चिंतन

 चिंतन  - पॉझिटिव्ह विचार 


तुम्ही  स्वतः बदला. सगळ्यांना तुम्ही बदलू शकाल. पेरल्याशिवाय अजिबात उगवत नाही. सामान्य माणसंच , असामान्य कामे करू शकतात.  एक  नकार दहा चांगल्या विचारांना खाली आणू शकतो.  लोक वाढले की राजकारण वाढते. एक माणूस निगेटिव्ह झाला तर तो इतरांना देखील हळूहळू  निगेटिव्ह बनवू शकतो.  बुद्धिमान माणूस सर्व गोष्टीवर मात करू शकतो. हार खाण्याचा विचार मनात केव्हाही आणायचा नाही.  आपण आपले विचार होकारार्थी ठेवायला हवेत. आपण आपले प्रयत्न कायमच सुरू ठेवा. कोणताही फायदा आपल्या पदरात पाडून घ्यायचा असेल तर अडचणी ह्या येणारच. त्यावर मात करायला शिकले पाहिजे.  प्रयत्न केल्यास आपण हारु शकत नाही. 



चिंतन- सरकणारा काळ 


एकदा गेलेली वेळ पुन्हा पुन्हा येत नाही. नव्हे पुन्हा कधीही परत येत नाही.  सरकत चाललेला काल , आज पुन्हा आणता  येत नाही.  येणाऱ्या उद्याची कशाचीच खात्री देता येत नाही,  म्हणूनच हाती आलेल्या आजचे भान ठेवून आताचे काम आत्ताच पूर्ण करत रहा म्हणजे गेल्या आयुष्याची खंत कधीही वाटणार नाही.  वर्तमानाचे भान आणि भविष्याची चिंता- फिकीर करावी लागत नाही. त्याचा भविष्यकाळ खरोखरच उज्वल असतो. भविष्याचा वेध घेण्यासाठी भूतकाळाचा बोध घ्यावा लागतो.  त्याला वर्तमान काही करू शकत नाही. खरं म्हणजे जन्म प्रत्येकाला मिळतो; पण आयुष्य प्रत्येकाला मिळेलच असं नाही. काही जीव जन्मानंतर लगेच इहलोकांतून निघून जातात.  त्यांना आयुष्य लाभलेलंच नसतं.  त्याला वर्तमान मिळालेलाच नसतो. आपणास आयुष्य मिळाले आहे,त्याचा उपयोग करू या.  काडी काडी नेच  घरटे तयार होत असते.  अणू अणूने पदार्थ बनतो.  बिंदू बिंदू नी सागर होतो. ज्ञान संचय  करत रहा . म्हणजे ज्ञानी व्हाल. 















Comments

Popular posts from this blog

HOME