Punctuation Marks
Punctuation Marks (विराम चिन्हे)
Punctuation is derived from the latin word punctum , meaning to point. It means the right way of putting in marks, points or stops in writing called punctuation. The meaning of sentence is many times confused without proper punctuation marks as - The cow said the farmer is a useful animal (Without punctuation marks)
वाक्यामध्ये विरामचिन्हाचा योग्य ठिकाणी वापर केल्यानेच वाक्याचा अर्थ आपणास समजतो, केवळ एक कॉमा द्यायचा विसरला तर वाक्याचा अर्थ बदलतो.
उदा. मी चोरी करणार नाही, केल्यास फाशी द्यावे. आता कॉमाची जागा बदलून अर्थ पाहू.
उदा. मी चोरी करणार ,नाही केल्यास फाशी द्यावे. तेव्हा भाषेमध्ये विरामचिन्हांना फार महत्त्व आहे. त्यांचा अभ्यास करु या.
(A) 1. Capital Letters-मोठी अक्षरे (पहिली लिपी)
इंग्रजी भाषेत वाक्यातील पहिल्या शब्दाचे पाहिले अक्षर Capital letters नी करतात.
उदा. He is a boy. Seeta is a girl.
Don't make noise.
2) व्यक्ती, स्थळ, समुद्र, नद्या, शहरे, देश, महिने, वार, ग्रंथ, देव देवता यांच्या नावाची पहिली अक्षरे Capital वापरतात.
उदा. Rama, Saraswati, The Ganga, Sunday, April, The Ramayana etc.
3) I हे सर्वनाम म्हणून नेहमी Capital लिहीतात.
उदा. May I Come in sir?
Geeta and I went to pune.
I am doctor.
4) Abbreviation - संक्षिप्त रूप किंवा लघु रूप वापरताना नेहमी Capital letter वापरतात.
उदा. S.S.C. ; B.A.M.A. ; S.T.D. ;
Ghode J.J. ; Patil T.T. ; Mahanor B.D. etc.
B) Full stop (फुलस्टॉप) पूर्ण विराम (.)
विधानार्थी वाक्याच्या शेवटी व आज्ञार्थी वाक्याच्या शेवटी Full stop देतात.
उदा. This is my school. Go to School.
C) Comma स्वल्पविराम (,)
तीन किंवा तीनपेक्षा अधिक नामे, सर्वनामे विशेषणे एकत्रित आल्यास प्रत्येक नामानंतर कॉमा वापरतात परंतु शेवटची दोन नामे and जोडतात.
उदा. He bought a pen, pencil, a bag and a box.
3) संबोधनाच्या अगोदर किंवा नंतर कॉमा वापरतात.
उदा. Shut the window, Vinu
Vinu, shut the window.
4) पत्रातील मायना लिहल्यानंतर Comma देतात..
उदा. Dear friend,
Dear Rasika,
Dear Mother,
Respected Sir,
5) Question tag च्या वाक्यात मूळ वाक्य संपल्यानंतर Comma देतात.
उदा. He is late, isn't he?
6) मुख्य पोट वाक्यापूर्वी येणारे गौण पोटवाक्य वेगळे दर्शविण्यासाठी स्वल्पविराम वापरतात.
उदा. As soon as the sun rises, birds fly.
If you work hand, you will pass..
D) Semicolon अर्धविराम (:)
चा उपयोग comma पेक्षा जास्त आणि full stop पेक्षा कमी pause घेण्यासाठी " ; " चा उपयोग होतो.
उदा. 1) You must work hard ; else you will fail.
2) To error is human ; to forgive is divine,
E) Inverted Mark (अवतरण चिन्ह) ("--") एखाद्या व्यक्तीचे म्हणणे दुसऱ्याला आहे तसे सांगावयाचे झाल्यास तिथे Inverted Mark (अवतरण चिन्ह ) वापरतात.
उदा. 1) The teacher said, "The Earth is round."
F) Apostrophe Mark -षष्ठीदर्शक चिन्ह ( ')
मराठीतील चा ,ची, चे अर्थ इंग्लिश मध्ये व्यक्त करताना S वापरतात , तेव्हा Apostrophe Mark
वापरतात
उदा. 1) She is Rasika's Mother.
2) It is Rama's house.
G ) Question Mark -(?) प्रश्नचिन्ह
प्रश्नार्थक वाक्याच्याशेवटी Question Mark देतात. इंग्लिश मध्ये प्रश्न दोन प्रकारे विचारले जातात. (1) wh question
(2) Yes / No answer येणारे question .
(3) तसेच Question tag मध्ये Question Mark वापरतात .
उदा. What is your name?
What does your father do?
Can you sing?
Are you going to market ?
This is a bag , isn't it ?
H) Dash ( - ) संयोग चिन्ह, अपसरण चिन्ह,
बोलताना अचानक थांबल्यास किंवा विचारातील बदल दाखवायचा असल्यास Dash( 'डॅश')चा वापर करतात. उदा.
1. She lost everything -bag, clothes and ornaments.
2. If my wife were alive - but - why lament the post.
Comments
Post a Comment