विरामचिन्हे
मराठी भाषेत विरामचिन्हांचा उपयोग लिखाण अधिक स्पष्ट, सुबोध आणि अर्थपूर्ण करण्यासाठी होतो. खाली मराठीतील प्रमुख विरामचिन्हे आणि त्यांचा उपयोग दिला आहे: विरामचिन्हे योग्य पद्धतीने वापरल्याने लिखाण अधिक स्पष्ट आणि प्रभावी होते.
१. पूर्णविराम (.)
उपयोग: वाक्याच्या शेवटी पूर्णविराम दिला जातो.
उदाहरण: राम शाळेत गेला.
एखाद्या व्यक्तीचे , संस्थेचे किंवा कंपनीचे नाव संक्षिप्त रूपात लिहिण्यासाठी देखील पूर्णविराम वापरतात.
उदा - ना.धो. महानोर - ( नामदेव धोंडो महानोर)
श्री.रा.वि.मं. हायस्कूल जत.-(श्री रामराव विद्यामंदिर हायस्कूल जत.)
२. अल्पविराम (,)
उपयोग: वाक्यात छोटे थांबे दाखवण्यासाठी किंवा एका यादीत अनेक गोष्टी वेगळ्या करण्यासाठी वापरला जातो.
उदा. - मला सफरचंद, संत्री, द्राक्षे आणि केळी आवडतात.
३. प्रश्नचिन्ह (?)
उपयोग: प्रश्न विचारताना वाक्याच्या शेवटी वापरले जाते.
उदाहरण: तुमचे नाव काय आहे?
४. उद्गारवाचक चिन्ह (!)
उपयोग: आश्चर्य, आनंद, दुःख किंवा इतर तीव्र भावना व्यक्त करताना वापरले जाते.
उदाहरण: किती सुंदर दृश्य आहे हे!
५. स्वल्पविराम (,)
उपयोग: मोठ्या वाक्यात छोटे तुकडे वेगळे करण्यासाठी स्वल्पविराम वापरला जातो.
उदाहरण: अभ्यास कर, काम पूर्ण कर, आणि मग आराम कर.
६. अवतरण चिन्ह / उद्धरण चिन्हे (" ")
उपयोग: एखाद्याचे नेमके शब्द उद्धृत करताना वापरली जातात.
उदाहरण: आई म्हणाली, "तू वेळेवर परत ये।"
७. कंस (())
उपयोग: अतिरिक्त किंवा पूरक माहिती देण्यासाठी वापरले जातात.
उदाहरण: तुकाराम (एक महान संत) यांचा अभंग प्रेरणादायी आहे.
८. विरामचिन्हांशिवाय थांबे:
डॅश (—): एखादी गोष्ट ठळकपणे मांडण्यासाठी.
उदाहरण: त्याने सांगितले—"हे खरे आहे."
९. अर्धविराम (;): मोठ्या यादीतील भाग वेगळा करण्यासाठी किंवा वाक्यांचे संबंध दाखवण्यासाठी.
उदाहरण: दिल्लीला उन्हाळा आहे; मुंबईत पाऊस आहे.
विरामचिन्हांची जागा चुकल्याने किंवा वाचताना जागा चुकल्याने अर्थ कसा बदलतो ते पहा..
रंगीचे गण्याला पत्र
11 AUGAIST 2020
प्रिय प्राणनाथ,
तुमची आठवण येते. माझ्या मैत्रिणीला मुलगा झाला. आजीला दम्याचा त्रास व्हायला लागला आहे. कुत्रीला आज चार सुरेख, गोड गोड पिले झाली. मामांजीना सकाळी सकाळी दाडी करताना ब्लेड लागले. वहिनीला डिलीव्हरीसाठी अॅडमिट केलंय दवाखान्यात. बकरीला नाविलाजाने खटकाला विकले. आत्यांना नमस्कार.
तुमची लाडकी बायको,
रंगी.
विरामचिन्हे चुकवून..........
प्रिय प्राणनाथ,
तुमची आठवण येते माझ्या मैत्रिणीला. मुलगा झाला आजीला. दम्याचा त्रास व्हायला लागला आहे कुत्रीला. आज चार सुरेख, गोड गोड पिले झाली मामांजीना. सकाळी सकाळी दाडी करताना ब्लेड लागले वहिनीला. डिलीव्हरीसाठी अॅडमिट केलंय दवाखान्यात बकरीला. नाविलाजाने खटकाला विकले आत्यांना. नमस्कार.
तुमची बायको
Comments
Post a Comment