६मराठी,१७. दुखणं बोटभर

 १७. दुखणं बोटभर -डॉ. चित्रा सोहनी

(पाठ्यपुस्तक पान क्र. ६५)

💐पाठाचा परिचय 💐लेखिकेच्या बोटाला दुखापत झाली, नि त्या कशा हैराण झाल्या याचे मजेशीर वर्णन या पाठात केले आहे. विशेषत: बोट व हात या शारीरिक अवयवांचे वाक्प्रचार, म्हणी व शाब्दिक विनोद वापरून लेखिकेने पाठात धमाल उडवून दिली आहे.

💐शब्दार्थ 💐 दुखणं- आजार. मथितार्थ- सारांश, निष्कर्ष, महत्त्वाचा मुद्दा .क्षुल्लक - मामुली .घाव -आघात.

मर्मज्ञान - मूळ ज्ञान. वायफळ -फुकटच्या, निरर्थक. ठसठसणे-  ठणकणे. मानी- स्वाभिमानी .ताठलं - ताठ झाले. नाद- छंद. अलौकिक- विलक्षण, अजब. बाणेदार - शूर. मिठास- गोड .अंतःकरण -मन. शब्दश:- शब्दाप्रमाणे तंतोतंत. सुज्ञ विचार -  विवेक, चांगला विचार. अंमळ - थोडासा. कळ- ठणका. बाळबोध - बालिश. गिळंकृत - गिळणे. टाळलेल्या - दुर्लक्ष केलेल्या. बोळे - कागदाचे गोळे. त्वेष - जोर.


💐टिपा💐

(१) भावजय -  भावाची बायको वहिनी (२) चिंधी - जुन्या फाटक्या कपड्यांचा तुकडा.(३) बत्ता -मसाल्याच्या वस्तू कुटण्याचे साधन. (४) मराठी बाणा - मराठी मनाचे सत्त्व, मराठी माणसाचे वैशिष्ट्य. (५) प्लास्टर - मुरगळल्यावर बांधायची जाड मलमपट्टी.(६) कुबड्याधारी - काखेत काठी घेणारा लंगडा माणूस. (७) क्ष किरण - शरीराचा अंतर्भाग दाखवणारी यंत्रणा, एक्स-रे. (८)     स्ट्रँपिंग - रॅपिंग  जखम गुंडाळून ठेवणे. (९) 'प्रभाते करदर्शनम्'- श्लोकाचा भाग (अर्थ) सकाळी उठल्यावर  हात न्याहाळावा.

💐वाक्प्रचार व त्यांचे अर्थ 💐

(१) हैराण करणे - त्रास देणे.

 (२) घाव वर्मी बसणे - केंद्रस्थानी फटका बसणे. 

(३) बोट तोंडात घालणे-  आश्चर्य वाटणे. 

(४) हात कपाळाला लावणे - हताश होणे. 

(५) ताठा कमी करणे - अहंकार कमी करणे.

 (६) टम्म होणे - फुगणे.

(७) मस्का मारणे- खुशामत करणे.

 (८) शिरोधार्य मानणे-  अग्रक्रम देणे.

 (९) पोटात गोळा येणे-घाबरणे, धास्तावणे. 

(१०) पळ काढणे - पळून जाणे. 

(११) मन हलके होणे-  हायसे वाटणे, मनावरील ओझे उतरणे. (१२) भ्रमनिरास होणे - विश्वास उडणे.

(१३) अंतःकरण जड होणे-दुःख होणे. 

(१४) डावे उजवे मानणे - भेद करणे. 

(१५) डावा निघणे कमी - प्रतीचा ठरणे.

(१६) हात चोळत गप्प बसणे - नाइलाजाने चूप होणे. 

(१७) कळवळणे- वेदना होणे.

(१८) अवसान गोळा करणे- धीर गोळा करणे.

(१९) आलबेल असणे-ठाकठीक असणे.

(२०) फैर झाडणे -सरबत्ती सुरू होणे. 

(२१) बोट ठेवणे - दोष दाखवणे.

(२२) बट्ट्याबोळ होणे- नाश होणे, फसणे.

 (२३) बोटे मोडणे-  त्रागा करणे, दोष देणे.

(२४) प्रथा पडणे - रिवाज असणे, रीत लागू होणे.

(२५) टस की मस न होणे - काहीही फरक न पडणे,

💐म्हणी व त्यांचे अर्थ💐

(१) बुडत्याला काडीचा आधार-  एखादया संकटातून वाचण्याची अंधुकशी आशा निर्माण होणे. 

(२) मोडेन पण वाकणार नाही - लाचारीपेक्षा मरण पत्करणे, (३) हत्तीच्या पावलांनी येणे, मुंगीच्या पावलांनी जाणे - मोठी दुखापत होणे नि अगदी हळूहळू बरी होणे.


  📃📃📃    संकलित मूल्यमापन   📃📃📃


  📃  १. प्रश्नोत्तरे  📃

प्रश्न १. चार-पाच वाक्यांत उत्तरे लिहा :

🌐  (१) लेखिकेच्या बोटाला दुखापत कशी झाली? दुखापत झाल्यावर लेखिकेने काय केले? उत्तर :- एकदा कडक गूळ बत्त्याने ठेचताना बत्त्याचा एक घाव चुकून लेखिकेच्या उजव्या हाताच्या बोटावर पडला. लेखिकेला दुखापत झाली. घाव बसल्यावर वेदना होताच लेखिकेने ते बोट तोंडात घातले. नंतर ठसठसणाऱ्या बोटाला मलम लावले. ते गरम पाण्याने शेकले. बोट फुगल्यावर त्यावर तेलमालीश केले.

🌐  (२) ठसठसणाऱ्या बोटाचं वर्णन लेखिकेने कसे केले आहे ? उत्तर : लेखिकेने ठसठसणाच्या बोटावर मलम लावले, पण ते कामासाठी मुळीच वळले नाही. लेखिकेने दुर्लक्ष केल्याने बोटाला राग आला असणार, ते बोट मानी माणसासारखे ताठले. त्याचा ताठा कमी व्हावा, म्हणून गरम पाण्याने शेकले, तर त्याने मोडेन पण वाकणार नाही' हा मराठी बाणा दाखवला. ते रागाने हुप्प होऊन फुगून बसले. शेवटी टम्म झालेल्या बोटावर मालीश करूनसुद्धा ते टस से मस झाले नाही.अशा प्रकारे लेखिकेने ठसठसणाऱ्या बोटाचे वर्णन केले आहे.

🌐 (३) बोटाला लागल्यामुळे लेखिकेच्या कामावर काय परिणाम झाला ? उत्तर :- डॉक्टरांनी लेखिकेच्या दुखऱ्या बोटाला स्टॅपिंग करून हात गळ्यात अडकवला. त्यामुळे त्या अवस्थेत कामावर न जाता लेखिकेला रजा टाकून घरी बसावे लागले. उजवा हात जायबंदी झाल्यामुळे डाव्या हाताने विंचरणे, पकडणे, ढवळणे, शिवणे, लिहिणे ही कामे जमत नव्हती. अशा प्रकारे बोटाला लागल्यामुळे लेखिकेच्या कामांवर परिणाम झाला.


🏵️🏵️

• प्रश्न २. का ते लिहा :🏵️🏵️

🏵️ (१) लेखिकेला कपाळाला हात लावायची वेळ आली. उत्तर : दुखऱ्या बोटावर तीन महिने झालेला खर्च, गेलेला वेळ व वायफळ चर्चा यांमुळे लेखिकेला कपाळाला हात लावायची वेळ आली.

🏵️ (२) लेखिका डॉक्टरांकडे जाण्यास तयार झाली.

 उत्तर : लेखिकेने दुखऱ्या बोटावर अनेक घरगुती इलाज केले, पण बोट बरे होईना. शेवटी लेखिकेच्या भाच्याने 'हा नाद सोड, डॉक्टरांचा फोन जोड' असा उपदेश केल्यामुळे लेखिका डॉक्टरांकडे जायला तयार झाली.

 🏵️ (३) दवाखान्यात गेल्यावर लेखिकेच्या पोटात गोळा आला. उत्तर : लेखिकेने दवाखान्यात कुणाचा पाय प्लास्टरमध्ये, कुणी कुबड्याधारी, कुणाचे हात गळ्यात हे भयानक दृश्य पाहिल्यामुळे लेखिकेच्या पोटात गोळा आला. 

🏵️   (४) दवाखान्यातून लेखिका जड अंतःकरणाने घरी परतली. उत्तर : डॉक्टरने लेखिकेच्या दुखऱ्या बोटावर स्टपिंग केले. त्या प्रकारात आजूबाजूची बोटे ताणून बांधून हात गळ्यात अडकवला. त्यामुळे जड झालेल्या हाताने व खर्च झाल्याने पर्स हलकी झाल्यामुळे लेखिका दवाखान्यातून जड अंतःकरणाने घरी परतली.

🏵️  (५) लेखिकेला आता बोटाचे महत्त्व समजले आहे. उत्तर : बोट जायबंदी झाल्यामुळे लेखिका कुणाच्या नावाने बोटे मोडू शकत नाही. कितीही राग आला तरी घट्ट मूठ वळवू शकत नाही. लेखिकेला 'प्रभाते करदर्शनम्' करण्याची प्रथा का पडली असावी, हे समजून चुकल्यामुळे आता बोटाचे महत्त्व समजले आहे.

🌅🌅🌅🌅🌅🌅

प्रश्न ३. पाठामध्ये बोटाला दुखापत होण्यापासून बोट बरे होईपर्यंत आलेल्या घटना क्रमवार लिहा.

 उत्तर : (१) बत्त्याचा घाव बोटावर वर्मी बसला. 

(२) वेदना सहन न होऊन बोट तोंडात घातले. 

(३) इतरांचे टोमणे व वायफळ चर्चा. 

(४) ठसठसणे कमी व्हावे म्हणून मलम लावले.

 (५) गरम पाण्याने शेकले.

(६) तेलमालीश केले.

 (७) भाच्याच्या उपदेशाने डॉक्टरकडे गेल्या. 

(८) डॉक्टरने स्ट्रैपिंग करून हात गळ्यात अडकवला.

 (९) डाव्या हाताने काम करता येईना.

(१०) स्ट्रैपिंग निघाल्यावरही गोळ्या घेणे सुरूच.

(११) बोटांचे व्यायाम सुरू.

(१२) कामावर हजर.

🌅🌅🌅🌅🌅🌅🌅🌅

मुक्तोत्तरी प्रश्न

(१) तुमच्या वर्गमित्राला दुखापत झाली, तर तुम्ही काय कराल ? 

उत्तर : (१) प्रथम शाळेतला 'फर्स्ट एड बॉक्स मागवून तात्पुरता इलाज करीन. (२) जखम धुवून, मलम लावून, बॅण्डेज करीन. (३) त्याच्या मनाला धीर देईन. (४) सहकार्य करून त्याला मित्रांच्या साहाय्याने डॉक्टरकडे नेईन. (५) शिक्षकांना व पालकांना कळवीन.

(२) तुम्हांला ठेच लागून जखम झाली तर... काय कराल, ते लिहा. उत्तर : रक्त आले असेल, तर रुमालाने घट्ट बांधीन. 


भाषाभ्यास व व्याकरण

प्रश्न १. पुढील शब्दांचे पाठात आलेले समानार्थी शब्द लिहा :

(१)  वहिनी   (२)ललाट  (३)  नवल (४)कथा   (५) त्रास (६)  तोरा  (७)  आघात   (८)   सकाळ   (९)  हात

  उत्तर:-  (१) भावजय  (२)   कपाळ   (३)  आश्चर्य  (४)    कहाणी (५)  हैराण  (६)  ताठा (७)  घाव (८)   प्रभात   (९) कर

  प्रश्न २. पुढील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा :

गरम  x गार 

घट्ट  x सैल

उजवा x डावा

दुर्लक्ष x लक्ष

प्रश्न ३. वाक्यांत उपयोग करा : (१) वायफळ चर्चा : कमिटीचे लोक मुद्दा सोडून वायफळ चर्चा करीत बसले.

(२) ठसठसणे: काल मला ठेच लागली; पण अंगठा अजून ठसठसतो आहे. (३) बाळबोध : सुहासचे अक्षर अगदी बाळबोध आहे.(४) जड अंतःकरण : आईवडिलांनी जड अंतःकरणाने निलूला सासरी धाडले.(५) बट्ट्याबोळ : सततच्या तुफान पावसामुळे शेतातल्या रोपांचा बट्ट्याबोळ झाला. (६) हत्तीच्या पावलांनी येणे : सुनंदाचा अंगातला ताप हत्तीच्या पावलांनी आला. (७) मुंगीच्या पावलांनी जाणे -  राजूचा आजार मुंगीच्या पावलांनी गेला.

(८) जायबंदी: कारगीलच्या लढाईत अनेक सैनिक जायबंदी झाले.

 प्रश्न ४. हा नाद सोड, डॉक्टरांचा फोन जोड' यासारखे यमक जुळवून पुढील वाक्ये लिहा :

(१) त्याचा खिसा गरम, महिनाअखेरी झाला नरम. (२) मोडेन पण वाकणार नाही, ऐट कधी झाकणार नाही.

(३) बोटभर दुखणं, हातभर कण्हणं. (४) मनावरचा उतरला ताण, नाही होणार हैराण. • 

प्रश्न ५. ' हाडबिड' यासारखे अवयवांवर आधारित जोडशब्द लिहा. उत्तर : (१) हातपाय (२) पाठपोट (३) केसबिस (४) डोळेबिळे. 

प्रश्न ६. गप्प, हुप्प, टम्म यांसारखी जोडाक्षरे लिहा.

उत्तर : नक्की , गप्प ,अख्खी , ढिम्म ,गच्च , गट्टी, किल्ला

, चिट्ठी , व्वा ,ठिय्या ,इश्श, आण्णा, गुड्डी. 


प्रश्न ७. पुढे दिल्याप्रमाणे शब्दांचे शेवटचे अक्षर सारखे  असणारे  चार चार शब्द लिहा :

उदा. तोळा   - गोपाळा,माळा, ढोकळा , गोळा

उत्तर:- (१) मात्र:-  पत्र ,मित्र ,  पात्र ,  सत्र 

(२) बत्ता :-  पत्ता , भत्ता , बत्ता , लत्ता ,सत्ता

(३) पळ :-फळ , कळ , पळ,मळ ,छळ .

(४) गर्दी:- सर्दी , दर्दी वर्दी, जर्दी

(५) साडी :- माडी , खाडी , नाडी,  काडी

(६) सोळा :- भोपळा , घोटाळा , मोकळा, वाळा


 प्रश्न ८. 'बोट' याप्रमाणे 'हात' व 'पोट' यांवर आधारित वाक्प्रचार व म्हणी लिहा.

उत्तरे

(१) बोट :- 

तोंडात बोट घालणे.

बोटे मोडणे,

बोट ठेवणे.

बोटाएवढा असणे.

 (२) हात:- 

हात कपाळाला लावणे.

हातावर तुरी देणे.

हात देणे

हात दाखवणे.

(३) पोट:- 

पोटात गोळा येणे..

पोटात घेणे.

पोटात शिरणे

पोटशूळ उठणे.


• प्रश्न ९. पाठातील बोट या शब्दासाठी आलेली विशेषणे  लिहा :

उत्तर:- टम्म  , एकच , ठसठसणारे , उजवे


• प्रश्न  १०. हत्तीच्या पावलांनी येणे, मुंगीच्या पावलांनी जाणे यांसारख्या म्हणी शोधा.

उत्तर : (१) आग रामेश्वरी, बंब सोमेश्वरी. (२) आगीतून आला, फुफाट्यात पडला. (३) इकडे आड तिकडे विहीर,

प्रश्न ११. पुढील क्रियापदे सकर्मक की अकर्मक ते ओळखा व  लिहा :

(१) आई भाकरी करते. (२) गणेश रस्त्यात पडला. (३) उदया दिवाळी आहे. (४) अनुराधा पत्र लिहिते. (५) सुरेखाचे डोके दुखते. (६) गाई झाडाखाली बसल्या.

उत्तर (१)सकर्मक (२)अकर्मक  (३)  अकर्मक (४)सकर्मक  (५) सकर्मक (६) अकर्मक

संयुक्त क्रियापद

•पुढील वाक्ये वाचा व अधोरेखित / ठळक शब्दांचे निरीक्षण करा :

(१) क्रीडांगणावर मुले खेळू लागली. (२) मीना पुस्तक वाचत आहे. (३) सरिताने सर्व अभ्यास करून आणला.


वरील वाक्यांमध्ये एकाच वाक्यात दोन क्रिया दिसतात. त्यांतील एक क्रिया वगळली तर वाक्य पूर्ण होत नाही. वाक्याचा अर्थ पूर्ण कळत नाही. इतकेच नाही तर काळही कळत नाही. म्हणून वाक्यांमध्ये क्रिया कळण्यासाठी दोन क्रियादर्शक शब्द वापरावे लागतात, म्हणजेच जोड क्रियापद वापरावे लागते.अशी जोड क्रियापदे म्हणजे संयुक्त क्रियापदे' होय. वाक्यातील क्रिया दाखवणाऱ्या क्रियापदाच्या मूळ रूपापासून तयार झालेले 'खेळू' हे

धातुसाधित (कृदन्त) आहे. तर 'खेळ' ही मूळ क्रिया किंवा धातू आहे.


अ. क्र.मूळ धातू  धातुसाधित  संयुक्त क्रियापद

(१)         खेळ       खेळू             खेळू लागला.

(२) वाच     वाचू         वाचू लागला.

(३)कर   करून     करून आणला.


२. लेखन विभाग


•• दुखापत झालेले बोट तुमच्याशी बोलते आहे अशी कल्पना करून दहा-बारा ओळी लिहा. उत्तर: मुला, तुला खूप दुखतेय का? ठसठसतंय ना खूप ! हो, मी तुझं दुखापत झालेलं बोटच बोलते आहे. दार लावताना तू किती घाईने आपटलंस. त्यामुळे मी फटीत चेमटलो, किती निष्काळजीपणा तुझा ! बरं. आता ते जाऊ दे. तु आता मला बर्फाने  शेक दे. त्यावर मलम लाव, नि बॅण्डेजने मला बांध. थोडी उसठस कमी होईल. पण हो ! संध्याकाळी डॉक्टरकडे जा. त्यांना दाखव ते औषध देतील. माझ्यावर मलमपट्टी करतील. गोळ्या नियमित घे. बघ, मी लवकर बरे होईन, मग याच बोटांनी तू वहीत लिही !!

३. तोंडी परीक्षा

प्रश्न पुढील प्रश्नांची तोंडी उत्तरे सांगा :

(१) पाठ्यपुस्तक पान नं. ६५ पहा आणि 

या मुलाची अवस्था अशी का झाली असेल ? विचार करा. या मुलाची अशी अवस्था होण्यामागची कारणे सांगा. चर्चा करा.

(२) तुमच्या हाताला जखम झाली तर रोजची कामे तुम्ही कशी कराल ?

आकारिक मूल्यमापन

१. प्रकट वाचन:

• हात व हस्त हे एकाच अर्थाचे शब्द आहेत. पुढील शब्दांत हात व हस्त लपलेले आहेत. ते शब्द वाचा व त्यांचे अर्थ समजून घ्या :  हातोडा, हातकंकण, हातकडी, हस्तक्षेप, हस्तकला, हातमोजे, हस्तरेषा, हस्ताक्षर, हातखंडा हस्तलिखित, हस्तांदोलन, हस्तगत

२. गटचर्चा:

• वर्गमित्राला वर्गात दुखापत झाली, त्वरित उपाय काय करावेत, चर्चा करा.

३. उपक्रम :

•● या पाठातील विनोदी वाक्ये शोधून लिहा.

📃📃📃

👇👇👇👇👇

🙏🙏🙏🙏

🔴🔴🔴🔴🔴️

🏵️🏵️🏵️🏵️🏵

🌅🌅🌅🌅

🌐🌐🌐

✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻

💐💐💐💐

🌳🌳🌳🌳

🐠🐠🐠🐠🐠

💥💥💥💥💥

🌻🌻🌻


Comments

Popular posts from this blog

HOME