६मराठी १६-सफर मेट्रोची

 १६. सफर मेट्रोची

-क्रांती गोडबोले-पाटील



📃📃  (पाठ्यपुस्तक पान ६१) 📃📃

👇👇   • पाठाचा परिचय 👇👇:-    मुंबईत मेट्रो ट्रेन चालवणाऱ्या पहिल्या महिला सारथी (पायलट) रुपाली चव्हाण या आहेत. त्यांच्याशी साधलेल्या संवादातून आपल्याला मेट्रोविषयी काही  माहिती मिळते.


पाठाचा व्हिडीओ इथे पहा 

🔴🔴  शब्दार्थ   🔴🔴  : अजब - आश्चर्यकारक , चमत्कारिक.झडपा - झरोके. आधुनिक -  नवीन. अविस्मरणीय  -  विसरता न येणारे . सारथी- चालक.मानसिक - मनाची. प्रशिक्षण- विशिष्ट हेतू ठेऊन दिलेले  उपयोजित  शिक्षण.   आत्मविश्वास - आत्मिक बळ . मान्यवर -  प्रतिष्ठित मंडळी.

बिनधास्तपणे -  काळजी न  करता, बेलाशक.

साधारणतः - सामान्यपणे. यंत्रणा - व्यवस्था.

   🏵️🏵️  टिपा  🏵️🏵️

(१) मेट्रो ट्रेन - पुलावरून चालणारी आधुनिक रेल्वेगाडी (२) सिंधुदुर्ग- महाराष्ट्रातील (कोकण) एक जिल्हा.(३) अभियांत्रिकी महाविद्यालय  - इंजिनीअरिंग कॉलेज. (४) मीडिया - प्रसार माध्यमे, वर्तमानपत्रे व टी. व्ही. चॅनेल्स. (५) वर्सोवा-मुंबईतले एक उपनगर,

(६) घाटकोपर - मुंबईतील मध्य रेल्वेवरील एक स्टेशन (उपनगर). (७) कारशेड - रेल्वे गाडीच्या (ट्रेन) विसाव्याचे ठिकाण. (८) सी. सी. टी. व्ही. - परिसरातील हालचाली छायांकित करणारे यंत्र (९) केबिन - वाहनचालकाची छोटी खोली.(१०) टोकन - मेट्रोचे तिकीट. (११) प्रीपेड कार्ड -  आधी  रक्कम भरून काढलेले कार्ड.  🌅🌅  वाक्प्रचार व त्यांचे अर्थ  🌅🌅(१) झुंबड उडणे खूप गर्दी होणे. (२) मान्यता मिळणे- सिद्ध होणे, परवाना मिळणे. (३) धाकधूक होणे- भीती वाटणे(४) बिघाड होणे -  नादुरुस्त होणे. (५) आवर्जून सांगणे - मुद्दामहून सांगणे. 








🌐🌐    संकलित मूल्यमापन  🌐🌐१.  प्रश्नोत्तरे

🌐प्रश्न १. तीन-चार वाक्यांत उत्तरे लिहा :

(१) मेट्रो पायलट होण्यासाठी कोणकोणत्या टप्प्यांतून जावे लागते? उत्तर : मेट्रो पायलट होण्यासाठी इंजिनीअर व्हावे लागते. नंतर निवड चाचणी परीक्षा दयावी लागते. यानंतर मानसिक व शारीरिक चाचणी घेतली जाते. नंतर मुलाखतीत निवड व्हावी लागते. त्यानंतर एक वर्षाचे मेट्रो चालवण्याचे प्रशिक्षण दिले जाते. हे सर्व टप्पे पार केल्यावर उमेदवार मेट्रो पायलट बनू शकतो.

🌐(२) पहिल्यांदा मेट्रो चालवताना रुपालीची मनःस्थिती कशी झाली होती ?उत्तर : पहिली मेट्रो चालवण्याची जबाबदारी रुपालीवर होती; म्हणून तिच्या मनात थोडी भीती होती. सर्वांना नीट घेऊन जाईन की नाही, असे विचार तिच्या मनात येत होते. पण एकदा रुपालीने मेट्रो चालवायला सुरुवात केली आणि तिच्या मनातली भीती क्षणात पळून गेली. नंतर न घाबरता, आत्मविश्वासाने रुपालीने मेट्रो चालवली.

🌐(३) मेट्रोच्या उद्घाटनाचा दिवस रुपालीसाठी अविस्मरणीय का होता ? उत्तर:-  पहिल्यांदाच मेट्रो धावणार होती आणि रुपाली तिची पहिली महिला सारथी झाली होती. मेट्रोमध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, अनेक मान्यवर मंडळी, मीडिया तसेच रुपालीच्या घरची सर्व मंडळी उपस्थित होती. या सर्वांना  रुपालीला मेट्रोमधून घेऊन जायचे होते; म्हणून मेट्रोच्या उद्घाटनाचा दिवस रुपालीसाठी अविस्मरणीय होता.

✍🏻  प्रश्न २. मेट्रोबाबतीत पुढील मुद्द्यांवर थोडक्यात माहिती लिहा :  ✍🏻 🌐 (१) केबिन :- केबिन ही मेट्रो चालवणाऱ्या पायलटसाठी असते. ती मेट्रोच्या दोन्ही बाजूंना असते. केबिनमध्ये मेट्रो चालवण्याची पूर्ण यंत्रणा बसवलेली असते.

🌐(२) कॅमेरे: मेट्रोच्या डब्यात व स्टेशनांवर सी. सी. टी. व्ही. कॅमेरे लावलेले असतात. हे कॅमेरे प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी लावलेले असतात. 

🌐(३) मेट्रोचा प्रवास :-मेट्रोचा प्रवास हा आनंददायी व सुखकारक आहे. पावसाळ्यात मेट्रोतून प्रवास करताना ढगातून तरंगत जात असल्याचा अनुभव येतो, तर बोगद्यातून जाताना जगाशी संबंध तुटल्यासारखा भासतो. मेट्रोमधून प्रवास करण्यासाठी टोकन म्हणजे मेट्रोचे तिकीट दिले जाते. तसेच रोज मेट्रोने प्रवास करायचा असल्यास प्रीपेड कार्डही मिळते. मेट्रोने प्रवास करतेवेळी टोकन किंवा प्रीपेड कार्ड असावेच लागते.

🌐 (४) जिने: प्लॅटफॉर्म चढण्यासाठी आणि उतरण्यासाठी सरकते जिने असतात.

 🌐 (५) दरवाजे:-  मेट्रोच्या डब्यांचे दरवाजे आपोआप उघडतात आणि ते पायलटला बंद करावे लागतात. टोकन किंवा प्रीपेड कार्ड मशीनवर टाकल्यानंतरच मेट्रोचे दरवाजे उघडतात व मगच प्लॅटफॉर्मवर जाता येते .

 🌐 (६) प्रवासी संख्या  :- मेट्रोत एका वेळी साधारणतः पंधराशे प्रवासी प्रवास करू शकतात. 

🌐 (७) इंजिन : मेट्रोला दोन्ही बाजूंना इंजिन असते. त्यातील तंत्रज्ञान अत्याधुनिक असते. इंजिन पायलटच्या केबिनमध्ये असते.

🌐  (८) तिकीट-  मेट्रोच्या तिकिटाला टोकन म्हणतात. दररोज प्रवास करायचा असल्यास प्रीपेड कार्डही मिळते. प्रीपेड कार्डमध्ये भरलेले पैसे प्रवासानुसार संपत जातात. ते संपले की पुन्हा मेट्रोच्या तिकीट विंडोवर जाऊन पैसे भरायचे असतात. टोकन किंवा प्रीपेड कार्ड प्रवास करताना जरुरीचेच असते.

💐• प्रश्न ३. मेट्रोची वैशिष्ट्ये लिहा  : उत्तर :मेट्रोची वैशिष्ट्ये

 🌐  (१) अत्याधुनिक यंत्रणा (२) स्टेनलेस स्टीलचे डबे (३) वातानुकूलित चार डबे (४) सी. सी. टी. व्ही. कॅमेरे (५) पंधराशे प्रवाशांची सोय.


💐 मुक्तोत्तरी प्रश्न💐

तुम्ही मेट्रोतून कसा प्रवास कराल?✍🏻   उत्तर :- आधी प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी टोकन घेईन. प्लॅटफॉर्मवर जाईन. टोकन टाकल्यावर मेट्रोचे दरवाजे उघडतील. वातानुकूलित डब्यात शिरून खिडकीजवळच्या सीटवर बसेन. ढगांतून तरंगत कसे जातात त्याचा अनुभव घेईन. मेट्रो जिथून सुटते तिथे बसून शेवटच्या स्टेशनला उतरेन.


 💥 भाषाभ्यास व व्याकरण  💥

💥  क्रियापदांचे प्रकार  💥

सकर्मक  , अकर्मक , संयुक्त, सहायक  . पुढील वाक्ये वाचा व त्यांतील कर्ता, कर्म आणि क्रियापदे ओळखून तक्त्यात लिहा :

वाक्य

१. तेजवंत फुटबॉल खेळतो. २. शिक्षक कविता गातात. ३. निशा निबंध लिहिते. ४. जोसेफ रस्त्यात पडला. ५. दादा घरी आला.६. सुरेश उद्या पुण्याला जाईल.

 उत्तर :- (१) कर्ता - तेजवंत , कर्म  - फुटबॉल क्रियापद - खेळतो.(२)कर्ता-   शिक्षक   कर्म - कविता क्रियापद- गातात.(३) कर्ता -निशा, कर्म - निबंध,  क्रियापद- लिहिते.  (४) कर्ता - जोसेफ, कर्म :- नाही , क्रियापद- पडला.(५) कर्ता - दादा, कर्म - नाही , क्रियापद-आला .(६) कर्ता - सुरेश ,कर्म -नाही , क्रियापद- जाईल.

वरील  वाक्यांच्या निरीक्षणांवरून असे लक्षात येते की १. २ व३ क्रमांकांच्या वाक्यांत कर्म आहे व ४, ५, ६ क्रमांकांच्या वाक्यांत कर्म नाही. ज्या क्रियापदांचा अर्थ पूर्ण करण्यासाठी कर्माची गरज असते, ती 'सकर्मक क्रियापदे' होय. ज्या क्रियापदांचा अर्थ पूर्ण होण्यासाठी कर्माची गरज लागत नाही, ती अकर्मक क्रियापदे' होय.

सकर्मक क्रियापद-  कर्म असलेले क्रियापद . अकर्मक क्रियापद - कर्म नसलेले क्रियापद

• प्रश्न पुढील वाक्यांतील क्रियापदे सकर्मक की अकर्मक ते लिहा :(१) रुपाली मेट्रो चालवते.(२)मी मैदानात खेळतो.(३) मेट्रोचे दरवाजे उघडतात. (४)मेट्रोला इंजिन असते.

उत्तर :- (१) सकर्मक (२) अकर्मक (३) अकर्मक  (४) सकर्मक


💥 २. लेखन विभाग  💥

मेट्रो तुमच्याशी बोलते आहे, अशी कल्पना करा. मेट्रो तिची कहाणी काय सांगेल, ते लिहा.

उत्तर : मी मेट्रो बोलते आहे...!

 मुलांनो, विज्ञान व तंत्रज्ञानाच्या युगामध्ये नवीन नवीन शोध लागतात. तसा माझाही शोध लागला. आतापर्यंत तुम्ही रेल्वेरुळांवरून जाणारी गाड़ी पाहिली व त्यातून प्रवास केलात, मी तर उड्डाण पुलावरून झूम वेगात जाते. माझ्यात बसून तुम्ही प्रवासाचा आनंद घ्या. तुम्ही प्रथम टोकन काढा नि सरकत्या जिन्याने प्लॅटफॉर्मवर या. ही पाहा मी आले. माझे चारही डबे वातानुकूलित आहेत. सर्वत्र सी. सी. टी. व्ही. लावलेले. माझे इंजिन अत्याधुनिक यंत्रणेचे! माझे दरवाजे आपोआप उघडतात, बंद होतात. आहे की नाही गंमत! माझ्यातून प्रवास करताना तुम्हांला ढगांतून तरंगत जाण्याचा भास होईल, मग काय? कराल ना, माझ्यामधून प्रवास! या, मी तुमची वाट बघते आहे.


💥 ३. तोंडी परीक्षा  💥


प्रश्न  :- पुढील प्रश्नांची तोंडी उत्तरे सांगा.

• (१) तुम्हांला मोठे झाल्यावर कोणते वाहन चालवायला आवडेल? का ते सांगा. (२) वाहनांचे वेगवेगळे प्रकार सांगा.

🌻  आकारिक मूल्यमापन  🌻

💥 1️⃣. प्रकट वाचन:


•• पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक ६४ वरील 'सारे हसा' हा उतारा मोठ्याने वाचा.

💥  2️⃣. कृती / प्रात्यक्षिक


• पुढील दिलेल्या क्षेत्रांतील कर्तृत्ववान महिलांची नावे लिहा

क्षेत्र- क्रीडा ,विज्ञान,   वैद्यकीय , शिक्षण,राजकीय

उत्तर :क्रीडा - पी. टी. उषा

विज्ञान - कल्पना चावला

वैद्यकीय - डॉ. राणी बंग 

शिक्षण - अनुताई वाघ 

राजकीय - इंदिरा गांधी

  💥 3️⃣. मुलाखत : तुमच्या परिसरातील रिक्षाचालक, एस. टी. चालक यांच्याशी संवाद साधण्यासाठी दहा प्रश्न तयार करा.

रिक्षाचालक- प्रश्न : (१) रिक्षा कधीपासून चालवताय? (२) रिक्षा चालवण्याचे प्रशिक्षण घेतले होते का? कुठे ? (३) रिक्षा तुमची स्वतःची आहे की मालकाची? मालकाशी काय करार झाला आहे? (४) रिक्षाचे मेन्टेनन्स् कसे करता ? (५) प्रवाशांबद्दल तुमचे मत काय? एस. टी. चालक- प्रश्न : (१) गाडी चालवण्यास कधीपासून शिकलात? कसे? कुठे? (२) ड्रायव्हिंग लायसेन्स कुठून व कसे काढलात ? (३) एस. टी. चे ब्रीद वाक्य काय आहे? (४) प्रवाशांशी कसे वागता? ते तुमच्याशी कसे वागतात (५) एस. टी. चालवताना आनंद वाटतो? का? कसा ?

  💥  4️⃣. उपक्रम :आंतरजालाचा वापर करून भारतात कोणकोणत्या ठिकाणी मेट्रो धावते याची माहिती घ्या व त्या ठिकाणांची यादी तयार करा.

💥    ५. प्रकल्प :(१) वाहनांचे वर्णन असणाऱ्या कविता शोधा व संग्रह करा.  (२) महिलांनी कोणकोणत्या क्षेत्रांत नव्याने पदार्पण केले आहे ते शोधा व त्या क्षेत्रांची यादी करा.

🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻

  1️⃣ 2️⃣ 3️⃣ 4️⃣  7️⃣ 8️⃣  9️⃣  🔟




Comments

Popular posts from this blog

HOME