७मराठी २० विचारधन


● थोरामोठ्यांचे विचार विद्याथ्यांनी समजून घ्यावेत व आचरणात आणावेत.. .


१ महर्षी धोंडो केशव कर्वे :


शब्दार्थ

गौरवार्थ - सन्मान करण्यासाठी 

किताब - पदवी.

भावी - भविष्यातील .

आधारस्तंभ -  आधाराचा खांब म्हणजे यांच्या खांदयावर भारताची धुरा आहे.

 ध्यानी - मनात.

 बाळगाव्या - जोपासाव्या.

 गतानुगतिक -  मागील, (मागासलेली) 

 वृत्ती  - स्वभाव.

 अनर्थ - वाईट गोष्ट .

 आहारी न जाता-  त्यात न गुंतता.

 धैर्याने -  हिमतीने

 आचरणात - वर्तनात.

 तत्त्व  - मूल्य, विचार .

 भेदाभेद-  फरक.

 उद्धार - उत्थापन, प्रगती .

 ठाम - पक्की.

महर्षी धोंडो केशव कर्वे हे 'अण्णासाहेब कर्वे' म्हणून  ओळखले जात. समाजसुधारणेच्या कामात ते हिरिरीने भाग घेत. हिंगणे स्त्रीशिक्षण संस्था, एस. एन. डी. टी. महिला विद्यापीठ या संस्था त्यांच्या प्रयत्नांनी नावारूपाला आल्या. त्यांनी केलेल्या समाजसेवेच्या गौरवार्थ आपल्या भारत सरकारने त्यांना 'भारतरत्न' हा किताब दिला.

त्यांचे विचार- 'विदयार्थी व विद्यार्थिनी हे राष्ट्राचे भावी आधारस्तंभ आहेत. त्यांनी दोन गोष्टी सतत ध्यानी बाळगाव्यात. (१) गतानुगतिक वृत्ती टाकून स्वतंत्र विचार करायला त्यांनी शिकावे, मात्र हे लक्षात ठेवले पाहिजे, की आपल्याला स्वतंत्र विचार करण्याचा जसा हक्क आहे तसाच तो इतरांनाही आहे.

(२) मनाचा समतोलपणा राखावा.

केव्हाही मनाचा समतोल ढळता कामा नये. हा तोल सावरणे ही कठीण गोष्ट आहे. हा तोल सांभाळला नाही, म्हणूनच जगात मोठमोठे अनर्थ घडून आलेले आहेत. मनाचा समतोल सांभाळून व भावनांच्या आहारी न जाता, आपल्याला पटलेली गोष्ट धैर्याने आचरणात आणणारी माणसेच आपले हे स्वराज्य टिकवू शकतील.

समतेचे तत्त्व आचरणात आणणारी व भेदाभेद न मानणारी माणसे मोठ्या प्रमाणात झाल्याशिवाय या देशाचा उद्धार होणार नाही, अशी माझी ठाम खात्री आहे.'

आकारिक मूल्यमापन

प्रकट वाचन :

•  उताऱ्याचे प्रकट वाचन व अनुलेखन करा.

२ नामदार गोपाळ कृष्ण गोखले :


समकालीन-  एका काळातील,  त्याच काळातील.

उदारमतवादी - सर्वसमावेशक 

विधायक कार्य - चांगले काम .

चालना - प्रेरणा.

परिचित - ओळखीचे .

ऐक्य - एकता.एकजूट.

पराकोटीला-  श्रेष्ठत्वाला 

त्याग - सोडून देणे.

 सर्वागीण - सर्व बाजूंनी,  सर्व अंगांनी, 

 चारित्र्य - आदर्श आचरण, 

 नैतिक सामर्थ्य - पवित्र शक्ती.

 संकुचित भावना - कोता विचार.

 क्षुद्र - क्षुल्लक, हलका.

 मगरमिठी - घट्ट पकड.

 भाग्योदय -  उज्ज्वल भविष्य.

 उभारणी -  (कार्य) उभे करणे.

नामदार गोपाळ कृष्ण गोखले हे लोकमान्य टिळकांचे समकालीन. उदारमतवादी म्हणून ते प्रसिद्ध होते. विधायक कार्य करणाऱ्या अनेक संस्थांना त्यांनी चालना दिली. त्यांनी 'सर्व्हेंट्स ऑफ इंडिया सोसायटी' नावाची संस्था स्थापन केली. 'भारत सेवक समाज' या नावाने आता ती परिचित आहे. गोपाळ कृष्ण गोखले यांना महात्मा गांधी गुरुस्थानी मानत. त्यांचे विचार- 'आज सर्वांत अधिक गरज असेल, तर ती देशाच्या चारी कोपऱ्यांत ऐक्याची नि देशभक्तीची शिकवण देणाऱ्या कार्यकर्त्यांची. देशप्रेम इतके पराकोटीला पोहोचायला हवे, की केवढाही त्याग करायला लागो तो आनंददायी वाटला पाहिजे. आज त्यागाची अधिक जरूर आहे. बोलणे नको, काम हवे! आपण सारे भाऊ भाऊ आहोत. आपण सारे हिंदी आहोत. धर्म आणि पंथ यांत गुरफटून जाऊ नका. समाजाची सर्वांगीण उन्नती होण्यासाठी राष्ट्रीय चारित्र्यही हवे. आज नैतिक सामर्थ्य कमी होत आहे. संकुचित भावना आणि क्षुद्र विचार यांची मगरमिठी न सोडवू तर भाग्योदय कसा होणार? आपल्या सर्व कामांत शिस्त, स्वार्थत्याग व कुशलता हे गुण प्रामुख्याने हवेत.

राष्ट्राची उभारणी हे सोपे काम नाही. त्यासाठी सबंध आयुष्य दयावे लागते. आपण खत होऊया, भावी पिढ़ी पीक घेईल.'



आकारिक मूल्यमापन

प्रकट वाचन :

•  उताऱ्याचे प्रकट वाचन व अनुलेखन करा.







Comments

Popular posts from this blog

HOME