७मराठी १६कोळीण

 पाठ १६. कोळीण 

               - मारुती चितमपल्ली

(पाठ्यपुस्तक पान क्र. ७४)



पाठाचा व्हिडीओ आणि स्वाध्याय इथे पहा


१६. कोळीण

        मारुती चितमपल्ली

पाठाचा परिचय : कोळीण आपले सावज कसे पकड़ते व आपल्या घरट्याची काळजी कशी घेते; तसेच छायाचित्रण करण्याचे कोणते व कसे प्रयास केले, याचे रोमहर्षक वर्णन या पाठात केले आहे. 

 शिकवण/संदेश/ मूल्य :-  सृष्टीमध्ये असलेल्या (रानातील) सजीव प्राणिमात्रांचा, जीवजंतूंचा, कीटकांचा परिचय    व्हायला हवा व त्यांचे जीवनमान कळायला हवे, हे उद्दिष्ट या पाठातून प्रकट झाले आहे.


शब्दार्थ


सावज -  भक्ष्य, जिवंत खाद्य.

लक्षपूर्वक-  नीट लक्ष देऊन. 

सारायचो - ढकलायचो. 

झापड - झडप, दार.

रंगगोपन -  रंगाचा लेप.

भेग - चीर.

नर - पुरुष.

वास्तव्य - रहिवास, 

अस्तर - वेष्टन.

विलक्षण - अचाट.

कार्यरत - कामात मग्न. 

छायाचित्र - छबी, फोटो.

साधनसामग्री - (छायाचित्रांचे) सामान, ऐवज. 

पार्श्वभूमी  - मागचे दृश्य. 

अंधूक - अस्पष्ट, फिकट.

कमान - अर्धवर्तुळाकार वक्र रेषा.

नजीकच्या - जवळच्या. 

चैतन्य- चेतना .

अस्तित्वाची - असण्याची.

कालावधी-  वेळ, काळ.

छिद्र -  भोक. 

शिडकावा - पाण्याचे  तुषार.

एकाग्रचित्त - मन एकवटणे. 

गूढ - अगम्य, 

प्रतीक्षा वाट-  पाहणे. 

सापळा - पिंजरा .

धोका - खतरा.

सावट- चाहूल .

पार - दूर .

असहाय - हतबल, मदतीशिवाय, निराधार .

दवारलेल्या - दवाने भरलेल्या.  

लवली - वाकली. 

राखी - राखाडी रंगाची.

साहाय्य - मदत. 

कंपित - कंपन होणारे, थरथरणारे. 

किलकिलं - थोडेसेच उघडलेले (दार). 

आगमन - येणे, प्रवेश.

रेंगाळणे - एका जागी घोटाळणे. 

पात्र - भूमिका करणारा. 

अजागळ - बावळट. 

संमिश्र - मिसळलेले. 

कर्णा - मोटारीचा भोंगा. 

खुळ्यासारखं - वेड्यासारखं.

स्तब्ध - शांत. 

मर्यादा - आडकाठी. 

कुरूप - विरूप, असुंदर.

घोंगडी- कांबळे.

अकस्मात -  एकाएकी, अचानक.

भक्ष्य - खादय.

क्षुद्र - मामुली, क्षुल्लक.

प्रकृती - स्वभाव, तब्येत .

बुद्धिशून्य - मठ्ठ, ढ, अज्ञानी, अडाणी.

यंत्रणा - व्यवस्था.

पुरवठा - उपलब्धी .

ताटी - दरवाजा. 

समाधी - शांतावस्था. 

झोत- कवडसा.

निःसत्त्व - अचेतन.

तंतू - धागा. 

पुनरावृत्ती - पुन्हा होणे. 

झडप - झेप, उडी. 

संघर्ष - लढा , झुंज.

झोडपून - मारून, बदडून. 

कलेवर - निश्चेष्ट शरीर, चेतनाहीन शरीर .

शोषून - चुसून,  चोखून.

झटापट - मारामारी.

तर्क - अंदाज.

क्षणेक - एक क्षण. 

उलथापालथ - वरखाली. 

प्रतवार -  वर्गवारी, श्रेणी, दर्जाप्रमाणे गट. 

श्रमपूर्वक - कष्टाने. 

कौशल्य- कसब.

समय- वेळ, काळ.

कलंडली- लवंडली.

ढिलाई- ढिलेपणा, चुकरपणा. 


टिपा

(१) हॉलीवूड - अमेरिकेतील चित्रपट निर्मितीचे प्रख्यात ठिकाण. 

(२) निकेलचे नाणे- निकेल या धातूपासून बनवलेले नाणे. (३) शेवाळ - पाण्यात उगवलेले गडद हिरव्या रंगाचे गवत.

(४) रेशमाचा धागा  - तलम तंतू असलेला धागा. 

(५) खोरे - नदीच्या आसपासचा डोंगर दरी असलेला प्रदेश.

(६) सोबग - एक प्रकारचा कीटक.

(७) ढेकूळ - शेतातील मातीचे गोळे.

(८) चित्रपटाची तारका - चित्रपटात भूमिका करणारी अभिनेत्री, नटी.

(९) फाश - कोळणीने विणलेले जाळे.

(१०) शतपाद - शंभर पाय असलेला लहान कीटक,

(११) वालनट - अक्रोड.



वाक्प्रचार व त्यांचे अर्थ


(१) निरीक्षण करणे - सर्व बाजूंनी नीट पाहणे.

(२) सुगावा लागणे - शोध लागणे.

(३) आश्चर्य वाटणे - नवल वाटणे.

(४) कार्यरत असणे -  कामामध्ये गुंतणे.

(५) लक्षणे दिसणे - मागमूस लागणे, खुणा सापडणे.

(६) खूण करणे - इशारा करणे. 

(७) गुंग होणे - मग्न होणे.

(८) विसर पडणे - भान नसणे, विसरुन जाणे.

(९) भास होणे - भ्रम होणे.

(१०) दबा धरून बसणे - हल्ला करण्यासाठी लपून बसणे.

(११) झडप घालणे - झेप घेणे.

(१२) पारखे होणे - वंचित राहणे. लाभापासून दुरावणे.

(१३) पारध होणे -  शिकार होणे.

(१४) गिरकी घेणे -  स्वतःभोवती गोल फिरणे.

(१५) उत्कंठा वाढणे - उत्सुकता वाढणे.

(१६) जाण असणे - माहीत असणे. 

(१७) अधीर होणे - बेचैन होणे, अस्वस्थ होणे,

(१८) टक लावून पाहणे - काहीतरी उद्देशाने एका गोष्टीकडे सतत पाहणे.

(१९) साकार होणे - प्रत्यक्ष दिसणे.

(२०) चुळबूळ करणे - अस्वस्थपणे हालचाल करणे. 

(२१) लक्ष वेधणे - नजर खेचून घेणे.

(२२) मागमूस नसणे - माहीत नसणे, न दिसणे.

(२३) दृष्टिआड होणे-  न दिसणे, 

(२४) प्रभावित होणे - प्रभाव पडणे,ठसा उमटणे, 

(२५) अवलंब करणे -  स्वीकारणे.

(२६) त्याग करणे - सोडून देणे. 

(२७) जादूची कांडी फिरणे - चमत्कार होणे.

(२८) विजेच्या गतीने नाहीसे होणे - झटकन दिसेनासे होणे.

(२९) रस नसणे - आवड नसणे.

(३०) विल्हेवाट लावणे- नाहीसे करणे.

(३१) पढवणे -  शिकवण देणे.

(३२) खिळून राहणे - एका जागी राहणे. 

(३३) विळखा घालणे-  चोहोबाजूंनी गच्च आवळणे. मिठी मारणे 




कोळीण या किटकाविषयी अधिक माहिती ......


संकलित मूल्यमापन

१. प्रश्नोत्तरे

प्रश्न १. कोळिणीचे छायाचित्र घेण्यासाठी लेखकाने केलेल्या  कोणत्याही पाच कृती लिहा. 

उत्तर: (१) दूर डोंगराकडे गाडी वळवली.

(२) पायथ्याला  गाडी लावून डोंगर चढून वर गेले. 

(३) वाकून जमिनीचे लक्षपूर्वक निरीक्षण केले.

(४) सुकलेले गवत बाजूला सारले.

(५) चाकूच्या पात्याचे टोक कोळणीच्या दाराच्या बाजूला लावले.

(६) छायाचित्रासाठी साधनसामग्री घेऊन गेले. 

(७) एका दगडावर स्तब्ध बसले.


प्रश्न २. असे का घडले ते लिहा :

(१) लेखक डोंगरावरच्या जमिनीचे निरीक्षण करू लागले.

उत्तर : लेखक डोंगरावर सायंकाळी पोहोचले. पावसाची लक्षणे होती, त्यामुळे अंधूक प्रकाश होता. म्हणून ज्या घरट्याजवळ त्यांनी खूण केली होती, ती शोधण्यासाठी लेखक जमिनीचे निरीक्षण करू लागले. 

(२) लेखकांना बाहेरच्या जगाचा विसर पडला.

उत्तर : लेखकांना रात्रीच्या वेळी कोळीण कार्यरत असते, त्याचे चित्रण करायचे होते. त्यांना कोळिणीच्या घरट्याच्या दरवाजाची कमान दिसली. त्यांच्या पायालगत असलेल्या त्या लहान जगात ते गुंग झाले; म्हणून त्यांना बाहेरच्या जगाचा विसर पडला.

(३) लेखकांनी कोळिणीच्या घरट्याचे उघडलेले दार सोडून दिले.

उत्तर : लेखकांनी चाकूच्या पात्याचे टोक दाराच्या बाजूला लावून कोळिणीच्या घरट्याचे दार उघडले होते. परंतु कोळिणीने चाकूचे टोक इतक्या अचाट ताकदीने ओढले की ते पाते चांगलेच वाकले. म्हणून लेखकांनी उघडलेले दार सोडून दिले. 

(४) कोळिणीला बिळाचे संरक्षण सोडून जाता येत नाही

उत्तर :- कोळिणीने जर आपले बीळ सोडून दिले तर दार इतके घट्ट लागते की पुन्हा तिला कधीच ते उघडता आले नसते म्हणून कोळिणीला बिळाचे संरक्षण सोडून जाता येत नाही.


 ३. पुढील घटनांचे परिणाम लिहा :

घटना  (१) लेखकांनी चाकूच्या पात्याचं टोक कोळिणीच्या घरट्याच्या दाराला लावलं.

परिणाम:- घरट्याचे दार किंचित उघडले व लेखकांना भेगेतून आत पाहता आले.

घटना:- (२) पावसाचा कुठेतरी शिडकावा झाला.

परिणाम:- जमीन थोडी ओलसर झाली.

घटना :- (३) कोळिणीच्या माघारी दार बंद होणे.

परिणाम:- दार इतके घट्ट बसेल की कोळिणीला पुन्हा घरट्यात जाता येणार नाही व तिचीच शिकार होईल.

घटना :- (४) कोळिणीला सोबगच्या पावलांचा आवाज आला.

परिणाम:-  सोबगच्या पावलांचा आवाज कोळिणीने जमिनीखालून ओळखला व ती सावज पकडण्यासाठी अधीर झाली.

प्रश्न ४.  दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे उत्तर लिहा :

कोळिणीच्या घरट्याची वैशिष्ट्ये- 

(१) घरट्याचे ठिकाण 

(२) घरट्याचे दार

(३) दाराला दिलेली उपमा

(४)दाराची विशेष  रचना

(५) घरट्याचे महत्त्व

उत्तर :

(१) घरट्याचे ठिकाण :- कोळिणीचे घरटे डोंगरमाथ्यावर असते. ते जमिनीत जवळजवळ एक फूट खोलवर असते. 

(२) घरट्याचे दार :- कोळिणीचे घरट्याचे दार आणि त्यावरचे अस्तर रेशमी धाग्यांनी घट्ट विणलेले असते.

(३) दाराला दिलेली उपमा :- कोळिणीच्या घरट्याच्या दाराला वाटलीच्या बुचाची उपमा दिली आहे.

(४) दाराची विशेष  रचना :- 

कोळिणीच्या घरट्याचे दार आतून घट्ट लागते. ते इतके पक्के बसते की जराशी फटही राहत नाही ते बाहेरून कोळिणीला उघडता येत नाही.

(५) घरट्याचे महत्त्व :-  कोळीण घरटे सोडून जात नाही. घरट्यात बसून ती सावज हेरते, घरट्याच्या दारावर सावज ती त्यावर झडप घालते व झटकन विळखा घालून आत खेचून घेते. घरट्याचे दार आतून घट्ट लागते. 


भाषाभ्यास व व्याकरण

१.अचूक शब्द ओळखा :

(१) निरिक्षण, निरीक्षण, नीरीक्षण,

(२) पार्श्वभूमी, पार्श्वभुमी, पार्श्वभुमि

(३) कालावधि, कलावधी, कालावधी. 

(४) परीस्थिती, परिस्थिती, परीस्थीती.

(५) निश्चित नीश्चित, निश्चीत

उत्तर:- (१) निरीक्षण  (२) पार्श्वभूमी (३) कालावधी 

(४)  परिस्थिती   (५)  निश्चित

प्रश्न २. तुम्हांला पक्ष्यांच्या , प्राण्यांच्या घरांची नावे माहीत आहेत. ती पुढे  लिहा :

नाव:- सुगरण , साप , वाघ , गाय , घोडा

घर :- घरटे ,  वारूळ, गुहा , गोठा , तबेला






Comments

Popular posts from this blog

HOME