१५.बालसभा

 


१५.बालसभा (पाठ्यपुस्तक पान क्र. ५६)

◆ पाठाचा परिचय ◆

पाळंदूर शाळेतील इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांनी बालसभेचे आयोजन केले व बालसभा यशस्वीरीत्या पार पाडली, त्यांचा वृत्तान्त या पाठात दिला आहे. तसेच बालसभा या उपक्रमाचे नियोजन, कामाचे वरूप, कार्यक्रमाची विविधता यांबाबत विदयाथ्यर्थ्यांना मार्गदर्शन मिळावे, यासाठी हा पाठ अभ्यासणे गरजेचे आहे.


◆शब्दार्थ◆

नियोजन - कार्यक्रमाची योजना करणे. वतीने - तर्फे. प्रतिमा- फोटो, छायाचित्र. सन्माननीय- आदरणीय. अतोनात -खूप, अपार. विकास- प्रगती. व्यासंगी -अभ्यासू. मनन-चिंतन- विचार करणे. जडली - लागली. कुशाग्र - कुशल, तरबेज. उत्तुंग -अफाट. अखंड -सतत. कर्तृत्ववान -कर्तबगार. तळमळ -आस्था, आत्मीयता. अहोरात्र - दिवसरात्र. मनःपूर्वक-  मनापासून, हार्दिक. त्याग - समर्पण, देणे. प्रेरित- प्रेरणा. शालाबाह्य -  शाळेच्या बाहेर, (शिक्षणापासून वंचित), वृंद - गण, गट, समूह. मोलाचे - महत्त्वाचे, बहुमोल. ध्वनी व्यवस्था - आवाज दूरवर पोहोचवण्यासाठी केलेली व्यवस्था. चित्र रेखाटन - रेषांनी काढलेली चित्रे, रेखाचित्रे.


◆टिपा ◆

(१) पुण्यतिथी - मृत्युदिन, मयंती.

(२) सूत्रसंचालन - कार्यक्रमाचे सूत्र राखण्याची पद्धती.

(३) भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार - डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र भारताचे संविधान मांडले.

(४) सत्यशोधक समाज - महात्मा फुले यांनी स्थापलेली संस्था.

(५) विधवा - जिचा नवरा हयात नाही, अशी स्त्री.

(६) मिलिंद व सिद्धार्थ कॉलेज- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी

स्थापन केलेली अनुक्रमे औरंगाबाद व मुंबई येथील महाविदयालये.

(७) दीपस्तंभ - सागरात किंवा आकाशातील वाहनांना दिशा दाखवणारा प्रकाशी खांब.

(८) कवी विंदा करंदीकर - ज्ञानपीठ पुरस्कार विजेते मराठीतील एक प्रमुख कवी; गोविंद विनायक करंदीकर.

◆ वाक्प्रचार व त्यांचे अर्थ ◆

(१) संपन्न होणे - (कार्य) पार पडणे.

(२) भूमिका पार पाडणे - दिलेले कार्य व्यवस्थित करणे.

(३) स्थानापन्न होणे - आसन / खुर्ची यांवर बसणे.

(४) पुष्पहार अर्पण करणे - फुलांचा हार सन्मानाने देणे.

(५) न डगमगणे - न घाबरणे,

(६) अहोरात्र झटणे - रात्रंदिवस कष्ट करणे.

(७) स्थापन करणे - निर्माण करणे.

(८) संदेश देणे - बहुमोल विचार देणे, शिकवण देणे.

(९) दरवाजे खुले करणे - विनाअट / विनामूल्य प्रवेश देणे.

(१०) हातभार लावणे - मदत करणे.

(११) अभिवादन करणे - वंदन करणे.

१२) आस्था असणे -  कळकळ असणे, आवड असणे,

(१३) प्रोत्साहन देणे - प्रेरणादेणे , उत्तेजन देणे.

(१४) बारीक लक्ष असणे -  नीट बारकाईने न्याहाळणे,

१५) विचारांचा पगडा असणे -  विचारांचा प्रभाव असणे.

(१६) धन्यवाद देणे - आभार मानणे.

(१७) शिक्षणाची गंगा घरोघरी पोहोचवणे - प्रत्येक घरात शिक्षणाचा प्रसार करणे.

(१८) संकल्प करणे  - निश्चय करणे, निर्धार करणे.

(११) मार्गदर्शन करणे - योग्य माहिती देणे.

(२०) भर घालणे - आहे त्यात अधिक जोडणे.


◆संकलित मूल्यमापन◆

१. प्रश्नोत्तरे

• प्रश्न १. दोन-तीन ओळींत उत्तरे लिहा :

(१) इयत्ता सहावीच्या बालसभेचे आयोजन कोणत्या निमित्ताने केले होते ?

उत्तर : महात्मा जोतीराव फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर याच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने इयत्ता सहावीच्या बालसभेचे आयोजन केले होते.

(२) बालसभेमध्ये इयत्ता सहावीच्या वर्गातील कोणी कोणी सहभाग घेतला?

उत्तर : बालसभेमध्ये इयत्ता सहावीच्या वर्गातील नीता, तन्वी, निलोफर या मुलींनी व कुणाल, चंदर य मुलांनी सहभाग घेतला.

(३) बालसभेचे नियोजन करताना मुलांना कोणी कोणी मदत केली ?

उत्तर : बालसभेचे नियोजन करताना सहावीच्या वर्गशिक्षिका बाई, शाळेचे रखवालदार मामा, सेविका मावशी तसेच मीनल, जॉन, प्रकाश, कुमुद, संपदा, प्रफुल्ल, चिनप्पा या विदद्यार्थ्यांनी मदत केली.


प्रश्न २. कोण ते लिहा :

(१) प्रास्ताविक करणारी -

(२) सूत्रसंचालन करणारी -

(३) बालसभेचा अध्यक्ष -

(४) भाषण करणारा पाचवीतील मुलगा-

(५) भाषण करणारा सातवीतला मुलगा -

◆उत्तरे:(१) नीता (२)तन्वी (३)कुणाल (४)अन्वर (५)गुरुप्रीत


●  मुक्तोत्तरी प्रश्न ●

तुमच्या वर्गाला विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन शाळा स्तरावर करायचे आहे. तुम्ही कोणकोणती तयारी कराल, ते क्रमाने लिहा.

उत्तर : (१) शिक्षकांच्या मदतीने वर्गातील निवडक मुलांची आयोजन समिती स्थापन करणे.

(२) विज्ञान प्रदर्शनाची वेळ, तारीख व सभागृह निश्चित करणे,

(३) दोन-तीन मुलांचे गट करून प्रत्येक गटाला प्रयोग करून आणण्यास सांगणे, प्रयोग तयार करण्याचा कालावधी निश्चित करणे.

(४) त्या त्या गटाने प्रयोगाचे यशस्वी प्रात्यक्षिक कसे करणार याची शिक्षकांच्या मदतीने सराव करणे.

(५) विज्ञान प्रदर्शन मांडण्यासाठी नियोजन करणे.

(६) उ‌द्घाटनासाठी प्रमुख पाहुणे निश्चित करणे.

(७) विज्ञान प्रदर्शनाच्या दिवशी शिस्त कमिटी , स्वयंसेवक नेमणे व विज्ञान प्रदर्शनाची यशस्वी कार्यवाही करणे.

(८) सर्वांच्या सहकार्याने  प्रदर्शन पार पाडणे.


● भाषाभ्यास व व्याकरण ●

प्रश्न १. लिग बदला :

पुल्लिगी : शिक्षक ,मुख्याध्यापक ,मित्र ,विद्यार्थी

स्त्रीलिंगी : शिक्षिका, मुख्याध्यापिका, मैत्रीण,विद्यार्थिनी

प्रश्न २. विरुद्धार्थी शब्द लिहा :

(१) पुण्यतिथी X जयंती (२) आवडीचे X नावडीचे

(३) पूर्ण  X अपूर्ण (४) सोय X गैरसोय (५) विधवा X सधवा

(६) खरे X खोटे


कर्ता, कर्म व क्रियापद

वाक्यातील क्रियापदाला 'कोण' असा प्रश्न विचारल्यावर जे उत्तर मिळते, तो शब्द त्या वाक्याचा 'कर्ता' असतो. वाक्यातील क्रियापदाला 'काय' असा प्रश्न विचारल्यानंतर जे उत्तर मिळते, तो शब्द म्हणजे त्या वाक्यातील 'कर्म' होय.


• पुढील वाक्ये वाचा :

(१) श्रीरंगने बासरी वाजवली.

(२) सुगंधाने आंबे खाल्ले.

(३) राजूने पतंग उडवला.

(४) मधूने पुस्तक वाचले.

वरील वाक्यांतील क्रियापदांना 'कोण' आणि 'काय' या शब्दांनी प्रश्न विचारूया.


क्र. क्रियापद 'कोण 'ने प्रश्न उत्तर (कर्ता) 'काय'ने प्रश्न उत्तर (कर्म)

१. वाजवली  वाजवणारा कोण ?  श्रीरंग वाजवले ते काय?

बासरी

२. खाल्ले खाणारी कोण ? सुगंधा खाल्ले ते काय ? आंबे

३. उडवला उडवणारा कोण? राजू उडवले ते काय? पतंग

४. वाचले  वाचणारा कोण ? मधू वाचले ते काय? पुस्तक

• प्रश्न ३. पुढील वाक्ये वाचा व त्यांतील कर्ता, कर्म, क्रियापद ओळखा :


वाक्य        कर्ता      कर्म    क्रियापद

१. तारा क्रिकेट खेळते.

तारा  क्रिकेट खेळते

२. यास्मीन पुस्तक वाचते.

यास्मीन , पुस्तक , वाचते

३. पक्षी किलबिल करतात.

पक्षी , किलबिल ,करतात

४. राजू अभ्यास करतो.

राजू , अभ्यास , करतो

५. शबाना स्वयंपाक करते.

शबाना स्वयंपाक करते

६. जॉन व्यायाम करते.

जॉन व्यायाम करतो





◆२. लेखन विभाग ◆


* (१) तुमच्या शाळेत 'बालिका दिन' साजरा केला आहे, त्या कार्यक्रमाची बातमी तयार करा.


उत्तर :


आदर्श विद्यालयाचा आदर्श ! बालिका दिन साजरा


जनादेश : ठाणे : १ सप्टेंबर २०१६.


(आमच्या वार्ताहराकडून)


ठाणे, पाचपाखाडी येथील आदर्श विद्यालयात काल आदर्शवत असा अनोखा 'बालिका दिन' साजरा करण्यान आला. देवी माता असलेल्या स्त्रीचा यथोचित सन्मान करणे व स्त्री शक्तीचा आदर राखणे हा त्यामागचा सद्हेतू आहे.


आदर्श विद्यालयाच्या सभागृहात सकाळी १० वाजता जनादेशचे प्रमुख संपादक श्री. कैलास म्हापदी यांच्या शुभहस्ते पाचवीतील पंचकन्यांचा शाल श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन आदरसत्कार करण्यात आला. या वेळो अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका मिथिला देशपांडेबाई या होत्या.


प्रमुख पाहुणे आपल्या भाषणात म्हणाले की, स्त्रीचा सन्मान राखणे हे आपल्या संस्कृतीचे आदय मूल्य आहे. या चिमुकल्या स्त्री शक्तीचे कौतुक करताना मला जन्म देणाऱ्या माझ्या माउलीचे स्मरण झाले. मी जणू समस्त मातांचा सत्कार करतो आहे, हे मी माझे भाग्य समजतो.


पाचवीतील अन्य पाच कन्यांनी 'पसायदान' म्हणून या बालिका दिनाचा हृदय शेवट केला.


• (२) स्वातंत्र्यदिनानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमासाठी तुम्हांला शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षांना निमंत्रणपत्रिका पाठवायची आहे. शिक्षकांच्या मदतीने निमंत्रणपत्रिका तयार करा. उत्तर : हार्दिक निमंत्रण ,भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

महोदय,

१५ ऑगस्ट २०१७ रोजी, सकाळी ७.३० वाजता 'सरस्वती प्रशाले 'च्या पटांगणात स्वातंत्र्यदिन संस्थेचे अध्यक्ष श्री. नरेंद्र प्रधान यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा होत आहे. आपली उपस्थिती प्रेरणादायक आहे. जयहिंद !

कार्यक्रम:

झेंडावंदन

- अध्यक्षांच्या शुभहस्ते

• राष्ट्रगीत गायन प्रशालेचे विदयार्थी

• झेंडागीत गायन प्रशालेचा स्वयंसेवी गट

• अध्यक्षांचे भाषण

• समारोप.


।। वंदे मातरम् ।।


* (३) तुमच्या शाळेच्या स्नेहसंमेलनाच्या उ‌द्घाटन सोहळ्याचा ओघतक्ता पुढे दिलेला आहे. त्याचे निरीक्षण करा आणि त्याप्रमाणे तुमच्या शाळेतील क्रीडास्पर्धेचा ओघतक्ता तयार करा.


पाहुण्यांचे स्वागत >दीप प्रज्वलन >प्रास्ताविक >पाहुण्यांचा परिचय >आभार प्रदर्शन - - पाहुण्यांचे मनोगत - बक्षीस वितरण -

उत्तर :

गटनिहाय विदद्याच्यर्थ्यांचे क्रीडांगणात आगमन → पाहुण्यांचे स्वागत पाहुण्यांचा परिचय - पाहुण्यांचे मनोगत→ |*- समारोप - स्पर्धानिहाय पदकांचे वितरण - क्रीडास्पर्धा सुरू> झेंडा दाखवून क्रीडास्पर्धेचे उ‌द्घाटन> राष्ट्रगीत.


(४) महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची माहिती आठ-दहा ओळीत लिहा.

उत्तर : महात्मा फुले : महात्मा फुले यांनी मुलींसाठी शाळा सुरू केली. सत्यशोधक समाजाची स्थापना केली, विधवा विवाहास प्रोत्साहन दिले. अनाथालये काढली, सर्वांनी शिकावे म्हणून अहोरात्र झटले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर :- पुस्तकांच्या वाचनात रमणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाचे महत्त्व ओळखून मिलिंद व सि‌द्धार्थ या महाविदयालयांची स्थापना केली. विद्याथ्यांना राहण्यासाठी वसतिगृहे निर्माण केली. 'पुस्तकांसारखा दुसरा मित्र नाही' हा संदेश दिला. ते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून ओळखले जातात,


३. तोंडी परीक्षा


प्रश्न १. पुढील प्रश्नांची तोंडी उत्तरे सांगा:


(१) तुमच्या वर्गाची बालसभा होते का? कशी?


(२) बालसभेत तुमचा कशात सहभाग असतो ? कसा ?


प्रश्न २. तुम्हांला हे आठवते का?


(१) इयत्ता पाचवीमध्ये असताना तुमच्या शाळेत कोणकोणत्या बालसभा झाल्या होत्या ?

(२) त्या सभांसाठी वर्गातील कोणकोणत्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता?

(३) बालसभांमध्ये तुम्ही सहभाग घेतला होता का?

(४) बालसभांमध्ये तुम्ही सहभाग घेतला असेल, तर बालसभर्भाची तयारी तुम्ही कशी केली होती?


१. प्रकट वाचन :


•• पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक ५९ वरील 'वाचा' या उताऱ्याचे प्रकट वाचन करा.


२. कृती / प्रात्यक्षिक :


•• तुमच्या शाळेत पर्यावरण दिन साजरा करायचा आहे. पुढील आकृतीत काही मुद्दे दिले आहेत. त्याबाबत तुम्ही काय विचार कराल? ते लिहा :

कोणती घोषवाक्ये बनवाल?

कोणत्या समस्यांवर विचार कराल?

१. प्रदूषण टाळा, पर्यावरण वायवा !

२. झाडे लावा, झाडे वाढवा !

३. पर्यावरण रक्षण : आरोग्याची गुरुकिल्ली ! 

४. पर्यावरण रक्षणाला पर्याय नाही !

प्रमुख पाहुणे म्हणून कोणाला बोलवाल ?


१. कचरा समस्या


२. जल प्रदूषण


३. वायु प्रदूषण


४. ध्वनी प्रदूषण


५. पाणी तुंबणे


३. उपक्रम :


*७१) शाळेमध्ये बालसभांव्यतिरिक्त होणान्या इतर कार्यक्रमांची यादी करा.

१. गावातील ज्येष्ठ नागरिक

२. समाजसेवक

३. पत्रकार

४. कयो/लेखक

५. मुख्याध्यापक


उत्तर : [मुददे : स्वातंत्र्यदिन/प्रजासत्ताक दिन/ गांधी जयंती / सावित्रीबाई फुले जयंती / शिक्षकदिन इत्यादी.] (२) चालसभा कोणकोणत्या विषयांवर घेतल्या जातात? त्या विषयांची यादी करा.

उत्तर : [मुददे : शाळेच्या परिसराची स्वच्छता / शाळेची शिस्त/ कला-क्रीडा गुण संशोधन / स्नेहसंमेलन.]









Comments

Popular posts from this blog

HOME