अंग पांढरेशुभ्र आहे. त्याच्या मानेभोवतीच्या केसांचा रंग दाट तपकिरी आहे. त्याच्या पायांचे पंजे काळेभोर आहेत. त्यामुळे आमचा टॉमी देखणा आहे.
टॉमी सकाळी दूध पितो. दुपारी तो मटण खातो. त्याला हाइक प्रिय आहे. टॉमी भारी चपळ आहे. आमचा
टॉमी स्वभावाने शांत आहे. पण तो तितकाच आहे. आमचा टॉमी घराची राखण करतो. मी खेळू लागलो की, तो माझ्याबरोबर खेळतो. दूर फेकलेला चेंडू तो आणून देतो.
संध्याकाळी मी फिरायला गेलो की, माझ्याबरोबर फिरायला येतो. टॉमी माझा मित्रच झाला आहे. एकदा आमच्या कॉलनीत रात्री चोर आले. टॉमीने भुंकून भुंकून त्यांना पळवून लावले. असा आमचा टॉमी शूर आहे. आमचा इमानदार टॉमी मला खूप आवडतो.
३. तोंडी परीक्षा
प्रश्न पुढील प्रश्नांची उत्तरे सांगा
(१) मुक्या प्राण्यांवर तुम्ही कशी दया दाखवाल?
(२) पाळीव प्राण्यांची निगा कशी राखावी?
आकारिक मूल्यमापन
१. अनुलेखन / श्रुतलेखन
• पाठातील एखादया परिच्छेदाचे अनुलेखन व श्रुतलेखन करा.
२. उपक्रम :
(१) आवडत्या प्राण्याचे/पक्ष्याचे चित्र काढा व रंगवा.
(२) वाहिन्यांवर प्राणिजीवनविषयक प्रसारित होणारे कार्यक्रम तुम्ही पाहता. तुम्हाल आवडणाऱ्या प्राणिजीवनविषयक कार्यक्रमांची यादी तयार करा.
Comments
Post a Comment