Kinds of Adjectives

 UNIT 1.3

Kinds of Adjectives विशेषणाचे प्रकार


There are six kinds of adjectives.

विशेषणाचे प्रकार सहा आहेत. 




1) Adjectives of quality

2) Adjectives of number

3) Adjectives of quantity

4) Demonstrative Adjectives.

5) Interrogative Adjectives 

6) Possessive  Adjectives.


(1) Adjectives of quality- गुणविशेषणे :

It shows the kind or quality of a person or thing.( नामाचे गुण दर्शविणाऱ्या शब्दास गुणविशेषणे म्हणतात.)

Example:- 

 Sumit is a kind boy. 

सुमित एक दयाळु मुलगा आहे. 

Rasika is a clever girl.

रसिका एक हुशार मुलगी आहे. 

वरील वाक्यात kind (दयाळू), clever (हुशार) ही गुणविशेषणे आहेत. ते नामाबद्दल गुण दर्शवितात.


2) Adjectives of number संख्याविशेषणे :

It denotes the numerical strength of persons or things.

 संख्येच्या रुपाने किंवा क्रमांक स्वरुपात व्यक्तिची किंवा वस्तूची माहिती सांगणाऱ्या शब्दास संख्याविशेषण म्हणतात.

cardinals अनुक्रमांक, दर्शविणारा शब्द- one, two, three, six, eight etc.

Ordinals क्रमवाचक अंक First, Second, Forth, ninth etc. - त्याचप्रमाणे Some, all, several, most, few, etc. संख्याविशेषणे आहेत.

Example:-  (1) The hand has five fingers. हाताला पाच बोटे आहेत.

(2) Few cats like cold water.

 थोड्याच मांजरांना थंडपाणी आवडते.

(3) All Women are not clever.

सर्वच स्त्रिया हुशार नाहीत.


3) Adjectives of Quantity- परिमाणवाचक विशेषण : An adjective of quantity describes how much a thing is. वस्तू (नाम) माहिती इ. परिमाण स्वरुपात दर्शविणाऱ्या शब्दाला परिमाणवाचक विशेषण म्हणतात. How much म्हणजे किती? या प्रश्नाचे उत्तर संख्येने मोजता येत नाही. भाववाचक आणि पदार्थवाचक नामांची विशेषणे म्हणून परिमाणवाचक विशेषणे वापरली जातात.

Example:-

( 1) I ate some rice. मी काही भात खाल्ला.

(2) Sumit has much gold. सुमितजवळ पुष्कळ सोने आहे.

(3) I drank much milk. मी भरपूर दुध प्यालो.


4) Demonstrative Adjectives- दर्शक विशेषणे :

Demonstrative Adjectives point out which persons and things are meant. व्यक्ति किंवा वस्तू यांचा निर्देश करण्याकरीता दर्शक विशेषणांचा उपयोग होतो. 

Example:- 

(1)This girl is my sister. ही मुलगी माझी बहीणआहे. 

या वाक्यात This हा शब्द मुलीबद्दल निर्देश करतो म्हणून this हे दर्शक विशेषण आहे.

(2 ) Those boys are not clever. ती मुले हुशार नाहीत.

(3) I like these books. This, these, that, those, ही दर्शक विशेषणे आहेत.


5) Interrogative Adjectives प्रश्नार्थक विशेषणे : Interrogative adjectives are used with nouns to ask questions. प्रश्नविचारण्यासाठी, नामाच्या पूर्वी वापरले जाणाऱ्या प्रश्नशब्दांना (What, Which, Whose, etc) प्रश्नार्थक विशेषणे म्हणतात. उदा.

(1) What time is it? (किती वाजले आहेत?) 

या वाक्यात What (काय किंवा किती) हे नामाच्या पूर्वी आहे. प्रश्न विचारण्याचे काम केलेले आहे म्हणून ते प्रश्नार्थक विशेषण होय.

(2) Whose book is this? हे पुस्तक कोणाचे आहे ? (3) Which pen do you like? तुला कोणती पेन आवडते?


6) Possessive Adjectives - संबंधदर्शक विशेषणे पुरुषवाचक सर्वनामाची षष्ठी विभक्तीची रुपे संबंधदर्शक विशेषणे म्हणून वापरतात.


Example:- . my, our his, her, its, their.

 1) Mother loved her child.

2) My pen is in the bag.

3) Your sister is clever etc..


Comments

Popular posts from this blog

HOME