७मराठी २१. संतवाणी

 २१. संतवाणी

                   -     संत नरहरी सोनार


• अभंगांचा आशय :

(१) पंढरपूरवारीला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या आनंदाचे वर्णन या अभंगात केले आहे. 

शब्दार्थ

 दैवत -  देवता, परमेश्वर
 व्रतनेमे - नित्यनियमाने , व्रतस्थ वृत्तीने.
 महापर्वे - महा उत्सव.
गजर -  घोष.
पताका - (इथे अर्थ) झेंडे. 
भार - (इथे अर्थ) दाटी. 
मुखी - तोंडाने. 
नामामृत - श्रीविठ्ठलाचे नाव हेच अमृत.
काला - एकत्र करणे, मिश्रण.
 बिंबला-  ठसला. 

अभंगांचा भावार्थ

१.  संत नरहरी सोनार म्हणतात पंढरीच्या तीर्थक्षेत्री श्रीविठ्ठल माझे आराध्य दैवत आहे. सर्व वारकरी नित्यनेमाने व व्रतस्थपणे श्रीविठ्ठलाचे दर्शन घेतात. ॥१॥ आषाढी व कार्तिकी एकादशीला महान उत्सवाचे पर्व सुरू असते. वारकरी तेथे भजनाचा घोष करीत असतात. ॥२॥

आषाढी-कार्तिकीला महान साधुसंत (भक्तगण) दिंड्या-पताकांची दाटी करतात नि मुखाने श्रीविठ्ठलाचे
अमृतमय नाव उच्चारतात. ||३|| 

या दिवशी जणू आनंदाचा गोपाळकाला होतो. सर्व भक्तगण तल्लीन होतात. संत नरहरी म्हणतात, हा पवित्र सोहळा माझ्या मनात कायम ठसला आहे. ॥४॥





















 


                    -  संत कान्होपात्रा 








संत कान्होपात्रा यांच्या विषयी माहिती 

सामान्य कुटुंबामध्ये जन्माला आलेल्या आणि विठ्ठलभक्तीपर अभंगरचनेने संतपदाचा बहुमान लाभलेल्या संत कान्होपात्रा यांचे दुर्मिळ ओवीबद्ध चरित्र  उपलब्ध झाले आहे. मंगळवेढा येथील बसविलग यांनी २३८ वर्षांपूर्वी ३६ ओव्यांमध्ये कान्होपात्रा यांचे आत्मचरित्र मांडले आहे.
जुन्या हस्तलिखितांचे अभ्यासक आणि संग्राहक वा. ल. मंजूळ यांना मंगळवेढा येथे कान्होपात्रा यांचे हे ओवीबद्ध चरित्र सापडले आहे. तेथील धार्मिक ग्रंथांचे संकलन करणाऱ्या एका व्यक्तीकडे हे छोटेखानी बाड उपलब्ध झाले आहे. मात्र, ज्यांच्याकडे हे चरित्र आढळून आले त्यांनी आपले नाव प्रसिद्ध करू नये, अशी इच्छा मंजूळ यांच्याकडे प्रदर्शित केली आहे. महाराष्ट्राच्या संत परंपरेतील मांदियाळीमध्ये कान्होपात्रा या महत्त्वाच्या संत असून ‘सकल संत गाथे’ मध्ये कान्होपात्रा यांचे २३ अभंग आहेत. बसविलग यांची काव्यरचना हे चरित्र शके १६९९ म्हणजेच १७७७ मधील आहे. पूर्वी मंगळवेढा या भागाला मंगोडा असे म्हटले जात असे. केवळ ३६ ओव्यांमध्ये कान्होपात्रा यांचे चरित्र काव्यबद्ध केले आहे. हे काव्य देवनागरी लिपीमध्ये असून सुमारे २५० वर्षांपूर्वीच्या मराठी भाषेचे वैभव त्यातून दिसते, अशी माहिती वा. ल. मंजूळ यांनी दिली.
सामान्य कुटुंबामध्ये जन्माला आलेली कान्होपात्रा यांच्या सौंदर्याचे वर्णन सुरुवातीच्या ओवीमध्ये आहे. त्यांनी सेवन केलेल्या विडय़ाचा रस गळ्यातून जाताना दिसे. नृत्यकला आणि गांधर्वगायनामध्ये पारंगत कान्होपात्रा मातेसह पंढरपूर येथे विठ्ठलाच्या दर्शनास आल्या. भीमेच्या पात्रामध्ये त्यांना कान्हो म्हणजेच कृष्णाची आठवण आली. कृष्णाचेच रूप असल्याने कान्होपात्रा यांनी विठ्ठलाची भक्ती केली. बिदरच्या बादशहाने मागणी घातल्यानंतर देवाच्या पायी मस्तक ठेवून कान्होपात्रा गतप्राण झाली. बडव्यांनी मंदिराच्या एका कोपऱ्यामध्ये कान्होपात्रा यांची समाधी केली आणि या समाधीवर तरटाचे झाड लावले. या झाडाची पाने सेवन केली तर यात्रा पूर्ण होते अशी वारकरी आणि भाविकांची श्रद्धा आहे. तर, काही भाविक या झाडाची पाने आपल्या संग्रही ठेवण्यासाठी घेऊन जातात. मंगळवेढा येथे एका कुटुंबाच्या पडवीमध्ये कान्होपात्रा यांची दीड फूट उंचीची मूर्ती होती. पाच वर्षांपूर्वी रखुमाईसारखी कमरेवर हात ठेवलेली नवीन दोन फूट उंचीची मूर्ती बसविण्यात आली आहे. संत कान्होपात्रा यांच्या मंदिरासाठी प्रयत्न सुरू झाले असल्याचेही वा. ल. मंजूळ यांनी सांगितले.

अभंगाचा आशय :-

पंढरपूर माझे माहेर आहे. पांडुरंगाच्या दर्शनाने माझ्या मनातील दुःख दूर होते, असा भाव संत कान्होपात्रा यांनी या अभंगात व्यक्त केला आहे.


शब्दार्थ

सुखे - सुखाने.
नांदू -  संसार करू.
 भीमातीरी  - भीमा नदीच्या काठावर .
 माय - आई.
  हरे - निघून जातो.
   ताप-  दुःख, विवंचना. 
   दरुशनें- दर्शनाने.
   निवारिली - नाहीशी केली. 
   व्यथा- दुःख.
   अंतरीची - मनातली. 
   कैशी -  कशी.
   धाली -  समाधान पावली, आनंदली.

विशेष संज्ञा --

(१) पंढरी (पंढरपूर) -  सोलापूर जिल्ह्यातील  कुर्डुवाडीनजीक असलेले श्रीविठ्ठलांचे पुण्य तीर्थक्षेत्र. 
(२) श्रीहरी -  (श्रीकृष्ण ) इथे श्रीविठ्ठल.
(३) वारकरी - श्रीविठ्ठलांचे भक्तगण.
(४) आषाढी कार्तिकी - आषाढ व कार्तिक या महिन्यांच्या एकादशीला पंढरपूरची वारी करतात तेव्हा एकादशी पंढरपूरमध्ये येऊन विठ्ठलाचे दर्शन करतात. 
(५) भजन -  अभंग-ओव्यांचे गायन. आरती.
(६) गोपाळकाला - श्रीकृष्णरूपी विठ्ठलाला भेटण्यासाठी आलेला वारकऱ्यांचा मेळा.
(७) भीमा- पंढरपूर तीर्थक्षेत्री वाहणारी चंद्रभागा नदी.
(८) विटेवरी - श्रीविठ्ठलाची मूर्ती विटेवर उभी आहे.





अभंगांचा भावार्थ

 संत कान्होपात्रा म्हणतात पंढरपूर हे माझे माहेर आहे. चंद्रभागेच्या काठी मी सुखाने नांदते आहे. ॥१॥

पंढरीला माझे आईवडील आहेत. त्यांच्या दर्शनाने माझी सगळी विवंचना संपून जाते. ॥२॥ 

श्रीविठ्ठलाने माझी चिंता, वेदना, अस्वस्थता घालवून दिली आहे. माझ्या मनातले दुःख निवारलेआहे. ॥३॥ 

माझी विठुमाउली कशी विटेवर शोभून दिसते आहे तिचे हे रूप पाहून संत कान्होपात्रा आनंदली आहे समाधान पावली आहे. ॥४॥ 



 संत कान्होपात्रा, गणिकेच्या कुळात जन्माला येऊन, विठ्ठलभक्तीची आस मनात बाळगणाऱ्या एका मुलीची कथा . मंगळवेढा संस्थानातल्या श्यामा नायकिणीची  रुपसुंदर कन्या विठ्ठलाच्या नादी लागली आणि आपलं विहित कर्तव्य विसरली. पंढरीला पोहोचून तिने पहिल्यांदा विठ्ठलाचं सावळं रुप पाहिलं आणि मग ती तिथून माघारी परतलीच नाही. लोकांनी नावं ठेवली तरीही नाही. राजाने बोलावणं धाडलं तरीही नाही. तिला बळजोरीने धरून नेणारे हट्टालाच पेटले तेव्हा तिही हट्टाला पेटली आणि कुणी तिला तिच्या देवासमोरून नेण्याआधीच त्याच्या चरणी आपले प्राण सोडले. इतिहासात मग ती संत कान्होपात्रा म्हणून ओळखली गेली.
      कथेचा गाभा इतकाच. इतिहासाच्या पुस्तकांमध्ये तिचे संदर्भ कुठेकुठे विखुरलेले आणि सोबतीला तिचे काही आर्त अभंग एवढ्यावरून कान्होपात्रेचं चित्र उभं करायचं. '
      
    या कथेतली रुपगर्विता   कान्होपात्रा.  तिला विठ्ठलाची ओढ लागेपर्यंत अगदी सर्वसामान्य मुलीसारखीच आहे. तिला गणिकेचा धर्म पाळायचा नाही. पण यौवनात येताना आपल्या सौदर्यांचा पुरेसा गर्व तिला आहेच. हे दाखवण्यासाठी प्रयोगात वापरलेल्या एका प्रसंगात कान्होपात्रा बनलेल्या पाचही जणी पाठमोऱ्या वर्तुळात बसून साजशृंगार करतात. तेव्हा तर आपल्याच रुपाची छबी अनेक आरशात पहात बसलेली तरुण मुलगी त्यात दिसते. मंगळवेढ्यात ज्ञानेश्वरांच्या दर्शनाने आपलं 'मी' पण विसरून लेकराच्या ओढीने कान्होपात्रा धावत जाते. 'या ओढीचं रुपांतर विठ्ठलभक्तीत कधी झालं, आणि पंढरपूरी जाऊन विठोबाला पाहिल्यानंतर हेच आपल्या जगण्याचं कारण असल्याचं तिला कसं उमगलं हे गूढ तिलाही उकलत नाही. पण एकदा ते गवसल्यावर मात्र ती कोणत्याही परिस्थितीत माघारी फिरत नाही. तिची हीच इच्छाशक्ती आणि जिद्द कान्होपात्राच्या अभंगातून व्यक्त होती 











Comments

Popular posts from this blog

HOME