६मराठी २० ओळख थोरांची

 भाग १- खाशाबा जाधव 

पाठाचा व्हिडीओ पहा 


प्रश्न:१. ऑलिंपिकवीर खाशाबा जाधव शाळेला जाताना व घरी परत येताना पळत  का  जायचे ? 

उत्तर:- शाळेत लवकर पोहोचावे म्हणून घरी  पळत यायचे आणि घरला येताना अंधार होईल म्हणून घरी पळत यायचे. 

प्रश्न:२.अनवाणी पळल्यामुळे खाशाबा जाधव यांचे पाय कसे बनले ?

उत्तर  :- अनवाणी पळल्यामुळे खशाबा जाधव यांचे पाय काटक बनले.

प्रश्न.३. जगातील सर्वोत्तम ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेचा १५ वा महोत्सव कोणत्या साली पार पडला ?

उत्तर:- जगातील सर्वोत्तम ऑलम्पिक क्रीडा स्पर्धेचा  १५ वा महोत्सव 1952 साली  पार पडला.

प्रश्न:४.  फिनलँडची राजधानी कोणती?

उत्तर:-  फिनलँडची राजधानी हेलसिंकी .

 प्रश्न:५. १५ व्या ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेत  1952 साली भारताला  मिळालेले पदक  हे कितवे  पदक होय?

उत्तर:-१५ व्या ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेत 1952 साली भारताला मिळालेले पदक  हे पहिले पदक होय. 

प्रश्न:६.   खाशाबा जाधव यांच्या आई वडिलांचे नाव काय ?

उत्तर:- खाशाबा जाधव यांच्या आईचे नाव पुतळाबाई व वडिलांचे नाव दादासाहेब.

प्रश्न: ७.   खशाबा जाधव यांना कोणत्या नावाने ओळखत होते ?

उत्तर:-खशाबा जाधव यांना 'अण्णा'  या टोपण नावाने ओळखत होते.

प्रश्न: ८.  खशाबा जाधव यांचे आजोबा कोण होते?

उत्तर:- खशाबा जाधव यांचे आजोबा एक कुस्तीपटू होते.

प्रश्न:९.   कोणाच्या मार्गदर्शनाखाली खशाबा जाधव यांच्या कुस्तीचा श्रीगणेशा झाला ?

उत्तर:-वडिलांच्या मार्गदर्शनाखाली खशाबा जाधव यांच्या कुस्तीचा श्रीगणेशा झाला. 

प्रश्न: १०. चित करणे म्हणजे काय ?

उत्तर:- चित करणे  म्हणजे हरवणे.

प्रश्न:११. खशाबा जाधव  यांनी कुस्तीचे धडे कोणाकडून घेतले?  

उत्तर:-कुस्तीचे धडे खशाबा जाधव यांनी आपल्या वडिलांकडून घेतले.

प्रश्न : १२ .खशाबा जाधव  यांनी कुस्तीचे  प्राथमिक धडे कोणते घेतले ?

उत्तर: खशाबा जाधव  यांनी कुस्ती शिकताना मान कशी पकडायची , पट कसा काढायचा , चित कसे करायचे असे प्राथमिक  धडे त्यांनी वडिलांकडून घेतले.

प्रश्न:१३. आखाडा म्हणजे काय ?

उत्तर:-आखाडा म्हणजे कुस्तीचे मैदान होय .

प्रश्न:१४. खाशाबा जाधव यांचे गोळेश्वर हे गाव कोठे आहे?

उत्तर:- खशाबा जाधव यांचे गोळेश्वर हे गाव कराड तालुक्यात  कृष्णा नदीच्या काठावर आहे .

प्रश्न: १५.खाशाबा जाधव कोणत्या क्रीडा प्रकारांमध्ये ऑलम्पिक वीर म्हणून पदक विजेते झाले ?

उत्तर:- खाशाबा जाधव हे कुस्ती या क्रीडा प्रकारांमध्ये ऑलम्पिक वीर म्हणून पदक विजेता झाले .

प्रश्न: १६. खशाबा जाधव यांनी वयाच्या कितव्या वर्षी पहिली  कुस्ती जिंकली होती ?

उत्तर:-वयाच्या अवघ्या आठव्या वर्षी पहिल्यांदा जत्रेतील कुस्ती खशाबा जाधव यांनी जिंकली होती.

प्रश्न: १७. खाशाबा जाधव यांनी शिक्षण घेतलेल्या हायस्कूल चे नाव काय ?

उत्तर:-कशाबा जाधव यांनी शिक्षण घेतलेले हायस्कूल चे नाव टिळक हायस्कूल होय.

प्रश्न: १८  खाशाबा जाधव यांचा  कुस्तीतील दम कशामुळे तयार झाला ?

उत्तर:- खाशाबा जाधव हे शिक्षण घेत असताना  हायस्कूलला जाणे आणि संध्याकाळी अनवाणी परत पळत येणे  या  सवयीमुळे खशाबा जाधव यांचा कुस्तीतला दम चांगलाच तयार झाला.

प्रश्न: १९. जगातील सर्वोत्तम समजल्या जाणाऱ्या क्रीडा स्पर्धेचे नाव काय ?

उत्तर:- जगातील सर्वोत्तम समजल्या जाणाऱ्या क्रीडा स्पर्धेचे नाव ऑलम्पिक क्रीडा महोत्सव.

प्रश्न: २०. ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेचा पंधरावा महोत्सव कोठे पार पडला ?

उत्तर:- ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेचा 15 वा महोत्सव फिनलँडची राजधानी हेलसिंकी  येथे पार पडला.

 प्रश्न: २१.  पंधराव्या ऑलम्पिक  क्रीडा  स्पर्धा किती साली पार पडल्या ?

उत्तर:- पंधराव्या ऑलम्पिक  क्रीडा स्पर्धा 1952 साली पार पडल्या. 

प्रश्न: २२. खाशाबा जाधव यांनी भारताला कोणत्या खेळ प्रकारात पदक मिळवून दिले ?

उत्तर:-खाशाबा जाधव यांनी भारताला कुस्ती या  खेळ प्रकारात  पदक मिळवून दिले.

प्रश्न: २३. खाशाबा जाधव यांनी भारताला कुस्ती या खेळ प्रकारात  कोणते पदक मिळवून दिले ?

उत्तर:-खाशाबा जाधव यांनी भारताला कुस्ती या  खेळ प्रकारात कांस्य पदक मिळवून दिले.



प्रश्न: वाक्यप्रचाराचा अर्थ लिहा . 

श्री गणेशा करणे -  सुरुवात करणे.

चीत करणे - हरवणे.

आखाडा - कुस्तीचे मैदान.

 तमा न बाळगणे-  काळजी न करणे, फिकीर न करणे 












खाशाबा जाधव या 

पाठाचा विडिओ पहा

Comments

Popular posts from this blog

HOME