७मराठी बाली बेट
११ बाली बेट - पु. ल. देशपांडे
(पाठ्यपुस्तक पान क्र. ४९)
बाली बेट (इंडोनेशिया) |
ऑनलाईन टेस्ट
पाठाचा परिचय : - इंडोनेशिया या देशातील बाली बेटाचे प्रवास वर्णन व तेथील निसर्गसृष्टीचे मनोहारी वर्णन पु. ल. देशपांडे यांनी ' बाली बेट' या पाठात केले आहे.
मूल्य/शिकवण/संदेश :- परदेशातील संस्कृतीचा परिचय व्हावा व 'वसुधैव कुटुंबकम्' ही भावना विद्यार्थ्यांना यावी, हा उद्देश या पाठामागे आहे. पर्यटन , संस्कृती आणि सेवाभावना यांची ओळख करून दिली आहे.
शब्दार्थ :-
रत्नजडीत - रत्नांनी जडवलेले, सजवलेले. पुंजका- गुच्छ, पुंज. अवशेष- शिल्लक राहिलेले भाग. अभंग - न भंगलेला, न मोडलेला. पर्यटक - पर्यटन करणारे लोक, प्रवासी. उभयतांचे - दोघांचे, श्री व सौ. यांचे. किर्र- दाट. काटीत – कापीत, झापांची - झावळयांची. हौ वंड ऽफुल्ल ! - किती सुंदर. रहस्यमय - गुपित असलेली, गूढ. टुमदार - सुबक .चपल - चपळ, उत्साही , उत्साहाने आणि चटकन शारीरिक हालचाल करणारे. यत्किंचित - जरासा. ताण- तणाव. अंधुक - अस्पष्ट. जन - लोक. मुक्त - मोकळ्या. रम्य - छान, सुंदर. परिसमाप्ती - संपूर्ण शेवट. अश्राप - भोळीभाबडी, श्रद्धाळू. आकर्षण - तीव्र ओढ. निष्पाप - नितळ मन, प्रांजळ. अज्ञात - माहीत नसलेले. अपरिचित - अनोळखी. मिस्किलपणा - हट्टेखोरपणा. टवटवीत - प्रसन्न. समुदाय - समूह, योजक. डुलक्या - अर्धवट झोपेत मानेचे झटके. मंगल पाठ - पवित्र स्तोत्र. सहधर्मचारिणीसमवेत - पत्नीसोबत.
टिपा :-
(१) बेट - सर्व बाजूंनी पाण्याने वेढलेला समुद्रातील भूभाग (जमीन).
(२) इंडोनेशिया - देशाचे नाव . भारताच्या दक्षिणेला असलेला समुद्रातील बेटांचा समूह.
(३) कंठा - गळ्यात घालायचे एक आभूषण (दागिना)
(४) पाचू - हिरव्या रंगाचे एक रत्न.
(५) कंठमणी - कंठा या दागिन्यातील मध्यवर्ती मुख्य मणी.
(६) गोवा - भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरचे एक निसर्गरम्य राज्य.
(७) ललित कला - सृजनशील (लालित्य असलेल्या) कला.
(८) नृत्य-गायन ,शिल्प चित्रकला - नाचणे, गाणे, मूर्ती कोरणे व चित्र काढण्याची कला.
(९) गोफ - रेशमी धाग्यांनी विणलेली बहुपेडी माळ.
(१०) भारतीय संस्कृती - भारतीय समाजरचना ज्या मूल्यांच्या आधारे निर्माण झाली आहे ती परंपरागत मूल्यसंस्था
(११) मोती - एक प्रकारचे रत्न (शिंपल्यातील खडा).
(१२) जकार्ता - इंडोनेशिया देशाच्या राजधानीचे ठिकाण.
(१३) देनपसार - बाली या बेटावरचे एक गाव.
(१४) स्वर्ग - एक काल्पनिक नंदनवन, इंद्रलोक.
(१५) पर्यटन खाते - देशातील पर्यटन स्थळांची देखभाल करणारी सरकारी यंत्रणा.
(१६) माडांच्या राया - नारळाच्या झाडांचा समूह.
(१७) अमेरिकन - अमेरिका या देशातील नागरिक..
(१८) बीच - beach , समुद्रकिनारा.
(१९) घोरणे - गाढ झोपेत असताना नाकातोंडाद्वारे येणारा आवाज.
(२०) कोळी - समुद्रकिनाऱ्यावरील मासेमारी व्यवसाय करणारी एक जमात.
(२१) चौघडा - एक कातडी वाद्य .
(२२) 'प्रियेऽ पहा, रात्रीचा समय सरुनि येत उषःकाल हा !' - 'संगीत सौभद्र' या जुन्या नाटकातील श्रीकृष्णाच्या तोंडचे एक पद (पदरचना , पदपंक्ती)
(२३)अण्णा किर्लोस्कर -सुप्रसिद्ध मराठी संगीत नाटककार.
(२४) गुर्लहोसूर - महाराष्ट्र व कर्नाटक राज्यांच्या सीमेवर वसलेले सांगली जिल्ह्यामधील एक गाव (किर्लोस्करांची कर्मभूमी).
(२५) नांदी – पूर्वीच्या संगीत नाटकाच्या सुरुवातीला नटेश्वराची आळवणी करण्याचे पद.
(२६) डच - हॉलंड देशातील रहिवासी.
(२७) म्युझियम पीस - सरकारी कलादालनाचा तुकडा.
(२८) माडापोफळीच्या राया - नारळाच्या व सुपारीच्या झाडांचा समूह.
(२९) शिशुवर्ग - पूर्व प्राथमिक शिक्षणाचे वर्ग
(३०) भाट - राजगायक, राजाच्या किंवा संस्थानिकांच्या पदरी असलेले गायक.
(३१) शापसंभ्रम - जुने संगीत नाटक.
(३२) पुंडरीक- 'शापसंभ्रम' या नाटकातील नायक.
(३३) मजवरि तरुण कुसुमरेणु वरुनि ढाळिती - शापसंभ्रम' या नाटकातील नायकाच्या तोंडी असलेले पद
वाक्प्रचार व त्यांचे अर्थ
(१) चूर होणे - बारीक कण होऊन विखरणे, फुटून जाणे, हरवून जाणे.
(२) तत्पर असणे- लगेच तयार असणे.
(३) स्वागत करणे - सन्मानाने बोलावणे.
(४) पर्वा न करणे - काळजी न करणे, तमा न बाळगणे.
(५) प्रदर्शन मांडणे - दाखवणे, जाहीर करणे.
(६) जीभ चाचरणे - खरे बोलताना अडखळणे
(७) वारे वाहू लागणे - (विशेष गोष्टींचे) आगमन होणे.
(८) डोळे मिचकावणे - खोडसाळपणे नजरेने इशारा करणे.
(९) उणीव असणे - कमतरता असणे.
(१०) पुरते झपाटणे -च्या प्रभावाखाली येणे.
संकलित मूल्यमापन
१. प्रश्नोत्तरे
प्रश्न १. पाठ्यपुस्तक पृष्ठ क्र. ४५ वरील उतारा वाचून पुढील सुचवलेल्या कृती करा :
( इंडोनेशिया हा ..................................बाली बेट आहे. )
(अ) लघुत्तरी प्रश्न .
(१) बाली बेटावरील विविध ललितकला कोणत्या ?
उत्तर :- बेटावरील विविध ललितकला- नृत्य- गायन ,चित्र शिल्प
(२) बाली बेटाचे वर्णन करण्यात लेखकांनी वापरलेले शब्द :
उत्तर :-बाली बेटाचे वर्णन करण्यासाठी लेखकांनी वापरलेले शब्द - रत्नजडित कंठ्यातील कंठमणी
(३) बाली बेटावरील कलांसाठी लेखकांनी वापरलेले शब्द
उत्तर :-बाली बेटावरील कलांसाठी लेखकांनी वापरलेले शब्द - ललितकलांचा रंगीबेरंगी गोफ
(४)इंडोनेशियाला दिलेल्या उपमा
उत्तर :- (i) समुद्रातील रत्नजडित कंठा (ii) पाचूच्या बेटांचा पुंजका
(५) कंठ्यातील कंठमणी
उत्तर :-बाली बेट
(६) बाली बेट ..................राज्याएवढे आहे.
उत्तर :-गोवा
(७ ) बाली बेटावर याचे अवशेष आहेत.
उत्तर :-भारतीय संस्कृतीचे
प्रश्न २. पुढील कल्पना स्पष्ट करा :
(१) बाल बेट म्हणजे रत्नजडित कंठ्यातील कंठमणी आहे.
उत्तर: एखादा रत्नजडित कंठा फेकून दिल्यावर त्यातील मणी सभोवार विखरावेत तसा पाचूच्या बेटांचा पुंजका म्हणजे इंडोनेशिया देश आहे. त्या कंठ्याआतील महत्त्वाचा मणी हा कंठमणी असतो, तसे बाली बेट आहे. म्हणून बाली बेट हे रत्नजडित कंठ्यातील कंठमणी आहे, असे लेखक म्हणतात.
(२) बाली हा दुरिस्टांचा स्वर्ग आहे.
उत्तर : बालीचे पर्यटन खाते अतिशय तत्पर आहे. इथले अधिकारी पर्यटकांचे मनःपूर्वक स्वागत करतात. बालीतले कर्मचारी व अधिकारी पर्यटकांना उत्साही ठेवतात. म्हणून बाली हा दुरिस्टांचा स्वर्ग आहे, असे लेखक म्हणतात.
(३) या बेटावर घड्याळ नावाची गोष्ट नाही.
उत्तर :-लेखक अगदी अपरात्री 'हॉटेल सागर बीच मध्ये दाखल झाले, तरीही हॉटेलातील स्वागत विभागातले तरुण चेहऱ्यावरचा जागरणाचा जराही ताण न दाखवता स्वागत करीत होते. त्यावरून लेखक म्हणतात की या बेटावर घड्याळ नावाची गोष्ट नाही.
(४) बाली बेटावरील बाग एकत्र कुटुंबासारखी वाटत होती.
उत्तर : सागर बीच हॉटेलची समुद्रकिनाऱ्यालगत एक गर्द बाग होती. त्यात माडापोफळीच्या राया होत्या. फुलांनी बहरलेली रोपटी होती. फुलबाग भल्या पहाटेही टवटवीत होती. फुले मिस्किलपणे पाहुण्यांना न्याहाळत होती. वृद्ध वृक्षांचा समुदाय डुलक्या घेत होता. या सर्व कारणांमुळे बाली बेटावरील ही बाग मुलामाणसांनी, लेकीसुनांनी भरलेल्या नांदत्या एकत्र कुटुंबासारखी लेखकांना वाटत होती.
• प्रश्न ३. पुढील मुद्दयांच्या आधारे बाली बेटाची माहिती लिहा :
स्थान , या बेटाचे बदलते रूप, घरे व हॉटेल्स, बाली बेट, निसर्गसौंदर्य , टुरिस्ट खात्याची तत्परता.
उत्तर : इंडोनेशियातील बेटांच्या समूहात बाली बेट रत्नजडित कंठ्यातील कंठमण्यासारखे शोभते. इथली घरे व हॉटल्स निसर्गरम्य परिसरांनी वेढली आहेत. वळणदार रस्त्यांभोवती माडांच्या राया व त्यामधून झापांची छपरे असलेली घरे आहेत. इथले पर्यटन खाते अतिशय तत्पर आहे. त्यामधील तरुण अधिकारी पाहुण्यांचे मनःपूर्वक स्वागत करतात.
इथल्या हॉटेलला वेढून असलेला निसर्ग रम्य व मनोहारी आहे. समुद्रकिनारी हॉटेललगत गर्द राई आहे. माडापोफळीच्या राया आहेत. ताज्या टवटवीत फुलांनी बहरलेली रोपटी आहेत. हॉटेलची बाग नांदत्या एकत्र कुटुंब आहे.
या बेटावर आता सुधारलेल्या दुनियेचे वारे वाहू लागले आहेत. डोक्यावर विमाने घरघरू लागली आहेत. रेडिओ असलेल्या जगाशी त्यांना जखडले आहे. वर्तमानपत्रेही ज्ञानाबरोबर या बेटाची माहिती दूरवर पोहोचवत असतील. आता या बेटाचे स्वरूप बदलत चालले आहे.
प्रश्न ४. पुढील ओळींचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा :
(१) पहाटेला स्वप्नांची परिसमाप्ती होते.
उत्तर : रात्री झोपेत स्वप्न पडते. स्वप्नांची दुनिया अद्भुत व रम्य असते. पहाटे जाग आल्यावर ही स्वप्नांची दुनिया निघून जाते. म्हणजेच पहाटेला स्वप्नांची पूर्ण समाप्ती होते.
(२) पाच मिनिटांतच बाली बेटाने माझे घोरणे ऐकायला सुरुवात केली.
उत्तर: हॉटेलचा स्वागतकक्ष अतिशय तत्पर व उत्साही होता. रात्री-अपरात्री लेखक हॉटेलमध्ये आले ; तरीही त्यांचे स्वागत करताना त्या तरुणांच्या चेहऱ्यावर जागरणाचा जरासुद्धा ताण नव्हता. त्यांनी पटापट प्रवाशांना नेमलेल्या खोल्या दाखवल्या. लेखकांनी त्या खोलीत प्रवेश करताच ते इतके गाढ झोपी गेले की ते शांतपणे घोरू लागले.
(३) वेलींचेही अंग धुणे झाले होते.
उत्तर : सागर बीच हॉटेलभवतालची बाग पहाटेही खूप ताजी टवटवीत होती. फुलांनी बहरलेली रोपटी पहाटे पाहुण्यांकडे मिस्किलपणे डोळे मिचकावीत पाहत होती. पहाटेच्या दवामुळे वेली ओल्या झाल्या होत्या. जणू काही वेलींची अंघोळ झाली होती. त्यांचे अंग धुणे झाले होते.
(४) त्या भाटांची उणीव मी माझ्या गाण्याने भरून काढीत होतो.
उत्तर : पूर्वी राजदरबारी गायक असत. ते गाऊन राजाचे मनोरंजन करीत. या गायकांना 'भाट' म्हटले जाई. पक्षी म्हणजे सृष्टीचे भाट होत. पहाटे पक्ष्यांची किलबिल लेखकांना ऐकू आली नाही, म्हणून तेच गाऊ लागले. पक्षीरूपी भाटांची कमतरता लेखकांनी स्वतःच्या गाण्याने भरून काढली.
मुक्तोत्तरी प्रश्न
(१) बाली बेटावर पक्षी का नसतील ?
उत्तर : बाली बेट निसर्गरम्य आहे. पण तिथे सृष्टीचे भाट असलेले पक्षी लेखकांना दिसले नाहीत. बदलत्या जागतिक यांत्रिकीकरणाचा प्रभाव बालीसारख्या सुंदर स्थानावर पडत आहे. पक्ष्यांना हवा असलेला मोकळा अवकाश मिळेनासा झाला आहे. त्यामुळे कदाचित पक्षी तिथे नसावेत. लेखकांनी मात्र माझ्या आवाजाला घाबरून ते पळून गेले असतील!' असे विनोदी वक्तव्य केले आहे.परंतु यांत्रिकीकरणाच्या जोरदार रेट्यामुळे येथे पक्षी फिरकत नाहीत, हे खरे!
(२) आज शहरात चिमण्या का दिसत नाहीत?
उत्तर : पूर्वी अंगणे असायची व त्या अंगणांमध्ये दाणे टिपायला चिमण्या गोळा व्हायच्या. आता शहरांमध्ये छोटी कौलारू व अंगण असलेली घरे राहिली नाहीत. उंच उंच इमारतींमुळे झाडी कमी झाली. त्यामुळे चिमण्या शहरांकडे फिरकेनाशा झाल्या. तसेच उंचच उंच इमारतींमुळे शहरात इलेक्ट्रिक तारा, टी. व्ही. अॅन्टिना व मोबाइल टॉवरचे प्रमाण खूप वाढले. यांमुळे चिमण्यांना त्रास होतो. मोकळी मैदाने कमी झाली. ध्वदूषणही वाढले. अशा विविध कारणांमुळे आणि शहरांत वाढलेल्या यांत्रिकीकरणामुळे शहरात चिमण्या दिसत नाहीत.
भाषाभ्यास व व्याकरण
प्रश्न १. पुढील शब्दांचा अर्थ समजून घ्या :
(१) टुरिस्टांचा स्वर्ग-
उत्तर : स्वर्ग ही नंदनवनांची काल्पनिक सृष्टी आहे. स्वर्गात सर्व सुखे आहेत, असा समज आहे. बाली बेट हे प्रवासी माणसांना अत्यंत सुखकारक असल्यामुळे त्यास 'टुरिस्टांचा स्वर्ग' असे म्हटले आहे.
(२) कीर्र जंगल.
उत्तर : गच्च झाडी असलेले जंगल, धनदाट जंगल.
(३) अश्राप माणसे.
उत्तर : अतिशय भोळीभाबडी, मनाने निर्मळ असलेली माणसे, पापभीरू माणसे.
(४) गाणारे भाट.
उत्तर : राजाचे मनोरंजन करणारे दरबारी गायक.
(५) तंबूतला सिनेमा-
उत्तर : गावोगावी तंबू ठोकून व कनाती लावून त्यामध्ये सिनेमा दाखवणे, याला 'टुरिंग टॉकीज' असेही नाव आहे.
(६) झोपेतल्या डुलक्या-
उत्तर : झोप अनावर झाली की बसल्या बसल्या मान डावी-उजवीकडे, खाली-वर जाऊन झटके लागतातत्याने झोप चाळवते.
२. पुढील शब्दांचे प्रत्येकी दोन भिन्न अर्थ लिहा
(१) अभंग (अ) न भंगणारे (ब) ओव्या असलेला एक मराठी छंदप्रकार. -
(२) बोट (अ) हाताचे बोट (शरीराचा अवयव) (ब) जहाज (होडी).
प्रश्न ३. पुढील शब्दांचा वाक्यांत उपयोग करा :
(१) उभयता - दादा व वहिनी उभयता गावी गेले.
(२) यत्किंचितही - राजू उतारावरून घसरला; पण त्याला यत्किंचितही लागले नाही.
(३) चौघडा - ताईच्या लग्नात सनई-चौघडा वाजत होता.
(४) चित्रविचित्र - जंगलात चित्रविचित्र पक्षी होते.
प्रश्न ४. पुढील शब्दांचे प्रत्येकी दोन समानार्थी कंसात दिलेल्या शब्दांतून शोधून लिहा :
माळ, अनादर, झुंजूमुंजू ,गर्द, जिव्हा, हार, दाट,
उषःकाल, अवमान, रसना
(१) कंठा (२) अपमान (३) पहाट (४) जीभ (५) किर्र
उत्तर:-
(१) कंठा = माळ, हार
(२) अपमान = अनादर, अवमान
(३) पहाट = झुंजूमुंजू, उषःकाल
(४) जीभ - = जिव्हा, रसना
(4) किर्र = गर्द, दाट.
प्रश्न ५. विरुद्धार्थी शब्द लिहा:
(1) अपमान X सन्मान (2) दुष्ट X सुष्ट
(3) लवकर X उशिरा (4) स्वप्न X सत्य
(5) बाहेर X आत (6) अंधुक X स्पष्ट
(7) चांगला X वाईट (8) निष्पाप X पापी (9) अज्ञात X ज्ञात
प्रश्न ६. पुढील शब्दांचे लिंग बदला.
तरुण , पक्षी , जावई , तरुण, वृद्ध , चिमुकला
उत्तर :- तरुणी, पक्षिणी ,सून, तरुणी,वृद्धा ,चिमुकली
केवलप्रयोगी अव्यय
पुढील वाक्यांतील अधोरेखित / ठळक शब्दांकडे नीट लक्ष दया : (१) शाबास! छान चित्र काढलेस तू.
(२) बापरे! केवढा मोठा साप.
(३) अहाहा! किती सुंदर दृश्य आहे.
(४) अरेरे! ठेच लागली त्याला.
• आपल्या मनात दाटून आलेल्या भावना आपण एखादया उद्गारावाटे उत्स्फूर्त व्यक्त करतो.
• वरील वाक्यांतील अधोरेखित ठळक शब्द हे उद्गार आहेत.
• 'शाबास, बापरे, अहाहा, अरेरे' या उद्गारवाचक शब्दांना केवलप्रयोगी अव्यये म्हणतात.
• आणखी काही केवलप्रयोगी अव्यये : वाहवा, ओहो, अगाई, हाय, छान, ठीक, अच्छा, बराय, छे, अंह, छट, थु, हुडुत, शी, अरे, अहो, गप, चिडीचूप ,चूप , अव्वा, आय्यो, अगं, इत्यादी.
२. लेखन विभाग
(१) जाहिरात वाचा. त्या आधारे विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा :
प्रश्न : (१) सहलीचे आयोजक कोण आहेत ?
उत्तर : 'लक्ष्मी टूर्स' हे सहलीचे आयोजक आहेत.
(२) सहलीची वैशिष्ट्ये कोणती ?
उत्तर: सहलीची वैशिष्ट्ये : (१) उन्हाळी सुट्टीत खास परदेश सहल. (२) उन्हाळी सुट्टीचा आनंद लुटा. (३) २८ फेब्रुवारी नोंदणी करणाऱ्याला प्रवासभाडयात ५०% सवलत व भेटवस्तूंची खैरात.
(३) सहलीला जाण्यासाठी नोंदणी करणाऱ्याला सवलत का दिली असावी, असे तुम्हांला वाटते ?
उत्तर : भरपूर व जलद नोंदणी व्हावी, खूप प्रवासी मिळावेत म्हणून सहलीला जाण्यासाठी नोंदणी करणाऱ्याला सवलत दिली असावी.
(४) प्रस्तुत जाहिरात विश्वसनीय आहे, असे तुम्हांला वाटते का? जाहिरातीतील कोणती गोष्ट तुम्हांला अविश्वसनीय वाटते?
उत्तर: प्रस्तुत जाहिरात विश्वसनीय नाही, असे वाटते. जाहिरातीत परदेश सहल म्हटले आहे व चित्र बसचे दिले आहे. तसेच दोन महिने आधी नोंदणी का ते कळत नाही. या गोष्टी अविश्वसनीय वाटतात.
(२) प्रेक्षणीय स्थळाच्या संदर्भात पुढे काही मुद्दे दिले आहेत. त्यांच्या आधारे तुम्ही भेट दिलेल्या एखादया प्रेक्षणीय स्थळाचे वर्णन लिहा : निसर्गसौंदर्य -परिसर ,आख्यायिका, कथा, लोकपरंपरा ,वैशिष्ट्ये,भौगोलिक, ऐतिहासिक ,-स्थळ
प्रेक्षणीय स्थळ
नमुना उत्तर:- एकदा मी माझ्या आईवडिलांबरोबर महाबळेश्वर या पर्यटनस्थळाला भेट दिली. डिसेंबर महिन्यात शनिवारी सकाळी आम्ही बसने निघालो. सकाळी अकराला पोहोचलो. चहा-नाष्टा घेऊन आम्ही फेरफटका मारायला बाहेर पडलो.सगळीकडे हिरवेगार दिसत होते. महाबळेश्वरवरचे वेगवेगळे पॉइंटस् पाहत आम्ही हिंडत होतो. इतरही पर्यटक हिंडत होते. काहीजण घोडेस्वारीचा आनंद लुटत होते. 'इको' पॉइंटवर मी वेगवेगळे आवाज काढण्याचा आनंद लुटला. तेथे खूप माकडे होती.
आम्ही दुपारचे जेवण घेतले. थोडी विश्रांती घेऊन संध्याकाळी ४ च्या सुमारास 'सनसेट पॉइंटकडे निघालो. तेथे खूप गर्दी होती. मावळणारे सूर्यबिंब लाल-लाल व खूप मोठे दिसत होते. आम्ही तेथून परतलो. रात्री थंडी पडली होती. उबदार पांघरुणात मी झोपी गेलो.
पहाटे जाग आली. अंघोळ, नाष्टा करून आम्ही भल्या सकाळी 'सनराईज पॉइंट' पाहिला. नंतर तलावावर पोहोचलो. तेथे बोटिंगचा आनंद लुटला. महाबळीच्या मंदिराला भेट देऊन आम्ही बाजारात फेरफटका मारला. थोडी खरेदी केली आणि प्रसन्न मनाने महाबळेश्वरचा व तेथील थंडीचा निरोप घेतला.
३. तोंडी परीक्षा
प्रश्न. पुढील प्रश्नाचे उत्तर सांगा.
भारताच्या सीमेलगत असलेल्या देशांची नावे सांगा.
आकारिक मूल्यमापन
१. चर्चा:
• पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक ५४ वरील चित्रांचे निरीक्षण करा. चित्रांतील व्यक्ती कोणत्या चुका करीत त्या चुकांचा परिणाम काय होऊ शकतो, यांवर गटात चर्चा करा. चर्चेतील मुद्द्यांचे वर्गात सादरीकरण करा.
२. प्रकट वाचन / अनुलेखन :
●• पुढील फलकांचे प्रकटवाचन व अनुलेखन करा :
वाहतुकीचे नियम पाळा,
असा प्रवास धोकादायक,
रस्त्यांवरचे अपघात टाळा.
जिवावर बेतल्यास हानिकारक.
वाहनांची क्षमता जाणून घ्या, सुरक्षित प्रवासाची हमी घ्या.
हसा, खेळा, पण शिस्त पाळा, रस्त्यावर खेळण्याचा मोह टाळा.
३. कृती :
• पुढील पाट्यांवर वाहतूक सुरक्षिततेच्या संदर्भात घोषवाक्ये तयार करून लिहा :
रस्ता जपून ओलांडा.
झेब्रा क्रॉसिंगवरच रस्ता ओलांडा.
४. उपक्रम :
(१) एखाद्या ठिकाणी सहलीला जाण्यापूर्वी कोणकोणत्या गोष्टींची पूर्वतयारी करणे आवश्यक असते, तुम्हांला वाटते? त्या सर्व गोष्टींची यादी तयार करा.
(२) पु.ल. देशपांडे यांनी लिहिलेली पुस्तके मिळवा. वाचा.
५. प्रकल्प :
(१) आंतरजालाच्या साहाय्याने आशिया खंडाचा नकाशा पाहा. आशिया खंडातील कोणकोणत्या देश समुद्रकिनारा लाभला आहे व त्या समुद्रांत कोणती बेटे आहेत याचे निरीक्षण करा व त्याची नोंद पुढील मुद्यांनुसार करा.
देश
लाभलेला समुद्रकिनारा
तेथील बेटे
* (२) आंतरजालाच्या साहाय्याने अंदमान-निकोबार या बेटांची माहिती पुढील मुद्द्यांच्या आधारे मिळवा
(१) तेथील आदिवासी
(२) आदिवासींचे जीवनमान
(३) निसर्गसौंदर्य
(४) तेथील सोईसुविधा
(३) विविध सामाजिक समस्यांच्या संदर्भातील चित्रांचा संग्रह करा.
NAS वर आधारित प्रश्नपत्रिका
(070111)
इयत्ता सातवी ( मराठी) पाठ-11 बाली बेट (पान.नं. 49)
वाचा व अचूक उत्तरे निवडा.
प्रश्न1. ' नयनरम्य' या शब्दातील अक्षरांपासून पुढीलपैकी कोणता शब्द तयार होऊ शकत नाही ?
(1)नयन (2) रम्य (3)नर (4) रम्य
प्रश्न 2.'नयनरम्य'शब्दाचा पुढीलपैकी नेमका अर्थ कोणता ?
(1) डोळ्यात खुपणे (2) डोळा लवणे (3) डोळा लागणे (4) डोळ्यांना चांगले वाटणारे .
प्रश्न 3.इंडोनेशिया हा समुद्रात रत्नजडित कंठातील फेकून द्यावा असा एक पाचूच्या बेटांचा पुंजका आहे.
या वाक्यातील खालीलपैकी विशेषण कोणते?
(1)इंडोनेशिया (2)समुद्र (3) रत्नजडित (4) कंठा
प्रश्न 4.बाली हा टुरिस्टांचा स्वर्ग, त्यामुळे इथले टूरिस्ट खाते अतिशय तत्पर आहे.या वाक्यातील ' त्यामुळे' या शब्दाची जात कोणती ?
(1) नाम (2) सर्वनाम (3) विशेषण (4) क्रियापद
प्रश्न 5. 'पुंजका' या शब्दाचा खालीलपैकी कोणता अर्थ होतो ?
(1) पुंजी (2) समूह (3) माळ (4) गाव
प्रश्न 6. ' वळणदार ' या शब्दातील अक्षरांमधून किती वेगवेगळे अर्थपूर्ण शब्द तयार होतात ?
(1) चार (2) पाच (3) सहा (4) सात
प्रश्न 7. ' हौ वंडsफुल्!' या वाक्यात कोणती विरामचिन्हे वापरलेली आहेत?
(1) स्वल्पविराम, प्रश्नचिन्ह (2) प्रश्नचिन्ह, उद्गार चिन्ह (3) अवतरणचिन्ह , उद्गार चिन्ह (4) अवतरणचिन्ह ,पूर्णविराम
प्रश्न 8. " वि, ळा, र , व , त , मा, न " दिलेल्या या सात अक्षरांपासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दात मधोमध येणारे अक्षर कोणते ?
(1) व (2) ळा (3) मा (4) त
प्रश्न 8. इंडोनेशिया देश म्हणजे ...................................
(1) बेटांचा पुंजका (2) बेटांची मालिका (3) बेटांची माळ (4) एक ते तीन बरोबर
प्रश्न 9. " बाली बेटावर घड्याळ नावाची गोष्ट नाही." असे लेखक का म्हणत असावेत ?
(1) घड्याळ उपलब्ध नव्हते. (2) घड्याळ वापरायला बंदी होती. (3) घड्याळाची गरज नव्हती. (4) विश्रांतीच्या वेळी देखील उत्साहाने सेवा देत होते.
प्रश्न 10. बाली बेटावरील ललित कला कोणत्या ?
(1) नृत्य - गायन (2) चित्र- शिल्प (3) फक्त एक बरोबर (4) एक व दोन बरोबर.
प्रश्न 11." पाच मिनिटातच बाली बेटा ने माझे घोरणे ऐकायला सुरुवात केली." म्हणजे ................
(1) मला गाढ झोप लागली.(2)मला घोरण्याची सवय होती. (3) मला घोरणे भाग होते. (4) मला डुलकी लागली होती.
प्रश्न 12. ' तत्पर' या शब्दाचा पुढीलपैकी योग्य अर्थ कोणता?
(1) सदैव तयार(2) सदैव सुंदर (3) अतिशय छान (4) अतिशय गलिच्छ
प्रश्न 13.सागर बीच हॉटेलच्या टुमदार बंगलीपुढे लेखक पु.ल. देशपांडे यांचे स्वागत कोणी केले ?
वाचणे
(1) शिपायाने (2) वॉचमनने
(3) हॉटेल मालकाने (4) बाली तरुणीने
प्रश्न 14.लेखक पु.ल. देशपांडे सागर बीच हॉटेल वर पोहोचले तेव्हा ती वेळ कोणती होती ?
(1)मध्यान्हपूर्व दोन (2) मध्यान्होत्तर दोन
(3) दुपारचे दोन (4) सायंकाळचे दोन
प्रश्न 15. 'अभंग' या शब्दाचा अर्थ सांगणारा खालीलपैकी पर्याय कोणता ? ( दोन पर्याय नोंदवा)
(1) भंग न पावणारे (2) काव्यप्रकार (3) भजन करणे (4) भक्ती करणे.
प्रश्न 16.बाली बेटावर .................... येथे विमानतळ आहे.
(1) इंडोनेशिया(2) जकार्ता (3) देनपसार (4) गोवा
प्रश्न 17. " तुम्हां उभयतांचे अधिक मनःपूर्वक स्वागत!"
या वाक्यात कोणकोणती विरामचिन्हे वापरली आहेत ? (1) स्वल्पविराम, उद्गार चिन्ह (2)अवतरणचिन्ह , प्रश्नचिन्ह (3)प्रश्नचिन्ह , अवतरणचिन्ह (4) अवतरणचिन्ह, उद्गारचिन्ह
प्रश्न 18.
लेखक पु ल देशपांडे बाली बेटाच्या पर्यटनाला जाताना जकार्ताच्या विमानतळावरून किती वाजता निघाले ?
(1)मध्यान्हपूर्व अकरा वाजता (2) मध्यान्होत्तर अकरा वाजता (3) सकाळी अकरा वाजता (4) संध्याकाळी अकरा वाजता
प्रश्न 19. ' अवशेष' म्हणजे काय ?
(1) उर्वरित भाग (2) संपलेले भाग (3) संपणारे भाग (4) नावापुरते भाग
प्रश्न 20 ते प्रश्न 22 साठी सूचना. चुकीच्या अर्थाची जोडी निवडा.
प्रश्न 20.(1)रत्नजडीत - रत्नांनी सजवलेले (2) पुंजका - गुच्छ (3) अवशेष - शिल्लक राहिलेले भाग (4) अभंग - तूटलेला.
प्रश्न 21.(1) पर्यटक - सहल (2) उभयतांचे - दोघांचे (3) झापांची - झावळयांची (4) काटीत – कापीत
प्रश्न 22(1) रहस्यमय- गूढ (2) किर्र- झाडी
(3) यत्किंचित - जरासा (4) ताण - तणाव
प्रश्न 23 ते प्रश्न 25 साठी सूचना. अर्थाच्या जोडीचा बराबर निवडा.
प्रश्न 23
'अ ' गट 'ब' गट
(1) अंधुक - (अ) मोकळ्या
(2) जन - ( ब) अस्पष्ट
(3) मुक्त - (क) छान
(4) रम्य - (ड) लोक
पर्याय
(1) 1- अ, 2- ब , 3- क , 4- ड
(2) 1- ब , 2- अ , 3- ड , 4-क
(3) 1- क , 2- ड , 3- अ , 4- ब
(4) 1- ब, 2- ड , 3- अ , 4- क
प्रश्न 24
'अ ' गट 'ब' गट
(1) टवटवीत - (अ) पत्नी
(2) डुलक्या - ( ब) प्रसन्न
(3) मंगल पाठ - (क) अर्धवट झोपेत
(4) सहधर्मचारिणी - (ड) पवित्र स्तोत्र
पर्याय
(1) 1- अ, 2- ब , 3- क , 4- ड
(2) 1- ब , 2- अ , 3- ड , 4-क
(3) 1- क , 2- ड , 3- अ , 4- ब
(4) 1- ब, 2- क , 3- ड , 4- अ
प्रश्न 25
'अ ' गट 'ब' गट
(1) अश्राप , - (अ) अनोखी
(2) परिसमाप्ती - ( ब) नितळ
(3) निष्पाप - (क) संपूर्ण शेवट
(4) अज्ञात - (ड) श्रद्धाळू
पर्याय
(1) 1- क, 2- ब , 3- अ , 4- ड
(2) 1- ब , 2- अ , 3- ड , 4-क
(3) 1- ड , 2- क , 3- ब , 4- अ
(4) 1- ब, 2- ड , 3- अ , 4- क
Comments
Post a Comment